Mutual Fund
Reading Time: 3 minutes

Mutual Fund

गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. आजच्या लेखात आपण “म्युच्युअल फंड” म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ.

आपल्याला गाडी चालवता येत असते, गाडीत पुरेसे इंधनही असते, गाडी उत्तम स्थितीतही असते आणि भरधाव गाडी चालविण्याची इच्छाही असते, पण परिसर नवा असतो…रस्ते, वळणे, खाणा खुणा  सगळेच नवे आणि अनोळखी असते. अशावेळेला आपण नेव्हिगेशनची मदत घेतो किंवा कुणा माहितगाराला विचारतो….याच माहितगार किंवा नेव्हिगेशनचे काम आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्यअल फंड्स करतात.  

हे नक्की वाचा: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ? 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा येण्यासाठी तांत्रिक (Technical) आणि मूलभूत मूलभूत विश्लेषण (fundamental analysis) करणे गरजेचे असते. कोणत्या कंपनीचे शेअर कधी विकत घ्यावे व ते किती काळ ठेवावे, कधी विकावे इ. इ. साठी शेअर मार्केटचा दीर्घकाळ अभ्यास असणे गरजेचे असते कारण लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीत शेअर बाजार हे चक्रवाढ व्याजाने परतावा देणारे माध्यम आहे. आणि सर्वसामान्य व्यक्तीसाठी म्युच्युअल फंड हे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. 

म्युच्यअल फंड्स म्हणजे नक्की काय ?

  • म्युच्यअल फंड ही शेअर बाजारात गुंतवणुकीची सरकारमान्य योजना आहे.  
  • जेंव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता तेंव्हा तुमचे आणि तुमच्या सारख्याच इतर गुंतवणूकदाराचे पैसे म्युच्युअल फंड एकत्र करते व ते पैसे वेगवेगळ्या शेअर्स व इतर ठिकाणी गुंतवते, जेणेकरून तुमच्या निवडलेल्या योजनेच्या आणि कालमर्यादेच्या आधारावर तुम्हाला परतावा मिळवता येतो. 
  • गुंतवणूक निर्धोक व खात्रीच्या परताव्याची व्हावी यासाठी म्युच्युअल फंडांनी तज्ज्ञ फंड मॅनेजर नेमलेले असतात, ते शेअर मार्केटचा अंदाज घेतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात.

गुंतवणुकीचे मूल्यांकन

आपल्या गुंतवणुकीचे दोन भागात मूल्यांकन केले जाते एक म्हणजे NAV आणि दुसरे म्हणजे Units. 

युनिट्स (Units): गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणार समभाग. यावर गुंतवणूकदाराची थेट मालकी असते. गुंतवणुकीचा काळ कितीही असला तरी युनिट्स स्थिर राहतात व गुंतवणुकीचे थेट मूल्य दर्शवितात

एनएव्ही (NAV): हे Net Asset Value चे संक्षिप्त रूप आहे. शेअर बाजाराच्या उतार चढावानुसार याची किंमत दोलायमान होत असते. बदलत्या NAV नुसार आपल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन रोजच्या रोज बदलत असते. त्याचे सूत्र खालील प्रमाणे 

गुंतवणुकीचे मूल्यांकन =  युनिट्स (Units)  X  गुणिले एन.ए.व्ही.(NAV)

महत्वाचा लेख: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

गुंतवणुकीचा कालावधी 

  • म्युच्यअल फंड्स हे दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीचे साधन आहे. त्यामुळे त्यांच्या किंमतीत रोज काही ना काही बदल होत असले तरी दीर्घ पल्ल्याचा परतावा हा निश्चितच फायद्याचा ठरतो. 
  • चांगल्या प्रमाणात परतावा हाती येण्यासाठी कमीतकमी ५ वर्षांसाठी तरी गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. 
  • तसेच रोजच चढ-उत्तर होणार हे स्वाभाविक असल्याने गुंतवणूकदारांनी रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचा आढावा न घेता तो किमान ६ महिन्यांनी घ्यावा असेच तज्ज्ञांचे मत आहे. 
  • सन १९७९ साली जेव्हा सेन्सेक्सची सुरुवात झाली तेव्हा निर्देशांक १०० वर होता, १८ सप्टेंबर २०१८ रोजी तो ३७२९० पर्यंत पोहोचला. सरासरी पाहता मागच्या ३९ वर्षात सेंसेक्सने वार्षिक १७% दराने परतावा दिलेला आहे.

 

म्युच्युअल फंडाचे प्रकार

१. समभाग आधारित योजना

  • लार्ज कॅप: 
    • ८०-१००% पर्यंत गुंतवणूक
    • मोठ्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक
    • खात्रीशीर लाभांश
    • दीर्घकाळासाठी SIP गुंतवणुकीसाठी फायद्याचे
  • मल्टी कॅप
    • माध्यम आणि मोठ्या आकाराच्या संस्था
    • गुंतवणुकीत अधिक विविधता
    • जोखींम कमी, उत्तम परतावा
    • लार्ज कॅपच्या तुलनेत जास्त बाजाराच्या चढउतारावर अवलंबून
    • लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर
  • मिड कॅप
    • ८०-१००% वाढत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
    • मोठ्या कंपन्यासारखेच नियमित लाभांश
    • बाजारातील चढ उतारावर अवलंबून
    • लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर
  • स्मॉल कॅप
    • ८०-१००% वाढत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
    • मोठ्या कंपन्यासारखेच नियमित लाभांश
    • बाजारातील चढ उतारावर अवलंबून
    • लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर

विशेष लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

२. कर्जरोखे आधारित योजना

  • लिक्विड स्कीम
    • मनी मार्केट, अल्प मुदतीतील कर्ज रोखे इ. मध्ये गुंतवणूक
    • जास्तीत जास्त ९० दिवसांचा कालावधी
    • अगदी २-४ दिवस ते काही महिने असा गुंतवणुकीचा कालावधी
    • जवळपास कोणतीही जोखीम नाही.
  • शॉर्ट टर्म बॉण्ड स्कीम
    • एक वर्ष मुदतीसाठी
    • शेअर बाजाराची जोखीम नाही
  •  कॉर्पोरेट बॉण्ड स्कीम
    • तीन वर्षे किंवा अधिक मुदतीसाठी
    • शेअर बाजाराची जोखीम नाही

अशाप्रकारे १९८६ पासून सरकारी आणि १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडांना भारतात मान्यता मिळाली असून त्यांनी आर्थिक क्षेत्रात बऱ्यापैकी आपले बस्तान बसविले आहे. आजमितीला देशात ४३ म्युच्यअल फंड्स कार्यरत असून त्यांची उलाढाल येत्या ५ वर्षात ५० लाख करोड पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तरी म्युच्यअल फंड हे आपल्या वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य आणि जलद परताव्याचे माध्यम असले तरी, जसे जाहिरातीत सांगतात,

“Mutual Fund investments are subject to market risk. Please read the offer document carefully before investing”

(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Mutual Fund Marathi Mahiti, Mutual Fund in Marathi, Mutual Fund mhanje kay, Mutual Fund investment Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…