P/E Ratio
Reading Time: 4 minutes

P/E Ratio

आजच्या लेखात आपण शेअर बाजारातील महत्वाची संकल्पना पी. ई. रेशो (P/E Ratio) म्हणजे किंमत-उत्पन्न गुणोत्तर याबद्दल माहिती घेऊया.  समजा आपणाकडे एखाद्या उद्योग-धंद्याचा मालक आला आणि आपली ऐपत पाहून त्याच्या उद्योगात भांडवलासाठी गुंतवणूक करा म्हणून जर गळ घालू लागला तर आपण कशाच्या आधारे गुंतवणूक करावी किंवा नको हे ठरवणार? अर्थातच त्याचा उद्योग काय आहे, त्याचे उत्पादन कसे आहे, आजवर तो उद्योग तोट्यात आहे की नफ्यात, भविष्यात त्याची वाटचाल कशी असू शकते, या सर्व बाबींचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार ना?

मग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.

हे नक्की वाचा: शेअर बाजारात गुंतवणूक करताना मुलभूत विश्लेषण का महत्वाचे आहे?

१. किंमत-उत्पन्न गुणोत्तर:

  • ‘P’ म्हणजे ‘Price’ अर्थात किंमत आणि ‘E’ म्हणजे ‘Earning’ अर्थात उत्पन्न या दोघांचे गुणोत्तर म्हणजे ‘पी/ई रेशो’; मराठीत ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’.
  • उदाहरणार्थ,‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ जास्त असेल तर कंपनीच्या उत्पन्नाच्या तुलनेत स्टॉकची किंमत जास्त आहे असे समजावे. त्याचप्रमाणे,  कमी ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ असेल तर समजावे की या कंपनीच्या उत्पन्नाच्या तुलनेत शेअरची किंमत कमी आहे.
  • कंपनीच्या स्टॉकचे मूल्य ठरवताना उत्पन्न महत्त्वपूर्ण असते; कारण गुंतवणूकदारांना जाणून घ्यायचे असते की कंपनी किती फायदेशीर आहे आणि भविष्यात तिचे मूल्य काय असेल. 
  • जर कंपनीची वाढ आणि उत्पन्नाची पातळी कायम राहिली, तर ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तरा’नुसार कंपनीला शेअरसाठी दिलेली रक्कम परत करण्यास किती वर्षे लागतील याचीसुद्धा पडताळणी केली जाऊ शकते.
  • गुंतवणूकदार प्रामुख्याने या गुणोत्तराकडे पाहतात कारण यामुळे कंपनीच्या मूल्याची व्यवस्थित जाणीव होते आणि त्यांना एका शेअरसाठी किती पैसे मोजणे फायद्याचे ठरू शकते याचा व्यवस्थित अंदाज येतो.

२. किंमत-उत्पन्न गुणोत्तर कसे ठरते?

  • गुंतवणूकदारांना सहसा गुंतवणूक करण्यापूर्वी इक्विटी शेअरची मूळ किंमत जाणून घेणे आवडते. ते जोखमी, परतावा, कॅश फ्लो आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स अशा विविध पैलूंवरून त्याचे विश्लेषण करतात.
  • मूल्यांकनाच्या इतर तंत्रांपैकी, ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ हे शेअरच्या विश्वासार्हतेचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक साधनांपैकी एक आहे.
  • ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ हे एका शेअरच्या बाजारभावाचे मूल्य आणि प्रति शेअर उत्पन्न यांच्या गुणोत्तरातून मोजले जाते.
  • उदाहरणार्थ, ‘अबक’ नावाची एक कंपनी आहे. तिच्या शेअरचे बाजार मूल्य १०० रुपये आहे आणि प्रति शेअर उत्पन्न १० रुपये आहे. तर P/E = १००/१० = १०
  • याचाच अर्थ अबक या कंपनीचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ ९ आहे. म्हणजेच कंपनीच्या प्रतिरूपया उत्पन्नसाठी गुंतवणूकदार ९ रुपये देण्यास तयार आहेत असे समजावे.

३. ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ पाहून गुंतवणूक करावी की नाही हे कसे समजते?

  • ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ उद्योगांनुसार बदलते. त्यामुळे त्या संबंधित कंपनीसारख्या त्याच क्षेत्रातील दुसऱ्या एखाद्या साधारण त्याच क्षमतेच्या कंपनीच्या किंमत-उत्पन्न गुणोत्तराची तुलना करून आपल्याला ते गुणोत्तर कमी आहे किंवा जास्त हे समजते.
  • हिरे, खते यांसारखी उत्पादने असणाऱ्या उद्योगांचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ कमी असल्याचे पहायला मिळते.
  • या उलट एफएमसीजी, फार्मा आणि आयटी सारखी इतर क्षेत्रे आहेत ज्यात सामान्यतः ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ जास्त असते.

