Smallcase
Reading Time: 4 minutes

Smallcase

या लेखातून आपण ‘स्मॉलकेस (Smallcase)’ ही अभिनव गुंतवणूक संकल्पना आणि त्याचे फायदे तोटे समजून घेणार आहोत. स्मॉलकेस म्हणजे छोट्या आकारातील किंवा दुसऱ्या लिपीतील अक्षरं, हा शब्दप्रयोग येथे ‘वेगळ्या पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक’ अशा अर्थाने वापरला आहे. शेअरबाजारात गुंतवणूक करताना स्टॉक एक्सचेंजवरील नोंदणीकृत समभाग (Shares) थेट खरेदी करणे ही झाली प्रत्यक्ष खरेदी, तर म्युच्युअल फंड युनिट (MF Units) किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) बाजारातून किंवा त्याच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून (AMC) खरेदी करणे ही झाली अप्रत्यक्ष खरेदी. या दोन्हीपेक्षा स्मॉलकेस थोडी अभिनव अशी ही पद्धत आहे. या पद्धतीत गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणूक संकल्पनेप्रमाणे खरेदी करू शकतो. त्यांनी निश्चित केलेली गुंतवणूक कल्पना संच म्हणजे त्याने आधीच निश्चित केलेल्या शेअर्सची ही छोटीशी बास्केट असेल. 

हे नक्की वाचा: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का?

Smallcase: स्मॉलकेस 

  • म्युच्युअल फंड युनिट या संकल्पनेशी मिळता जुळता असा हा प्रकार असला तरी शेअर खरेदी करणे अथवा युनिट घेणे यापेक्षा हे थोडे वेगळे आहे. 
  • इथे तुम्ही स्वतंत्र शेअर किंवा एखाद्या योजनेचे युनिट न घेता आधीच निश्चित केलेला गुंतवणूक संच (Portfolio) खरेदी करता. 
  • डिसेंबर 2020 अखेर, एका अंदाजाप्रमाणे सध्या 20 लाखाहून अधिक लोक गुंतवणूक करण्याची ही पद्धत वापरत असून त्यांनी शेअरबाजारात ₹ 50000 कोटींहून जास्त गुंतवणूक केली आहे. ज्या सहजतेने आपण ओला उबर याच्या कॅब बुक करू शकतो तेवढ्याच सहजतेने येथे गुंतवणूक करू शकतो.
  • वेगवेगळ्या उद्देशाने आपली कल्पना वापरून निर्माण केलेले गुंतवणूक संच निश्चित करून अशा प्रकारची बास्केट तयार करता येणे शक्य आहे. 
  • सेबीकडे नोंदणी केलेली स्मॉलकेस निर्मितीच्या उद्देशाने स्थापन झालेली कंपनी, काही तज्ज्ञ व्यक्तींनी चालू केलेले स्टार्टअप किंवा छोट्या प्रमाणात वैयक्तिक गुंतवणूकदारही अशी स्मॉलकेस तयार करू शकतो ज्यामुळे बाजारात होणाऱ्या उतार चढावापासून किंवा एखाद्या विशिष्ठ स्टॉकशी संबंधित जोखीम विभागली जाते. 

स्मॉलकेस योजनेची माहिती

  • वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक कल्पनांवर आधारित वेगवेगळ्या स्मॉलकेस आहेत, यात एका क्लिकने खरेदी करता येते. म्युच्युअल फंड योजना या बाजारमूल्य (Market cap), किंवा विशिष्ठ उद्योग (Sectoral) असतात हे आपल्याला माहिती आहेच या सर्वांहून स्मॉलकेस अभिनव कल्पनेवर आधारित असतात, घसघशीत डिव्हिडंड देणारे स्टॉक, जास्त रिटर्न देणारे स्टॉक, विशिष्ठ मालमत्ता, विविध भार दिलेले स्टॉक या पैकी एक अथवा अनेक कल्पनांचे मिश्रण असते. 
  • यात निवडलेले विशिष्ट स्टॉक हे वेगवेगळ्या सेक्टर, मार्केट कॅप मधील असू शकतात. या साऱ्यांचा आपण वेळोवेळी आढावा घेऊ शकतो. त्यातील मॅनेज हा पर्याय वापरून एखादा स्टॉक खरेदी करून ऍड करू शकतो अगर विकून वगळून त्याचे स्मार्ट व्यवस्थापन शकतो.
  • स्मॉलकेस ही आपल्याकडेच असलेली गुंतवणूक असल्याने त्याचे पैसे आपल्या बँक खात्यातून जातील, तर खरेदी केलेले शेअर डी मॅट खात्यात जमा होतील. यातील गुंतवणूक कधीही वाढवता येईल अथवा मोडता येईल. या गुंतवणूकीत भर घालण्यासाठी एसआयपी सुद्धा करता येईल. मात्र एकाचवेळी सर्व स्टॉकची एक्सचेंजवर विक्री करता येणार नाही.
  • स्मॉलकेस ही पीएमएस ची छोटी आवृत्ती म्हणता येईल. यात करायची गुंतवणूक ही सध्या अशा प्रकारे तज्ज्ञ व्यक्तीची वैयक्तिक सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन व सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था फी आकारून देत असल्या तरी त्याची फी तुलनेत अत्यंत कमी आहे. 
  • अनेक फिनटेक स्टार्टअप कंपन्या, ब्रोकरेज फर्म यासाठी अत्यल्प फी, इतर नियमित कर व जी एस टी आकारून ही सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत. याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त छुपी फी अन्य सेवेसाठी द्यावी लागत नाही. नियमानुसार ब्रोकरेज द्यावे लागेल.  
  • जे लोक अशा प्रकारची सेवा डिस्काउंट ब्रोकिंग फर्म मधून घेत असतील त्यांना त्या फर्मच्या नियमानुसार खरेदीवर नव्हे, तर फक्त विक्री केली असता ब्रोकरेज द्यावे लागेल. 
  • जरी हे दिसताच क्षणी म्युच्युअल फंडासारखे वाटत असले आणि म्युच्युअल फंडाचे युनिटवर आपली मालकी असली तरी त्यांनी खरेदी केलेले शेअर्सची मालकी आपल्याकडे नसते. 
  • स्मॉलकेस योजनेनुसार खरेदी केलेले शेअर्स आपण खरेदी करून आपल्याकडेच ठेवत असल्याने त्यासाठी ट्रेंडिंग व डी मॅट खात्याची गरज आहे. 
  • म्युच्युअल फंड योजनेचे युनिट खरेदी करण्यासाठी त्यांची गरज नसते. अनेक लोकप्रिय ब्रोकरेज फर्मस आपल्या ग्राहकांना ही सेवा देत आहेत. यामध्ये धोक्याची विभागणी होत असल्याने तुलनात्मक दृष्टीने यात गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. तरीही योजनेची माहिती ही शिफारस समजू नये. म्युच्युअल फंड योजना व ही योजना यात मुलभूत फरक आहेत.

