Financial year 2020-21
https://bit.ly/3rtXuUh
Reading Time: 2 minutes

Financial year 2020-21

२०२० हे वर्ष कसे बदलले व सगळी समीकरणे कशी बदलली? हे पाहताना आर्थिक वर्ष २०२० (Financial year 2020-21) या वर्षातून मिळालेल्या धड्यांकडेही लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून येत्या आर्थिक वर्षाची म्हणजेच २०२१ वर्षातील नवी सुरुवात अधिक उत्कृष्ट करता येईल.

सध्या भारतातील इक्विटी गुंतवणूकदारांचा आलेखही वाढत आहे. Tier-2 आणि Tier-3 शहरांमधील गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदार व ट्रेडर्स या खेळामध्ये भाग घेत आहेत. एआय आधारीत गुंतवणूक इंजिन्ससारखे तंत्रज्ञान हातासरशी सहज उपलब्ध  आहे. असे असले तरीही, शेअर बाजार हा गणितीय जोखीम व नफा यावर आधारीत खेळ आहे.

हे नक्की वाचा: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

Financial year 2020-21: आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण

धोके अनेकदा अदृश्य असतात: 

  • एखादी गोष्ट दिसतही नाही, पण तिचा बाजारावर प्रभाव पडतो, हे अनेकांना पटणार नाही, पण नियमितपणे गुंतवणूक करणाऱ्यांना हे माहिती आहे. 
  • कोरोना विषाणूसारखी अनेक संकटे बाजारात दिसतही नाहीत, पण हे पाहण्यासाठी विशेष दृष्टी असली पाहिजे. अन्यथा, ते फक्त सामान्य स्थिती राखून ठेवतात. 
  • उदा. २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सच्या घटनेनंतरची घसरण कुणालाही अपेक्षित नव्हती. पण ती घडली. 
  • फक्त मायकेल ब्युरी, फ्रंटपॉइंट पार्टनर्स, ब्राउनफील्ड कॅपिटल आणि यासारख्या काहींना ती दिसली, कारण त्यांनी खूप बारकाईने याकडे लक्ष दिले.  

प्रभावी पुनर्संतुलन: 

  • २०२० हे वर्ष जागतिक गुंतवणूकदारांना सजग करणारे ठरले. केवळ मोजके रिटर्न्स देणाऱ्या पर्यायांऐवजी इतर गुंतवणूक प्रकारांकडेही वळले पाहिजे, हा धडा मिळाला. 
  • पोर्टफोलिओ संतुलित असावा यासाठी गुंतवणुकदाराने बाजारातील घडामोडींबाबत नेहमीच विवेकी निर्णय घेण्याची गरज असते. 
  • अगदी पराकोटीच्या अस्थिरतेदरम्यान गुंतवणूक काढण्याची गरजही भासू शकते. पण ज्याप्रमाणे एक शिवण इतर धाग्यांना वाचवते, त्याप्रमाणे एखादी गुंतवणूक तुमचा पोर्टफोलिओ सशक्त करायला पुरेशी असते. 

महत्वाचा लेख: आपत्कालीन निधी किती असावा?

आर्थिक योजना बदलू शकतात, पण आर्थिक ध्येय नव्हे: 

  • तुमच्यासमोर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे असतात आणि ती साध्य करण्यासाठी अल्पकालीन योजना. 
  • काही वेळा बाजारातील घटनांच्या मालिकेमुळे आर्थिक नियोजन बदलू शकते. तरीही तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर परिणाम व्हायला नको. पण हे कसे करणार? 
  • पोर्टफोलिओची गुंतवणूक हा काही जुगार नाही. तो बाजाराची कामगिरी, अपेक्षित मागणी आणि तंत्रज्ञान व अंतर्दृष्टी देणाऱ्या इतर अनेक घटकांवर आधारीत असतो. तुम्हाला त्यांचा अंदाज आलाच पाहिजे.
  • कोरोनामुळे फार्म आणि हेल्थकेअर उत्पादनांची मागणी वाढेल हे स्वाभाविकच होते. त्यामुळे रुग्ण वाढू लागले, भारतात लॉकडाऊन झाले, तेव्हा निफ्टी फार्मा इंडेक्स आणि एस अँड पी बीएसई हेल्थकेअर हे क्षेत्र जवळपास दुपटीने वाढले. 
  • नोटाबंदीनंतर रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांना त्रास सहन करावा लागला, तर बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. 
  • थोडक्यात सांगायचे झाल्यास, घसरणीच्या काळात बाजारात नेहमीच संधी दडलेली असते. तुम्ही फक्त योग्य दिशेने पहायला हवे. 

तुमचा पोर्टफोलिओ समजून घ्या: 

  • २०२० मध्ये, भारतातील मोठ्या फंड व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या फ्रँकलिन टेम्पलटन यांनी ६ फंड्स स्थगित केले. 
  • या फंडांमुळे जवळपास २८,००० कोटी रुपयांचे एयुएम दिवाळखोरीत निघाले. असे घडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे, ते येस कॅपिटलने जारी केलेल्या झिरो कूपन डिबेंचर्सवर विसंबून होते. 
  • येस कॅपिटल ही येस बँक लिमिटेडची उपकंपनी आहे. फ्रँकलिन टेंपलटन यांनी हे फंड्स बंद करण्याआधी, या कंपनीतील गैरव्यवहारांची बातमी आली होती. 
  • दिवाळखोरीत गेलेल्या ६ पैकी ५ फंड्सवर येस बँकेच्या प्रमोटर्सना कर्ज दिले गेले. म्हणूनच, भविष्यातील नुकसान कमी करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ जास्तीत जास्त समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

तात्पर्य असे की, २०२० या वर्षाने गुंतवणुकदारांना पुन्हा एकदा आर्थिक नियोजन करण्याचा चांगलाच धडा दिला आहे. यामुळे नियमितपणे गुंतवणूक करणारे आणि नवीन गुंतवणूकदार या दोघांचाही पाया मजबूत होईल. नव्या सुरुवातींची हीच खरी वेळ आहे. 

श्री अमरजीत मौर्य

एव्हीपी- मिड कॅप्स 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…