गृहकर्ज हस्तांतरणाच्या स्टेप्स –
गृहकर्ज हस्तांतरण या विषयाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. यापूर्वीच्या लेखात आपण या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टींची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण ‘गृहकर्ज हस्तांतरणाच्या महत्वाच्या स्टेप्स’ कोणत्या याबद्दल माहिती घेऊया.
संबंधित लेख: गृहकर्ज हस्तांतरण करण्यापूर्वी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी
गृहकर्ज हस्तांतरणाच्या ४ महत्वाच्या स्टेप्स
1 – कर्ज हस्तांतरणाचे सखोल विश्लेषण:
- जर तुमचे गृहकर्ज निश्चित व्याज दरावर असेल, तर आपल्याला कर्ज हस्तांतरित करण्यासाठी प्री-पेमेंट दंड (pre-payment penalty) भरावा लागेल. अशा परिस्थितीत आपले गृह कर्ज हस्तांतरित करणे उचित नाही.
- जर तुमचे कर्जप्रकार फ्लोटिंगव्याजदराचा असेल, तर आपले कर्ज कमी व्याजदरावर हस्तांतरित करणे फायदेशीर ठरेल.
- सध्या अनेक आघाडीच्या बँका आता दरवर्षी 8.3% पेक्षा कमी व्याजदर उपलब्ध करुन देत आहेत. तसेच कोरोना काळात तर आरबीआयने देखील धोरण बदलून दर कमी केले आहेत.
- आपल्याकडे दीर्घ परतफेडीच्या मुदतीचे गृहकर्ज असल्यास, ते हस्तांतरित केल्याने आपल्याला निश्चित फायदा होईल, कारण दीर्घ कालावधीसाठी कमी दराने तुमचे पैसे वाचतात आणि जास्त फायदा होतो.
- हस्तांतरण प्रक्रियेत काही न दर्शवलेले किंवा छुपे खर्च असतात. त्यावर आपण लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, काही बँका प्रक्रिया शुल्कात दस्तऐवजीकरण शुल्क समाविष्ट करत नाहीत.
- तसेच, जेव्हा नवीन ॲग्रीमेंट तयार केला जातो तेव्हा त्यावरील मुद्रांक शुल्क (Stamp duty) तुम्हास वेगळे द्यावे लागते. हे बहुतांश वेळा प्रोसेसिंग फीमध्ये समाविष्ट केलेले नसते.
2 – बँकेकडुन ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे (NOC Procedure)
ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे होते
- तुम्हाला हस्तांतरण प्रक्रियेसाठी पूर्वसूचना पत्र बँकेला द्यावे लागते.
- तुमच्या अर्जावर विचार करुन आपला देय इतिहास आणि आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची यादी तसेच तुमच्या मुद्दल-व्याजाची सद्यस्थिती याचा बँक अभ्यास करते. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा निर्णय घेण्यासंदर्भात बँक सकारात्मक विचार करते.
- या प्रक्रियेस 1 ते 3 आठवडे लागू शकतात. या टप्प्यावर, तुमची सध्याची बँक व्याजदरामध्ये कपात करण्याची ऑफर देऊन तुम्हाला कायम राखण्याचा प्रयत्न करते.
- दरम्यान, दुसर्या बँकेकडुन देखील काउंटर ऑफर घेणे चांगले. दोन्ही ऑफर्सचा विचार करुन मगच हस्तांतरण करावे की नाही हे ठरवावे.
हे नक्की वाचा: गृहकर्ज हस्तांतरणाची योग्य वेळ कोणती?
3 – नवीन बँकेत अर्ज करा
- पहिल्या बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असतील. आता तुम्ही निवडलेल्या बँकेत अर्ज करण्याची वेळ आली आहे.
- यासाठी तुम्हाला तुमच्या हाऊसिंग सोसायटी / बिल्डरकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घ्यावे लागेल आणि घराच्या मालकीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे नव्या बँकेत जमा करावी लागतील. त्यानंतर ती बँक तुमची मासिक हप्ता भरण्याची क्षमता तपासेल.
- ही प्रक्रिया प्रत्येक बँकेच्या धोरणानुसार वेगवेगळी असते. अर्ज करतांनाच आपण मासिक हप्ता म्हणजेच ईएमआयचा कालावधी निश्चित करुन घेऊ शकता.
हे नक्की वाचा: नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग
4 – नव्या बँकेकडून तुमच्या अर्जाची स्विकृती आणि पुढील प्रक्रियेला हिरवा कंदील
- यांनतर बँक आपल्या अर्जाचे मूल्यांकन करेल आणि आपली पात्रता ठरवेल.
- या प्रक्रियेमध्ये बॅंकेला अधिक माहिती हवी असण्याची शक्यता आहे. ही वेळ घेणारी प्रक्रिया आहे, कारण वेगवेगळ्या बँकांनी वेगवेगळ्या प्रक्रिया निर्धारित केल्या आहेत. याला काही आठवडे लागू शकतात.
- बँक तुमच्या कर्जाची आणि तुमची कसून तपासणी करेल. यामध्ये प्रामुख्याने आपल्या गृहकर्जाचे पुनर्मूल्यांकन करेल आणि आपला कर्जाचा पूर्व इतिहास तपासेल.
- यावेळी घराच्या मालकी हक्काची तपासणी केली जाईल तसेच यावेळी बँक अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करू शकते.
- नव्या बँकेकडून सर्व छाननी झाल्यानंतर तुमच्या आधीच्या बँकेशी संपर्क करुन त्यांच्यासोबत क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाते आणि नंतरच त्या पूर्वीच्या बँकेत जेवढी रक्कम तुमच्याकडून भरणे बाकी होते त्या रकमेचा धनादेश नवी बँक आधीच्या बँकेला सुपुर्त करते.
- धनादेशाद्वारे पैसे प्राप्त झाल्यानंतर आधीच्या बँकेतुन तुमच्या गृहकर्जाचे आणि त्यासंबंधी व्यवहारांचे सर्व कागदपत्रे नव्या बँकेला दिली जातात. त्यानंतर नव्या बँकेमध्ये तुमचे पुढील हप्ते सुरू होतात.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Home loan Transfer steps Marathi, Steps of home loan transfer in Marathi, Home Loan transfer Marathi mahiti