वैयक्तिक बजेट
https://bit.ly/391BB8i
Reading Time: 3 minutes

वैयक्तिक बजेट

वैयक्तिक बजेट म्हणजे आपले स्वतःचे  आपण स्वतःच अंदाजपत्रक तयार करणे होय.

बजेट हा शब्द ऐकल्यावर केन्द्रीय अर्थमंत्री त्यांची लॅपटॉप बॅग घेऊन जात आहेत असे चित्र कदाचित तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. वैयक्तिक बजेट म्हणजेच अंदाजपत्रक तयार करणे हा तुमचे पैसे  वाढवण्याचा  सर्वात प्रभावी व मूलभूत मार्ग  आहे. बरीचशी लोकं वैयक्तिक बजेट तयार करणे टाळतात कारण त्यांना वास्तव परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असते.

खरे पाहता वैयक्तिक बजेट तयार केल्यावर तुम्ही चुकीच्या मोहात पाडणाऱ्या खर्चांपासून वाचता , तुम्ही विनाकारण कर्जबाजारी होण्यापासूनही स्वत:चा  बचाव करता. विनाकारण होणारा निरर्थक खर्च टाळल्याने बचत आपोआप होते.   

हे नक्की वाचा: काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

वैयक्तिक बजेट कुणी तयार करायला हवे?

१. ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत आणि ज्यांना नेहमीच पैशाची चणचण भासते

२.  कर्जातून लवकर मुक्तता हवी असेल तर

३. निवृत्तीच्या वेळी हातात पुरेशी रक्कम हवी असेल तर किंवा लवकर निवृत्ती  घ्यायची असेल तर 

४. आपल्या संपत्तीचा सर्वोत्तम  वापर करायचा असेल तर 

५. आपली अर्थविषयक सर्व ध्येये पूर्ण करायची असतील तर 

वैयक्तिक बजेटचे फायदे

१. तुमच्या  संपत्तीवर तुमचे स्वतःचे नियंत्रण प्राप्त होते :

  • बजेटमुळे तुम्ही किती खर्च करत आहात व किती बचत करत आहात याची माहिती समजते. बजेटमुळे तुम्ही तुमच्या संपत्तीचे नियंत्रण करता ,संपत्ती तुमचे नियंत्रण करत नाही.  

  • बजेटमुळे ‘आता माझ्याकडे आजिबातच पैसे नाहीत, आता मी काय करु, कुठे जाऊ ,कोणाकडे हात पसरु? या प्रश्नांपासून तुमची सुटका  होते. 

  • बजेटमुळे तात्कालीक समाधान म्हणजे आवडल्या आवडल्या मॉल मध्ये महागडे कपडे घेणे, ऑनलाईन ऑफ़र्सना भुलून गरज नसलेल्या गोष्टी विकत घेणे यांऐवजी दीर्घकालीन ध्येये जसे की उच्च शिक्षण, वार्षिक सहली,  नवीन घरासाठी किंवा गाडीसाठी पैसे वाचवता येतात.

२. तुम्ही आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रीत करता :

  • तुम्ही बजेट तयार केल्यावर आपोआपच तुमच्या ध्येयांच्या आड येणाऱ्या गोष्टी टाळायला सुरवात करता. 

  • अनावश्यक वस्तू  व सेवा खरेदी करण्यास तुमचे मन धजावत नाही. कारण तुमच्याकडे पैसे नेमके कुठे वापरावेत याची योजना अगोदरच तयार असते.

महत्वाचा लेख: पगारच पुरत नाही…बचत कशी करू? 

३. आपल्या संपत्तीचे नेमके गणित समजते :

  • बजेटमुळे  तुम्हाला आपण नेमके पैसे मिळवतो किती, ते पैसे किती पटकन संपतात आणि मग ते नक्की जातात तरी कुठे हे समजायला मदत होते.

  • प्रत्येक महिन्या अखेरीस  बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपले पैसे पटकन का संपले. बजेटमुळे या अडचणीतुन तुम्ही बाहेर पडू शकता.

  • आपल्याला काय परवडते, कुठे परवडते, बचत करून साचवलेला पैसा आपण कर्ज कमी करण्यासाठी वापरावा की नवीन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा यांचे उत्तर मिळू शकते.  

४. तुमचे खर्च व बचत यांचे नियोजन करण्यास मदत होते. :

  • आपल्या पुढील महिन्याचे अथवा तीन महिन्याचे अथवा वर्षाचे विविध खर्चांचे नियोजन करण्यास बजेट ची मदत होते. 

  • मुलाच्या शाळांच्या फी, दर महिन्याला होणारे नेहमीचे खर्च, मेडिकल खर्च वगैरे माहिती असल्यास खर्च समोर आल्यास तुम्ही तयारीत असता आणि धक्का बसत  नाही.

५. तुमच्या अपेक्षित आणि अनपेक्षित खर्चासाठी तुम्ही तयार असता :

  • “इमर्जन्सी फंड”’ म्हणजे “आणिबाणी निधी”’ आपण किती ठेवायला हवेत याचा विचार करण्यास बजेट प्रणाली तुम्हाला भाग पाडते.
  • एखादा अनपेक्षित खर्च जरी समोर आला तरी तुम्ही डगमगून जात नाहीत.

इतर लेख: तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल? 

६. कौटुंबीक स्वास्थ्य वाढते :

  • जर तुम्ही बजेट बाबत तुमच्या जोडीदाराशी अथवा कुटुंबियांशी मनमोकळेपणाने चर्चा करून काही ध्येये सुनिश्चित  केली तर सर्वजण मिळून पैसे कसे खर्च  करायचे, बचत किती करायची हे ठरवू शकता. 

  • ‘टीम’ म्हणून सर्व कुटुंबीय ठराविक ध्येयावर पारदर्शकतेने काम करत असल्यास आपोआपच गैरसमज, तणाव टाळले जातात.  

  • घरातील  सर्वांनाच बजेटमुळे त्यांच्या जबाबदाऱ्या समजतात.

७. समस्यांची पूर्वसूचना समजते :

  • बजेटमुळे पुढे येणाऱ्या समस्यांची पूर्वसूचना तुम्हाला मिळू शकते . 

  • संभाव्य आर्थिक चणचण असेल तर तुम्ही विनाकारण पैसे उधळू शकणार नाही. 

  • बचत कराल व  समस्या येण्यापूर्वीच त्यांचे निराकरण करू शकाल .  

८. कर्ज घेण्याविषयी  योग्य निर्णय घेता येतात :

कर्ज घेणे अजिबात चूक नाही. बऱ्याच वेळा कर्ज घेणे म्हणजे कर्जबाजारी होणे असे समजले जाते. बजेट मांडल्याने कुठल्याही ताणतणावाशिवाय पुढील प्रश्नांची  उत्तरे मिळतात. 

  • कर्जाची खरंच गरज आहे का ?
  • आपल्याला किती कर्ज मिळू शकेल ?
  • कर्ज घेऊन आपण रक्कम कुठे वापरणार आहोत.
  • कर्जाची परतफेड  करण्यास आपण सक्षम आहोत का ?

९. अधिकचा पैसा उभा राहतो :

  • अनावश्यक खर्च टाळले की लेट फी, दंड, व्याज हेही टळतात. छोट्या छोट्या बचतीतून कालांतराने मोठी बचत उभी राहते.
  • ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे छोट्या छोट्या बचतीतून  गुंतवणुकीसाठी निधी उभा राहतो. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.