महत्वाचा लेख: म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे नक्की वाचा

स्मॉलकेस योजना – वैशीष्ट्ये  

  • यात योजनेवरील खर्च (Expense Ratio) नाही.
  • ही पारदर्शक योजना आहे. आपल्या म्युच्युअल फंडाने कोणत्या शेअर्सची खरेदी विक्री केली हे आपल्याला एक महिन्याने समजते.
  • 100% मालकी, आपले शेअर्स, आपल्याच खात्यात.
  • शेअर निवडण्याचा पद्धतीत मूलभूत फरक, त्यामुळे वेगवेगळे सेक्टर, मार्केट कॅप असलेले शेअर्स घेता येणे शक्य.
  • स्थिर खर्चात कपात, आपल्या मालमत्तेच्या किमतीच्या 1 ते 2% रक्कम अनेक प्रकारच्या स्थिर खर्चात जात असते जसे जाहिरात खर्च, वितारकाचे कमिशन ई.
  • मालकी हक्क गुंतवणूकदाराकडे.
  • करआकारणीत फरक आहे. स्मॉलकेसमध्ये शेअर्स गुंतवणूकदाराच्या खात्यात असल्याने त्यावरील कर भरण्याची जबाबदारी गुंतवणूकदारांची असते. म्युच्युअल फंडाच्या खरेदी विक्री व्यवहारांवर सध्या कर आकारणी केली जात नाही.  

स्मॉलकेसचे फायदे

  • गुंतवणूक केंद्रित अशी निश्चित योजना
  • गुंतवणूकदारास संशोधन करायची गरज नाही
  • गुंतवणूकसंचात आवश्यक बदल करून त्याचा समतोल राखणे शक्य.

स्मॉलकेसचे  तोटे

  • किमान गुंतवणूक अधिक, म्युच्युअल फंड योजनेत किमान गुंतवणूक 5 हजार असते, तर पीएमएस योजनेत तीच किमान 50 लाख होते. 
  • या तुलनेत यातील किमान गुंतवणूक थोडी अधिक असून अशी योजना चालू असणाऱ्याकडे त्याची चौकशी करावी.
  • एस आय पी ची रक्कमही जास्त.
  • यातील सर्वच शेअर चालू बाजारभावाने एकाच वेळी घ्यावे लागतात त्यामुळे भाव कमी असताना केलेल्या खरेदीमुळे होणारा फायदा येथे मिळत नाही.
  • स्मॉलकेस निर्मात्यांनी केलेल्या संशोधनास आधार काय हे समजण्यास कठीण आहे.त्यामुळे धोका नक्की विभागला जाईल का? याबाबत साशंकता.
  • अशा योजना प्रत्यक्षात वापरात सन 2018 पासून आल्याने यापूर्वीचा कोणताही कामगिरी इतिहास नाही त्यामुळे त्याचे मूल्यमापन करण्यास अधिक कालावधी जावा लागेल.
  • योजना री बॅलन्स करण्यास निर्मात्याची मदत नसल्याने गुंतवणूकदाराने खरेदी विक्री केल्यास नेमके काय होईल त्याचा अंदाज बांधणे अशक्य.

विशेष लेख: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ? 

स्मॉलकेस संकल्पनेचे निर्माते, वसंथ कामत हे आय आय आयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या मित्रांच्या साहायाने सन 2015 मध्ये अशा प्रकारची फिनटेक कंपनी चालू केली आणि तरुण  गुंतवणूकदार आपल्याकडे आकृष्ट व्हावेत, त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपली गुंतवणूक करावी असे उद्दीष्ट ठेवले. सन 2018 पासून या कल्पनेस उभारी मिळून अनेक गुंतवणूकदार याकडे आकर्षित झाले. डिसेंबर 2020 ला या स्टार्टअपमध्ये एचडीएफसी बँक, डिएसपी गृप आणि काही परदेशी थेट गुंतवणूकदारांनी भांडवली सहभाग घेतला. गुंतवणूकदार, दलाल, सल्लागार आणि बाजारातील अन्य मध्यस्थ यांनी एकत्र येऊन भांडवलबाजारास पूरक वातावरण निर्मिती करावी असा या कंपनीचा मुख्य हेतू होता. या योजनेतील त्रुटींवर मात करण्याचे अनेकांचे प्रयत्न चालू असून भविष्यात अनेक गुंतवणूक स्नेही बदल त्यात अपेक्षित आहेत.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…