महत्वाचा लेख: शेअर्स खरेदीचं सूत्र

४. किंमत-उत्पन्न गुणोत्तराच्या प्रमाणावरून काय ठरते?

जास्त ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’:

  • एखाद्या उद्योगाचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ जास्त असल्यास त्याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्न वाढीविषयी त्या उद्योगाकडून जास्त अपेक्षा आहेत त्यामुळे ते गुंतवणूक म्हणून अधिक पैसे देण्यास तयार आहेत. अशावेळी आपण उच्च ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ असणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक निवडण्याचा विचार करू शकता.परंतु उच्च ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ असणाऱ्या उद्योगांत गुंतवणूक करण्याआधी हे सुद्धा आपणास लक्षात घ्यायला हवे की स्टॉकच्या किमतीची वाढ ही अंदाज करण्याच्या पलीकडे असते. कधीही कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे अगदी अविचारीपणे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ जास्त दिसले म्हणून लगेच गुंतवणूक करणे कधी धोक्याचेही ठरू शकते.
  • खाजगी बँक क्षेत्रात कोटक महिंद्रा, राष्ट्रीयीकृत बँक क्षेत्रात यूको बँक आणि दुचाकी-तीनचाकी वाहन क्षेत्रात महाराष्ट्र स्कूटर्स यांचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त आहे.

कमी ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’:

  • कमी ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ असलेली कंपनी खराब कामगिरीचे संकेत असते. त्यामुळे यातील गुंतवणूक ही तोट्याची गुंतवणूक असल्याचे सिद्ध होऊ शकते.
  • अर्थात, जर तुमचा गुंतवणूक विषयीचा अभ्यास दमदार असेल तर अशा कमी मूल्यांकनाच्या उद्योगांत गुंतवणूक करून देखील एका ठराविक वेळमर्यादेत चांगली कमाई करू शकता.
  • खाजगी बँक क्षेत्रात कर्नाटका बँक, राष्ट्रीयीकृत बँक क्षेत्रात इंडियन बँक आणि दुचाकी-तीनचाकी वाहन क्षेत्रात हिरो मोटोकॉर्प यांचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे.

न्याय्य ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’:

  • न्याय्य ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ मोजण्याचे गणितीय सूत्र काहीसे वेगळे आहे.
  • ते गणित समजून घेण्याच्या फंद्यात न पडता एवढे जरी समजून घेतले की जर सध्याचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ ‘न्याय्य किंमत-उत्पन्न गुणोत्तरा’पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ असा होतो की कंपनीचे मूल्य कमी आहे. तो स्टॉक खरेदी केल्यास काही काळाने नफा मिळू शकतो.

नकारात्मक ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’:

  • कधीकधी काही कंपन्यांचे ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ वजा/ नकारात्मक होत चालले आहे असे आढळते. याचा अर्थ असा की ती कंपनी पैसे गमावत आहे किंवा ती तोट्यात चालली आहे.
  • सतत नकारात्मक ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये कारण ते दिवाळखोर होऊ शकतात.

विशेष लेख: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? 

५. ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तरावर अवलंबून राहण्याचे संभाव्य धोके:

  • ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तरा’चे मोजमाप केवळ इक्विटी शेअरचे बाजारमूल्य आणि उत्पन्न यांवरच अवलंबून असते. ते कंपनीच्या कर्जाचा विचार करत नाही. त्यामुळे केवळ ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तराकडे पाहून गुंतवणूक करणे तोट्याचे ठरू शकते.
  • ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ काढताना उत्पन्न स्थिर राहील असा विचार त्या मोजमापामागे असतो परंतु उत्पन्न इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने अस्थिरता येऊ शकते.
  • गुंतवणूकदार म्हणून अशी कंपनी फायद्याची असते जिचा ‘कॅश फ्लो’ सतत वाढता असेल. परंतु ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ कंपनीचा ‘कॅश फ्लो’ येत्या वर्षांमध्ये वाढणार आहे की कमी होणार हे दर्शवत नाही.

एकंदर असे की, जरी ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’ हे शेअर्सच्या मूल्यांकनासाठी एक अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय साधन असले,  तरीही आपण त्या एकाच गोष्टीवर अंधपणे विसंबून राहू शकत नाही. आपण योग्य निर्णयावर येण्यासाठी इतर मूल्यमापन तंत्रांचासुद्धा वापर करायला हवा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: P/E Ratio in Marathi, P/E Ratio Marathi Mahiti, P/E Ratio Marathi, P/E Ratio mhanje kaay 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…