Fundamental Analysis
Reading Time: 3 minutes

Fundamental Analysis

शेअर बाजारात गुंतवणूक करतांना ट्रेडर्स व गुंतवणुकदार मुलभूत विश्लेषण (Fundamental analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) अशा दोन पद्धतीने अभ्यास करतात. शेअर बाजारातील चाणक्ष, हुशार गुंतवणूकदार दोन्ही पद्धतीचा वापर करून खूप नफा मिळवतात. मुलभूत विश्लेषण ही अधिकतर कला (Arts) असून, तांत्रिक विश्लेषण हे कला आणि शास्त्र (Arts + Science) यांचे मिश्रण आहे. आपण या लेखात मुलभूत विश्लेषण म्हणजे काय व ते कसे करतात ते समजून घेऊया. 

हे नक्की वाचा: Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार  

मुलभूत विश्लेषण (Fundamental analysis)

  • मुलभूत विश्लेषण म्हणजे एखाद्या कंपनीच्या समभागाच्या अंतर्गत मुल्याचे मूल्यांकन करण्याची एक विशिष्ट प्रणाली होय. 
  • ते करत असताना त्याचा पाया किती मजबूत आहे हे पाहिले जाते. तसेच यामध्ये शेअरच्या एक दिवसाच्या चढ – उताराच्या  किमंतीकडे लक्ष दिले जात नाही तर, भविष्यातील त्याची किमंत किती वाढू शकेल या दृष्टीने त्याच्या चालू भावाकडे पाहिले जाते. 
  • कंपनीचा समभाग विकत घेण्याअगोदर ती किती उत्तम  व्यवसाय करीत असून त्यावरून भविष्यात किती भाव होऊ शकेल ते तपासून पाहणे म्हणजे मूलभूत विश्लेषण होय.

मूलभूत विश्लेषण करताना

  • मूलभूत विश्लेषण करताना अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यात कंपनीची निव्वळ विक्री किती आहे ते पाहून त्यात वाढ आहे की घट हे पाहिलं जात. 
  • जर एखाद्या तिमाहीत विक्री कमी असेल, तर त्याचे नेमके कारण शोधले जाते. हा डेटा मागील तिमाहीचा नसून मागील पाच वर्ष किंवा उपलब्ध सर्व वर्षांच्या तुलनेत पहिला जातो. यावरून कंपनी कशी प्रगती करीत आहे ते समजते. 
  • कंपनीच्या करपूर्व नफ्यावरून (EBIT) कंपनीचे सर्व कर्ज यावरील व्याज किती ते समजते. करोत्तर नफ्यामुळे (PAT) मध्ये सर्व देणे देऊन कंपनीला मिळणारा नफा यात दिसतो. 
  • या कर्जाचे कंपनीच्या भाग भांडवलाशी असलेले प्रमाण, एकूण कर्ज, त्याची परतफेड करण्याच्या प्रमाणात होणारी घट – वाढ याची माहिती मिळते. कंपनीची विस्तार योजना (Expansion plan), यासाठी अपेक्षित खर्च, त्याची तरतूद या गोष्टीचीही माहिती मिळते. 
  • ही माहिती मिळवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे कंपनीचा वार्षिक अहवाल, त्यातील नफा तोटा पत्रकाशिवाय मुख्य संचालक किंवा चेअरमन यांनी भागाधारकांशी साधलेल्या संवाद, लेखापरिक्षकाचा अहवाल, भागधारकांच्या तक्रारी त्यांचे सोडवणूक शिल्लक तक्रारी यांचे प्रमाण अशी अनेक उपयुक्त माहिती या पोतडीत असते.  
  • एखाद्या शेअरचे मूलभूत विश्लेषण करताना अनेक गुणोत्तराचा (Ratios) विचार केला जातो. यातील  प्रतिशेअर कमाई  (EPS), बाजारभाव व प्रतिशेअर कमाई याचे गुणोत्तर (PE ratio), पुस्तकी मूल्य (Book value) यासारख्या अनेक गुणोत्तराचा विचार करून त्याच्या भविष्यातील असू शकणाऱ्या भावाची तुलना चालू बाजारभावाशी करून तो शेअर खरेदीयोग्य की विक्रीयोग्य ते ठरवले जाते.

महत्वाचा लेख: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ 

मुलभूत विश्लेषण दोन प्रकारे केले जाते-

१. गुणात्मक (Qualitative) विश्लेषण-

  • यामध्ये कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप, उत्पादन, मालाची बाजारातील गुणवत्ता, मागणी,कंपनीची सेवा इतर स्पर्धाकांच्या तुलनेत कामगिरी कशी आहे, व्यवसायाची प्रतिष्ठा नितीशास्र या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. 
  • गुणात्मक विश्लेषण हे व्यक्तीनिष्ठ मत आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार त्याचे विश्लेषण आपापल्या तर्कानुसार ठरवतो.

२.परिमाणात्मक(Quantitative) विश्लेषण-  

  • यामध्ये कंपनीच्या आर्थिक पत्रकावरून नफा तोटा समजतो, रोखता प्रवाह विधान पाहिलं जातं. विक्री वाढ किती आहे ते दिसते. यावरून आर्थिक कुवत समजली जाते. 
  • परिमाणात्मक विश्लेषण प्रत्येक गुंतवणूकदार सारखेच करतात कारण त्यासाठी  लागणारी आकडेवारी सारखीच असते.

विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी 

तांत्रिक विश्लेषणातील आलेख (charts) व संकेत (indicators) एखाद्या कंपनी विषयी मूलभूत माहिती देऊ शकत नाहीत. ते फक्त शेअर मधील किमंतीची हालचाल आणि मागणी दाखवतात. त्यातून विश्लेषकांना खरेदी विक्रीचे संकेत देतात. आलेख संकेत (graph indicator) कितीही चांगले असले तरी जर त्या कंपनीचा मूलभूत पाया खराब असेल तर त्या कंपनीचे भाव वाढू शकत नाहीत. गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणत्याही कंपनीचे मूलभूत पाया मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी येत नाही. मूलभूत विश्लेषणाचा विचार केला तर यात सखोल संशोधन आणि अंकगणित गुंतलेलं आहे. त्याचबरोबर तार्किक विचारही (logical thinking) आहे ज्याची वर्धिष्णू (Incremental) कंपनी लवकरात लवकर शोधण्यास गुंतवणूकदारास मदत होते.

शरद गोडांबे

9657980309

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Fundamental Analysis Marathi Mahiti, Fundamental Analysis in Marathi, Fundamental Analysis mhanaje kay?, Fundamental Analysis Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…