तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत

Reading Time: 3 minutes

दैनंदिन आयुष्यात मिळणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दिवसभराचा वेळ. वेळ मोफत मिळतो पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही. 

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा वेळ आपण योग्य प्रकारे कसा कारणी लावतो यावरून तो दिवस कसा पार पडला, हे ठरवलं जावू शकतं. रोजच्या वेळेचं नीट व्यवस्थापन आणि नियोजन करणं ही फार मोठी गोष्ट नक्कीच नाही, पण आपण स्वत:ला आणि स्वत:च्या क्षमतेला ओळखून किती आणि कसं काम करू शकतं याच योग्य आणि अचूक नियोजन आपल्याला ध्येयप्राप्तीच्या दिशेने घेऊन जावू शकतं. या सगळ्या सोप्या किंवा अवघड गोष्टी कशा हाताळायच्या याविषयीचं योग्य मार्गदर्शन डौग्लस् हॉफ्सटॅडर यांनी त्यांच्या सिद्धांतातून केले आहे.

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

  • त्यांना असे सांगायचे आहे की, “ठरवलेले किंवा हाती घेतलेलं काम पूर्ण होण्यापूर्वीच ते काम आपण अमुक वेळेत पूर्ण करू शकतो, असं जरी ठरवलं तरी तो वेळ आपल्या अंदाजापेक्षा दुप्पट गृहीत धरावा, कारण त्या वेळेत ते काम पूर्ण नाही होऊ शकले, तर येणारा निरुत्साह किंवा नाराजी कामात पुन्हा व्यत्यय आणू शकते. कामाप्रती प्रामाणिक असणं जितकं महत्त्वाचे असतं तितकंच व्यत्यय आणणा-या गोष्टींपासून स्वत:ला लांब ठेवणं गरजेचं असतं.”
  • हल्ली सोशल मिडीयाचा जास्त वापर, गप्पा-टप्पा, उगाचच येणारं नैराश्य, आळशीपणा, एकटेपणा, शारिरीक अशक्तपणा ,आजचं काम उद्यावर ढकलणे म्हणजे कामाची चालढकल या सर्व गोष्टींमुळे तरूण पिढी जी विशिष्ट कामात व्यग्र असायला हवी, ती मात्र भरकटलेली वाटते, याचं त्यांच्या तोंडून येणारं कारण म्हणजे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. आणि हो पुरेसा वेळ जरी मिळाला तरी ठरवलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण होतीलच असेही नाही, याचं चांगलं योग्य उत्तर हॉफ्सटॅडर यांनी सांगितले आहे. 
  • मर्फीच्या सिद्धांताप्रमाणे, जर एखादी गोष्ट चुकीची घडणार असेल, तर ती घडतेच. थोडक्यात परिस्थितीच तशी होते. पण हॉफ्सटॅडरच्या म्हणण्यानुसार आपण दैनंदिन आयुष्याचं योग्य नियोजन केलं, तर आपण निश्चितच योग्य वेळेत यश प्राप्तीचा आनंद घेऊ शकतो. कॉम्प्युटर प्रोग्रॅमरच्या मते त्यांनी हाती घेतलेले मोठ-मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हॉफ्सटॅडरचा सिद्धांत उपयोगी पडतो. 
  • एकाच वेळी अनेक काम करण्याच ठरवणं आणि सगळेच पूर्ण व्हावेत अशी इच्छा ठेवणं ब-याचदा नुकसानकारक ठरतं. कामाच्या नियोजनात स्वत:साठी काहीसा विरंगुळा ही असावा, जसं की आवडता पदार्थ स्वत: बनवून पाहणे, टिव्हीवर आपला आवडता कार्यक्रम पाहणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे, अशा काही गोष्टींमुळे पुन्हा काम सुरू ठेवण्यास उत्साह वाटतो. मात्र एखाद्या दूरच्या टूरसाठी अचानक नियोजन करणं, अचानक आजारी पडणं, काही समारंभासाठी जाणं येणं यासारख्या गोष्टींमुळे अप्रत्यक्षरित्या कामाची चालढकल होते, कामात व्यत्यय येतो. 
  • दिवसभरात कोणत्या वेळी आपण स्वत: कामासाठी छान वेळ देऊ शकतो त्याचवेळी शक्य असणारी कामं हातावेगगळी केली की कामाचा भार साचून राहत नाही. कोणती काम आपण सहज करू शकतो, त्यासाठी काय गरजेचं आहे याची योग्य आखणी केव्हाही फायद्याची ठरते. 
  • हे झालं आठवडाभरात काय करायचं याचं नियोजन, सुट्टीच्या दिवशी मात्र आपण निवांत होण्याच्या विचारात असतो, समोर असणारी कामे पुढे ढकलून विश्रांती घ्यावी किंवा बाहेर पडावे असा विचार येणं अगदी स्वाभाविकच आहे. सवयीप्रमाणे आपण आपल्याकडे सुट्टी चा भरपूर वेळ आहे, असं समजतो त्यातच कामाची चालढकल होणे अटळ असते. हॉफ्सटॅडरच्या सिद्धांताप्रमाणे काम पूर्ण होण्यास अपेक्षापेक्षा जास्त वेळ लागतो, तेव्हा आपलं वेळेच नियोजन त्याचप्रमाणे असायला हवं. याची काही उदाहरणे ही देता येतील. 
  • सिडनेच ओपेरा हाऊस १९५७ साली पूर्ण होईल असा अंदाज होता पण ते प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी १९६३ सालापर्यंत वाट पहावी लागली. 
  • अमेरिकन संज्ञानात्मक शास्त्रज्ञ हॉफ्सटॅडर यांनी उपरोधिक पद्धतीने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे प्रमाणे दैनंदिन आयुष्याच केलेलं नियोजन ध्येयाच्या दिशेने असलेला प्रवास सोयीस्कर बनवू शकतो. नियोजन होण्यास विलंब लागला तरी चालेल, पण त्याचबरोबर येणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अडचणी लक्षात घ्यायला हव्यात. 

