Budget 2021 Highlights: इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे ! थोडक्यात महत्वाचे…

Reading Time: 3 minutes

Budget 2021 Highlights

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर केला. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या काही महत्वपूर्ण घोषणांवर टाकलेला दृष्टिक्षेप (Budget 2021 Highlights). 

कोरोना महामारीच्या संकटानंतर खालावलेली अर्थव्यवस्था आणि एकूणच कमी झालेला विकासदर या पार्श्वभूमीवर यावर्षीचे बजेट अत्यंत महत्वपूर्ण होते. दरवर्षी लाल ब्रिफकेसमध्ये बंद असणारे बजेट यावर्षी ब्रिफकेसऐवजी टॅबमध्ये होते. यावर्षी प्रथमच पेपरलेस बजेट सादर करण्यात आले असून आरोग्य सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला आहे.

https://bit.ly/3cvJx3l

Budget 2021 Highlights: अर्थसंकल्प 2021 – महत्वाच्या घोषणा 

आयकर (Income Tax)

 • बजेट म्हटल्यावर सर्वसामान्यांना उत्सुकता असते ती आयकर मर्यादेची. पण यावर्षी आयकर मर्यादेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 
 • ज्येष्ठ नागरिकांना आयकर कायदा अनुपालनाबाबत दिलासा दिला गेला आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात फक्त पेन्शन व व्याजाचा समावेश असेल, तर त्यांना आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही. 
 • छोट्या करदात्यांसाठी वाद निराकरण समितीचे (dispute resolution committee) स्थापन करण्यात येणार असून 50 लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेले आणि 10 लाख रुपयांपर्यंतचे विवादित उत्पन्न असलेले या समितीकडे तक्रार दाखल करू शकतात.
 • टॅक्स ऑडिटची मर्यादा वाढवून 10 कोटी पर्यत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी करदात्याचे 95% पेक्षा जास्त जमा/नावे व्यवहार डिजिटल माध्यमातून असणे आवश्यक आहे. 
 • सर्वात महत्वाची सुधारणा : जुन्या वर्षांच्या आयकर व्यवहारांची पुनर्तपासणी (Reopening of Scrutiny Assessments) मर्यादा 6 वर्षांवरून 3 वर्षे करण्यात आली आहे. 

आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर

 • या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला  अधिक  महत्व देण्यात आले असून त्यासाठी 2,23,846 रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम 137 टक्क्यांनी जास्त आहे. 
 • कोरोनाच्या लसीकरणासाठी रु. 35,000 कोटींची  तरतूद करण्यात आली आहे. 

बँकिंग आणि विमा 

 • या  अर्थसंकल्पामधील  सर्वात मोठी  घोषणा  म्हणजे, सरकारच्या खासगीकरण योजनेचा भाग म्हणून दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व एका सर्वसाधारण विमा कंपनीचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर तरतुदी सरकारमार्फत  करण्यात  येतील. 
 • विमा क्षेत्रातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे लवकरच LIC चा आयपीओ बाजारात विक्रीसाठी येणार आहे. 

आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सहा स्तंभांची रूपरेषा आखली आहे. यामध्ये –

 • आरोग्य आणि कल्याण (health and wellbeing), 
 • भांडवल आणि पायाभूत सुविधा (capital and infrastructure), 
 • समावेशक विकास (inclusive development), 
 • मानवी भांडवलाचे पुनरुज्जीवन (reinvigorating human capital), 
 • नवनिर्मिती वसंशोधन आणि विकास (innovation and  R&D)

शेती

 • शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपड MSP देणार.  
 • गहू उत्पादक शेतकऱ्यांना  मध्ये 75000 कोटी देणार.
 • 1000 कृषी उत्पादन विपणन समित्या (APMC) किंवा मंडळे ई-राष्ट्रीय कृषी बाजाराशी (e-NAM), जोडल्या जातील.

घरे 

 • यावर्षीच्या बजेटमध्ये घरांसंदर्भात करण्यात आलेली महत्वाची घोषणा  म्हणजे, कलम 80EEA अंतर्गत दीड लाखांपर्यंत अतिरिक्त सूट मर्यादा १ वर्षापर्यंत वाढवण्यात येणार आहे.
 • ग्राहकांना सदर योजनेचा फायदा 31 मार्च 2022 पर्यंत घेता येईल.
 • या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे.

कृषी सेस (Agri Infrastructure and Development Cess)

 • इंधन व मद्य याचबरोबरच अनेक वस्तूंवर कृषी सेस (Agri Infrastructure and Development Cess) आकारण्यात येणार आहे.पेट्रोलवर प्रति लिटर रु.2.5, डिझेलवर प्रति लिटर रु. 4 तर अल्कोहोलयुक्त पेयांवर 100% कृषी सेस आकारण्यात येणार आहे. 
 • या अतिरिक्त कृषी सेसमुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही, असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Budget 2021 Highlights: काय स्वस्त, काय महाग?

काय स्वस्त?

 • लोखंड, पोलाद, तांबे, स्टील व स्टीलची भांडी
 • शेतीची अवजारे
 • वीज
 • कपडे
 • विमा
 • सोने
 • चांदी

काय महाग?

 • इलेकट्रॉनिक वस्तू – मोबाईल, चार्जर, पॉवर बँक, इ. 
 • लेदर शूज 
 • सोलार पॅनल इन्व्हर्टर 
 • ऑटो पार्ट
 • जेम्स स्टोन

कोरोनाच्या कठीण काळानंतर आलेले हे पहिलेच बजेट. त्यामुळे या बजेटबद्दल अधिक उत्सुकता होती. बजेटनंतर बाजाराने घेतलेल्या उसळीने गुंतवणूकदार सुखावले आहेत.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Budget 2021 Highlights in Marathi, Budget 2021 Marathi, Budget 2021 Highlights Marathi Mahiti, Budget 2021 Highlights, Budget 2021 Highlights Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!