कर्जमुक्त होण्याचे मार्ग
https://bit.ly/2TfLWT8
Reading Time: 2 minutes

कर्जमुक्त होण्याचे मार्ग

कर्जमुक्त होणं हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्न असते. आजच्या लेखात आपण जाऊन घेऊया करमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग. 

तुम्ही जर मध्यम/उच्च मध्यमवर्गीय असाल आणि नुकतेच उच्चशिक्षण घेतले असेल किंवा घ्यायचा विचार असेल, लहानमोठ्या शहरात एखादे घर असेल, घरासमोर/खाली पार्किंग मध्ये एखादी गाडी असेल, इतकेच कशाला, अगदी एखादा महागडा लॅपटॉप किंवा इतर काही यांत्रिक उपकरण असेल तर या सगळ्या सुबत्तेच्या गुलाबाला कर्जाचे काटे नक्कीच असणार…प्रत्येक वेळी हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयात त्या सगळ्या कर्जांची वजाबाकी नक्की होत असणार आणि कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार….तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

हे नक्की वाचा: होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा

कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

१. कर्जाचा आराखडा  :

  • तुम्ही आजवर घेतलेली कर्जे, त्यांचे व्याज, त्या व्याजाचा दर, शिल्लक कालावधी  इ. चा एक सुटसुटीत ताळेबंद आराखडा तयार करा.
  • व्याजाचा दर आणि शिल्लक कालावधीच्या अनुरुप कोणती कर्जे लवकरात लवकर फेडायची आहेत व कोणती दीर्घ कालावधीची आहेत याची क्रमवार मांडणी करा.
  • उदा. क्रेडिट कार्डसारखी कर्जे ही अधिकाधिक व्याजदराची असतात व त्याची जास्त वेळ परतफेड न करणे खात्याला मोठ्या प्रमाणात गळती लावू शकते. याउलट गृहकर्जासारखी कर्जे हि दीर्घ कालावधीची असतात आणि त्याचा कारसवलतीतही फायदा होतो.

२. कर्जाची प्री-पेमेंट्स करणे:

  • कर्जे लवकरात लवकर फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमीच्या व्याजाच्या हफ्त्या सोबतच मूळ मुद्दलाचाही काही प्रमाणात परतावा करणे.
  • उदाहरणार्थ समजा तुम्ही ४० लाख रुपये २४० महिन्यांसाठी ९.% दराने घेतले असतील आणि तुमचा व्याजाचा हफ्ता रु. ३४,७१३ आहे. २० वर्षांसाठी तुमच्या कर्जाची एकूण परतफेड रु. ४३,३१,००० ची होते. पण हेच जर तुम्ही तुमच्या १३ व्य हफ्त्यासोबत रु. १ लाखाच्या मुद्दलाची परतफेड केली, तर तुमचे एकूण व्याज रु. ३९,५६,००० पर्यंत खाली येते आणि कर्जाचा कालावधी देखील २२७ महिन्यांपर्यंत कमी होऊन जातो.   

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

३. काही काळासाठी क्रेडिट कार्डाचा वापर थांबवा :

  • तुमच्या डोक्यावर जर दिवसेंदिवस वाढत जाणारं क्रेडिट कार्डच्या बिलाचं ओझं असेल, तर पुढचे काही दिवस क्रेडिट कार्डचा वापर थांबवा.
  • मुळातच कर्जाच्या बोज्याखाली असताना वारेमाप केलेला क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला अधिकाधिक कर्जाच्या दलदलीत खेचत नेईल आणि मग काही ठराविक काळाने त्यातून बाहेर पडणे दुरापास्त होऊन बसेल.
  • त्यामुळे आधीचे क्रेडिट कार्डचे कर्ज चुकवत असताना शक्यतो डेबिट कार्ड किंवा रोख रकमेनेच दैनंदिन व्यवहार करा.
  • एकदा का तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त झालात की शक्यतो आजवर होत असलेल्या मासिक खर्चाच्या २०-३०% पर्यंतच खर्च नियंत्रित राहील असे पहा.

४. कमी व्याजदराच्या कर्जाची निवड :

  • तुम्ही तुमच्या कर्जाचा व्याजदर आर्थिक बाजारातल्या इतर कर्जाशी पडताळून पहिला आहे का? उदा. आजही तुम्ही ९-९.५% दराने गृहकर्ज फेडत असाल आणि बाजारात दुसरा कुणीतरी तेच कर्ज ८-८.५% दराने देण्यास तयार असेल तर? हा ०.५-१% दरातील फरकही लांब पल्ल्याच्या कर्जात तुमच्या लाखो रुपयांची बचत करू शकतो.
  • तसेच शक्य असल्यास वेगवगेळ्या कर्जाचे एकत्रीकरण करा. उदा. क्रेडिट कार्ड, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अशी वेगवेगळी कर्जे फेडण्यापेक्षा त्या सगळ्यांचे एकत्रीकरण करून एकावेळी एकच कर्ज फेडता येणे सहज शक्य आहे.

विशेष लेख: सिबिल स्कोअर आणि गैरसमज

५ . कर्जाच्या हफ्त्याची रक्कम वाढवा :

  • जर वर्षागणिक तुमची मिळकत वाढत जात असेल पण कर्जाच्या हफ्त्याची रक्कम कमी-अधिक प्रमाणात सारखीच राहत असेल तर तुम्ही वाढत्या मिळकतीसोबतच कर्जाच्या हफ्त्याची रक्कमही वाढवू शकता, जेणेकरून तुमच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी देखील आटोक्यात आणता येईल.

अशा साध्या सोप्या पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमच्या कर्जाचं ओझं कमी करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वर नमूद केलेल्या पर्यायांचा वापर केल्यास कर्जाच्या जाळ्यातून तुमची लवकर सुटका होईल.

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…