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

  • कोणतेही हाती घेतलेले काम पूर्ण होण्यासाठी त्या कामाप्रती विशेष प्रेरणा मिळणं गरजेचं असतं. होय, एखाद्या गोष्टीविषयी मिळणारी प्रेरणाच ते काम पूर्णत्वास नेऊ शकतं. जसं की भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळक, सावरकर यासारख्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी लिहिलेले लेख तरूण पिढीला इंग्रजांविरुद्ध भडकवण्यासाठी प्रेरणादायी ठरली. घरात प्रचंड उर्जा असणारं लहान बाळ घरातल्या प्रत्येकासाठी उत्साहाचा स्रोत बनून जातं. एखाद्या संस्थेत असणारा व्यवस्थापक त्याच्या कर्मचा-यांना जितकं जास्त प्रेरित करेल तितकं ते काम यशस्वीपणे करू शकतील. कित्येक दशकांपासून हे सिद्ध झालेलं आहे की यशस्वीपणे वाहून नेलेल्या कार्यामागे विशिष्ट प्रेरणा जागृत असावी लागते. 
  • एखाद्या संस्थेतील कर्मचारांच्या मनात व्यवस्थापक किंवा मॅनेजर त्यांच्यासाठी झटतो आहे, असा विश्वास असेल, तर ते काम अधिक उत्साहाने करू शकतात. कर्मचा-यांच्या केलेल्या कामाचं योग्य कौतुक होत असेल, तर ते त्या संस्थेच्या प्रगतीत भर पाडतं. केलेल्या कामाची योग्य पावती मिळणं गरजेचं असतं. याच्याही पलिकडे संस्थेसाठी काम करणारे सर्व कर्मचारी किती आनंदी आणि उत्साही आहेत यावर त्या संस्थेचं यश अवलंबून असतं आणि यामुळेच सातत्याने प्रगती साध्य होऊ शकते. थोडक्यात कामाविषयी आदर, प्रेरणा आणि समाधान या गोष्टी यशप्राप्तीसाठी महत्त्वाच्या असतात.

कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *