Budget App
https://bit.ly/3j0EkBQ
Reading Time: 2 minutes

Budget App: बजेट ॲप

तंत्रज्ञानाच्या युगातलं सरकारचं एक नवीन पाऊल म्हणजे बजेट ॲप (Budget App)! होय, यावर्षी प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्पाप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे.

Budget App: बजेट ॲप

  • केंद्रीय अर्थसंकल्प 2021 अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बजेट म्हटल्यावर नोकरदारांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळेच जण अर्थसंकल्पामधील तरतुदी काय असतील, याचा विचार करायला लागतात. 
  • आयकर मर्यादा, सबसिडीज, आर्थिक पॅकेजेस, काय स्वस्त आणि काय महाग होणार अशा अनेक तरतुदींबद्दल अगदी सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वानाच उत्सुकता असते.
  • नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर किमान आठवडाभर त्यामधील तरतुदींसंदर्भात चर्चा रंगते. अनेक मतमतांतरे, वृत्तपत्र, वेबसाईट्सचे भरलेले रकाने, न्यूज चॅनेल्सवर आयोजित करण्यात येणारे चर्चासत्र या सर्व गोष्टी सर्वसामान्यांसाठी नवीन नाहीत, पण या वर्षी बजेटसंदर्भात एक नवीन गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे बजेट ॲप (Budget App).  

कसं आहे बजेट ॲप?

  • केंद्रीय अर्थसंकल्प 2021 साठी सदर ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) तयार केले असून, ते इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. 
  • या मोबाइल ॲपमध्ये एकूण १४ दस्तावेज असतील. 
  • केंदीय अर्थसंकल्पाच्या अधिकृत वेबसाइटवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. 
  • १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. बजेट सादर झाल्यानंतर त्यामधील सर्व तरतुदींची माहिती या ॲपमध्ये पाहता येईल. 
  • सदर ॲप ‘यूझर फ्रेण्डली’ असावे यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. त्या अनुषंगाने यामध्ये झूम इन व झूम आऊट, सर्च,  डाऊनलोड, प्रिंट, असे  विविध पर्याय देण्यात आले असून, टेबल ऑफ कंटेंट्स, एक्स्टर्नल लिंक्स, बायडायरेक्शनल स्क्रोलिंग, यांचाही समावेश  करण्यात आला आहे. 

बजेट ॲप कसे डाउनलोड कराल?

  • बजेट ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php या लिंकवर क्लिक करून केंद्रीय अर्थसंल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटवर गेल्यावर Union Budget App Download Center या पर्यायाखाली अँड्रॉइड व IOS वापरकर्त्यांकरता दोन स्वतंत्र पर्याय दिलेलेआहेत.

  • आपल्या मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार योग्य पर्याय निवडून ॲप डाउनलोड करता येईल.
  • या दोन्ही पर्यायांच्या मधोमध Union Budget App user manual  हा पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये ॲप कसे वापरायचे, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
  • आवश्यकता वाटल्यास Union Budget App user manual वाचून मगच ॲप  डाउनलोड करा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.