Budget 2021 Analysis
https://bit.ly/3j6fZed
Reading Time: 3 minutes

Budget 2021 Analysis

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सन 2021-2022 या आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. बजेटमधील काही महत्वपूर्ण तरीतूदींचे विश्लेषण (Budget 2021 Analysis).

कोरोनानंतर झालेल्या प्रचंड उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी अंदाज केलेल्या तुलनेत खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्याचप्रमाणे लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलांमुळे आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणे, हे आव्हानात्मक काम होते. लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि करामध्ये वाढ करणे यांचा समतोल साधणे हे अत्यंत कसरतीचे काम होते. 

अर्थव्यवस्थेचा ज्याला आधारस्तंभ मानतात तो शेअरबाजार आपली सर्वोच्च पातळी गाठून उतरती दिशा दाखवत होता आणि जागतिक बाजारही अशीच दिशा दर्शवित होते. अशा स्थितीत मार्केट कदाचित ‘गॅप डाऊन ओपन’ होणार असा बहुतेकांचा अंदाज होता. तो डावलून विशेष काही न करता सर्वकाही चांगले चालले आहे अशी वातावरण निर्मिती या अर्थसंकल्पामुळे झाली आणि 22 वर्षानंतर प्रथमच एका दिवसात शेअरबाजारात 5% वाढ झाली. यातील बारीकसारीक तपशील लवकरच हाती येतील आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ आपली मते मांडतील. अंधभक्त व अंधविरोधक सर्वच माध्यमातून आपापल्या बाजू लढवतील.

https://bit.ly/3jafhMJ

Budget 2021 Analysis : केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण 

प्रत्यक्ष कर (Direct Taxes):

  • आयकर आकारणी कररचना यात कोणताही बदल नाही.
  • व्याज व पेन्शन एवढेच उत्पन्न असणाऱ्या 75 वर्षाहून अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्याची जरूर नाही.
  • आयकर खात्यास आता मागील 6 वर्षाऐवजी 3 वर्षाच्या उत्पन्नाची पुनः पडताळणी करता येईल.
  • डिव्हिडंड जाहीर झाल्यानंतरच करदात्यांच्या उत्पन्नची निश्चिती होऊन त्यावर आवश्यकता असल्यास अग्रीम कर देय होईल.
  • वार्षिक ₹ 10 कोटी रुपयांवरील डिजिटल व्यवहारांचे टॅक्स ऑडिट करावे लागणार. यापूर्वी ही मर्यादा ₹ 5 कोटी होती.
  • सर्वांसाठी घर अंतर्गत पहिल्या घरासाठी कर्ज घेणाऱ्या गृहकर्जावरील अधिकच्या दीड लाख रुपये व्याजास मिळणाऱ्या सवलतीस (80EE) आणखी एक वर्षाची मुदतवाढ.

अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes):

  • कंपनी करात कोणताही बदल नाही.
  • मोबाईल पार्ट वरील कस्टम ड्युटीत 2.5% वाढ.
  • सोलर इनव्हटर वरील कर 5% वरून 20%.
  • कापसावर 0 वरून 10% कर.
  • कृषी पायाभूत सुधारणा अधिभार (AIDC) अंतर्गत पेट्रोलवर प्रतिलिटर ₹ 2.50 व डिझेलवर ₹ 4 चा अतिरिक्त कर अधिभार.

हे नक्की वाच: Budget 2021 Highlights: इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे ! थोडक्यात महत्वाचे…

आर्थिक क्षेत्र:

  • विमा क्षेत्रातील परकीय भांडवली गुंतवणूक मर्यादा 49% वरून 74% 
  • अडचणीत असलेल्या सरकारी बँकांना ₹ 20 हजार कोटींची भांडवली मदत.
  • एकल कंपनी, शून्य उलाढाल भांडवल भरणा नाही अशा स्टारस्टप उद्योगांनाही प्रोत्साहन. 
  • कर्ज पुनर्बांधणीसाठी ₹ 20 लाखपासूनचे कर्ज पात्र यापूर्वी ही मर्यादा ₹ 50 लाख होती.
  • ₹ 2.2 लाख कोटी हे आगामी वर्षाचे निर्गुंतवणूक लक्ष, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा यातील सर्वाधिक वाटा.
  • पैसे न मिळू शकणाऱ्या बंद बँकांच्या खातेदारांना बँकेचे लायसन्स रद्द होण्यापूर्वी ₹ 5 लाख विहित मर्यादेत ठेव रक्कम परत मिळण्याची DIGC मार्फत तरतूद.

कृषी व ग्रामविकास:

  • कृषी कर्जासाठी ₹ 16.5 लाख कोटी रुपयांची तरतूद.
  • कृषी पायाभूत सुविधा फंडात ₹40 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ.
  • ठिबक सिंचनासाठी ₹10 हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • मत्स्यसंवर्धची 5 केंद्राची निर्मिती.
  • देशभरात अत्याधुनिक 1000 मंडयांची निर्मिती. 

वाहतूक व पायाभूत सुविधा: 

  • 11000 km रस्त्याच्या निर्मितीचे लक्ष.
  • 8500 km राष्ट्रीय महामार्ग निर्मिती मार्च 22 पर्यंतचे लक्ष.
  • रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 1.1लाख कोटी रुपयांची तरतूद.

आरोग्य:

  • प्रधानमंत्री आत्मनिर्भर आरोग्य योजना येत्या 6 वर्षांसाठी 64100 कोटी रुपयांची तरतूद. 
  • सन 2021 साठी आरोग्य खर्चासाठी 94 हजार कोटी तर सन 2022 साठी  ₹ 2.23 लाख कोटी खर्च अंदाजित.
  • कोविड लसीकरणासाठी सन 2022 पर्यत ₹ 35 हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सेवा विषयक स्वतंत्र पोर्टलची निर्मिती.
  • पाणीपुरवठा योजनांसाठी (अमृत) ₹ 2.87 लाख कोटी रुपयांची तरतूद.

वीज क्षेत्र: 

  • आधुनिकीकरणासाठी पुढील 5 वर्षांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद.
  • ग्राहकांना वीज वितरक निवडण्याचे पर्याय.
  • सन 2022 पर्यत रेल्वेचे 100% विद्युतीकरण.
  • उज्वला योजनेत अजून 1 कोटी लाभार्थींची वाढ.

शिक्षण:

  • 758 नवीन एकलव्य आदिवासी शाळांची निर्मिती.
  • राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी सन 2022 पर्यंत 3000 कोटी रुपयांची तरतूद.

करासंबंधीचे वाद मिटवण्यासाठी अनेक योजना सुचवण्यात आल्या असून यामुळे वाद मिटण्यास मदत होईल अशी आशा आहे. अलीकडे अर्थसंकल्पीय तरतुदींव्यतिरिक्त महत्वाचे निर्णय घेऊन अर्थसंकल्पाचे महत्व कमी करण्याची प्रथा पडली असून हे सर्व खर्च भागवण्यासाठी काहीतरी मोठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करवाढ होण्याची शक्यता आहे. आजच्या अर्थसंकल्पाचे बारीकसारीक तपशील व त्याचे होणारे परिणाम याविषयी अधिक माहिती मिळणे अपेक्षित असून त्यासंबंधी आवश्यक असल्यास नंतर संवाद साधुयात!

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Budget 2021 Analysis in marathi, Budget 2021 Analysis Marathi mahiti, Budget 2021 Analysis Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.