Lump sum investment vs SIP
Reading Time: 2 minutes

Lump sum Investment vs SIP

म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात एकरकमी गुंतवणूक की एसआयपी याबद्दल साशंकता असते (Lump sum Investment vs SIP). भारतीय युवा वर्ग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) पसंती देत आहे, तर नोकरीत बऱ्यापैकी  स्थिरस्थावर झालेले म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करत आहेत. भांडवली बाजारात नवीन गुंतवणुकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. उत्तम इंटरनेट सुविधा आणि बाजाराबद्दल जागरूकता यामुळेच यात अधिकच भर पडत आहे. काहीजण त्यांच्या पोर्टफोलिओची रचना करण्यासाठी गुंतवणुकीतील सर्वोत्तम संधीबद्दल मार्गदर्शनाच्या शोधात आहेत. सध्या बाजारात असंख्य पर्याय आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या पर्यायाबाबत खात्री नसल्यास बाजारातील आपला निर्णय चुकू शकतो. 

या क्षेत्रात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना सदैव एकच प्रश्न असतो, सुरुवात कुठून करायची? एकरकमी गुंतवणूक करायची की एसआयपी हा चांगला पर्याय आहे? अर्थातच, जी उद्दिष्टे गुंतवणूकदाराला साध्य करायची आहेत, त्यावर आधारीत हा निर्णय घ्यावा  लागतो. त्यामुळे हा निर्णय घेताना अनेक घटकांचा विचार करून घ्यावा लागतो. 

हे नक्की वाचा: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ?

Lump sum Investment vs SIP: एकरकमी गुंतवणूक की एसआयपी

एकरकमी गुंतवणूक समजून घेताना: 

  • एखादी मोठी रक्कम हातात असलेलं अथवा एखाद्या योजनेत नियमितपणे किंवा मासिक योगदान देण्याची खात्री नसलेले लोक सहजा म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करतात. कारण हा केवळ एक वेळचा व्यवहार आहे. 
  • अशा गुंतवणुकीसाठी बाजारात जास्त रकमेचे भांडवल गुंतवावे लागते, जेणेकरून जास्त परतावा मिळू शकेल.
  • ज्या गुंतवणूकदारांना जास्त जोखीम घ्यायची नसते, ते शेअर्स ऐवजी म्युच्युअल फंडचा एकरकमी पर्याय निवडतात.
  • निर्देशांक कमी अंकांवर व्यापार करत असेल, तेव्हा गुंतवणूकदार एकरकमी पैसा फंडांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. ज्यांना जास्त परंतु अनियमित उत्पन्न मिळते, अशा गुंतवणुकदारांसाठी हा योग्य पर्याय मानला जातो. 
  • व्यवसायिक, फ्रीलान्सर, इ. साठी हा पर्याय योग्य आहे. त्यांच्याच्याकरिता एसआयपी फायद्याचा नाही. कारण त्यांना मिळणारे अनियमित उत्पन्न बऱ्याचदा एकरकमी गुंतवणुकीसाठी योग्य असते.

विशेष लेख: एसआयपी (SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

एसआयपीचा (SIP) पर्याय: 

  • एसआयपीचा विचार करता, गुंतवणूकदाराची सरासरी उत्पन्न क्षमता विचारातघेतली जाते. निश्चित मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती ठराविक कालावधीसाठी एसआयपी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकतात. 
  • ही मासिक गुंतवणूक असून, ५०० रुपयांपासून अनेक हजार रुपयांपर्यंत असू शकते. यामध्ये पहिल्या गुंतवणुकीपासून मालमत्ता मूल्य वेळोवेळी जमा होत राहते. 
  • पहिल्यांदा गुंतवणूक करणारे बहुतांश तरुण व्यावसायिक आणि नुकतेच पदवीप्राप्त असतात, त्यांना एसआयपी हा चांगला पर्याय आहे. 
  • त्यांची गुंतवणूक कमी असते आणि वित्तीय गरजांची पातळीही कमी असते. तसेच, बाजारातील चढ-उताराची चिंता न करता उद्देश आधारीत कालावधीनुसार, त्यांचे व्यवस्थापन करता येते.
  • एसआयपीमधून मिळाणारे व्याज परत त्याच योजनेत लावण्याचे व्यवस्थापन करा. जेणेकरून गुंतवणुकदारांना अधिक चांगले परतावे मिळू शकतील.

महत्वाचा लेख: म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

गुंतवणूक करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे व ही प्रक्रिया कशी करावी?

  • यात आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, गुंतवणूकदाराने अनेक पर्यायांमधून एक पर्याय निवडण्यासाठी ठराविक उद्दिष्टे नियोजित करावी लागतात. 
  • उदा. गुंतवणूकदाराला किती भांडवल गुंतवण्याची इच्छा आहे, संबंधित व्यक्तीला कोणत्या स्वरुपाचे मासिक उत्पन्न मिळते, गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची सहनशीलता आणि बाजाराची गतिशीलता ठरवणारे इतर घटक यावर हे सर्व अवलंबून असते.
  • स्थिर उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी एसआयपी हा अप्रतिम पर्याय मानला जातो. त्यांना गुंतवणूकदार म्हणून निर्देशांकावर फार कमी लक्ष द्यावे लागते. 
  • ही नियमित उत्पन्न असलेल्या नवशिक्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. कारण ही कधीही थांबवता येते. 
  • तसेच, डिजिटल केवायसी आणि इतर साधनांद्वारे बँका ग्राहकांना मोबाइल पद्वारे ही प्रक्रिया वेगाने होण्यास मदत करतात. 
  • आपण निवडलेल्या योजनेनुसार, यात पद्धतशीरपणे गुंतवणूक होत राहते. 
  • दुसरीकडे, बाजारात एकरकमी मोठी गुंतवणूक केल्यास भविष्यातील परताव्यांवर मोठा परिणाम करते. यात जोखीमीची मोठी भूमिका असते. एसआयपी असो वा एकरकमी गुंतवणूक, आपल्या पोर्टफोलिओत विविधता असल्यास धोके कमी असतात.

श्री ज्योती रॉय

इक्विटी स्ट्रॅटजिस्ट,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Lump sum Investment vs SIP Marathi, Lump sum Investment vs SIP in Marathi, Lump sum Investment vs SIP Marathi Mahiti, Which is better Lump sum Investment vs SIP, Marathi mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…