Aptus Value Housing Finance
गृहकर्ज देणाऱ्या क्षेत्रातील मोठं नाव ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग (Aptus Value Housing Finance)’ कंपनी आपला आयपीओ घेऊन आली आहे. घराचं बांधकाम, नवीन घर खरेदी, घर सुधारणा या सर्व गरजांसाठी लोकांना तत्परतेने मदत करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ या कंपनीने काही वर्षांपूर्वी मालमत्ता विमा सुद्धा सुरू केल्याने त्यांच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि ही कंपनी खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झाली.
‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ च्या आयपीओ संदर्भातील ९ महत्वाच्या गोष्टी :
१. आयपीओची तारीख:
- १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या ३ दिवसात हा आयपीओ सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.
२. आयपीओची किंमत:
- ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ कंपनीच्या आयपीओ च्या प्रत्येक समभागाची किंमत रु. ३४६ ते रु. ३५३ रुपये इतकी असणार आहे.
३. पब्लिक इश्यू:
- ५०० कोटी इतकी उलाढाल अपेक्षित असलेल्या या नवीन आयपीओ सोबतच पद्म आनंदन यांचे २५ कोटी शेअर्स, आरावली इन्व्हेस्टमेंटचे १९७ कोटी शेअर्स अशा इतर शेअर्सची सुद्धा विक्री करण्यात येणार आहे.
४. आयपीओचा उद्देश:
- Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कंपनीच्या एकूण मालमत्तेपैकी ५५% भाग हा वेस्टब्रिज कॅपिटल, सेक्विया कॅपिटल, स्टेडव्यूह कॅपिटल आणि मलाबार इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांनी विकत घेतलेला आहे.
- या आयपीओचा उद्देश २७८० कोटी रुपये गोळा करून कंपनीचा आर्थिक पाया भक्कम करणे आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी स्वतःला तयार करणे हा आहे.
५. कंपनीची माहिती:
- डिसेंबर २०२० च्या माहिती नुसार ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ कंपनीच्या एकूण १८१ शाखा आहेत आणि कंपनीची एकूण मालमत्ता ही ३७०० कोटी रुपये इतकी आहे.
- मार्च २०२० मध्ये कंपनीला २११.०१ कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. आदल्या वर्षी हा निव्वळ नफा १११.५६ कोटी रुपये इतका होता.
- ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ कंपनीवर सध्या कोणतंही कर्ज नाहीये. कंपनीने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीने ८७८ कोटी रुपये इतक्या गृहकर्जाचं वाटप केलं आहे.
- सुरुवातीपासूनच कंपनीने आपलं ग्राहक लक्ष्य हे मध्यमवर्गीय लोक हे ठेवलं आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील कित्येक गरजू लोकांनी ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ कंपनीच्या विविध कर्ज योजनांचा फायदा घेतला आहे.
६. कंपनीची ध्येय धोरणं:
- सामान्य नागरिकाला बँकांच्या क्लिष्ट नियम आणि संथ कामाच्या पध्दतीचा त्रास होऊ नये यासाठी Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कंपनीची २००८ मध्ये स्थापना करण्यात आली होती.
- तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटका आणि तेलंगणा मधील छोट्या गावातील लोकांना अर्थसहाय्य करून आपली सुरुवात केली होती.
- कमीत कमी ७.५ लाख आणि जास्तीत जास्त २५ लाख इतकी गृहकर्जाची किंमत ठेवून कंपनीने नियमित कर्ज परत करणाऱ्या एका ठराविक वर्गालाच अर्थसहाय्य करण्याचं ठरवलं आहे. दक्षिण भारत हा त्यांच्या ग्राहकांचा प्रमुख भाग आहे.
- “सामान्य माणसाचं स्वतःचं घर असावं” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनच कंपनीने आपली ध्येय धोरणं काहीशी भावनिक सुद्धा ठेवली आहे.
७. कंपनीची आर्थिक प्रगती:
- आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीने ३४.५% या दराने आर्थिक प्रगती केली आहे. २०२०-२१ मध्ये ४१.९% या दराने आर्थिक प्रगतीचा दर राखून ठेवला आहे.
- ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ च्या आर्थिक कमाईतील ५०% वाटा हा गृहकर्जातून येतो, तर ५०% हे घर सुधारणा करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजातून होत असते. येत्या आर्थिक वर्षात कंपनीने २१% निव्वळ नफ्यात वाढ होण्याची ग्वाही दिली आहे.
- आपल्या गृहकर्जाचे ग्राहक केवळ दक्षिण भारतात मर्यादित न ठेवता पूर्ण भारतात सेवा देऊन हा नफा ३५% इतका वाढेल इतकी यंत्रणा कंपनीने आधीच उभी करून ठेवली आहे.
८. कंपनीची मॅनेजमेंट :
- मुरुगप्पा ग्रुपचे माजी डायरेक्टर एम आनंदा हे ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ कंपनीचे संस्थापक आहेत.
९. गुंतवणूकदारांसाठी महत्वाच्या तारखा :
- १८ ऑगस्ट ला तुमच्या समभागांचं वाटप कंपनी करणार आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटला हे समभाग दिसण्याची तारीख २३ ऑगस्ट ही देण्यात आली आहे.
मागील दोन वर्षातील शेअर मार्केट चा ट्रेंड बघता ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ च्या आयपीओ मधून ग्राहकांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला आहे.
गृहकर्ज आणि तत्सम व्यवसाय हे सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या धोरणावर सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ सारख्या कंपनीत गुंतवणूक करतांना आजचा स्मार्ट ग्राहक तो धोका सुद्धा लक्षात घेईल असा अंदाज आहे. दुरदृष्टी असलेले गुंतवणूकदार या आयपीओमध्ये गुंतवणूक करु शकतात.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Aptus Value Housing Finance IPO Marathi Mahiti, Aptus Value Housing Finance IPO Marathi, Aptus Value Housing Finance Marathi