Smart Investor
ग्रामीण भागात एखाद्या अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यवसायिकास ‘लाखाचे बारा हजार करणारा’ इसम असे संबोधतात. परंतु जर तुम्ही एक ‘स्मार्ट गुंतवणूकदार (Smart Investor)’ असाल तर १२ वर्षात लाखाचे करोडो सहज करू शकता. कसे? ते पाहूया.
२०२० सालात कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान प्रचंड मोठा नीचांक गाठल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराने जुलैपासून जोरदार पुनरागमन केले आणि केवळ गमावलेली पातळी स्थिर केली नाही तर नवीन शिखर देखील गाठले.
या बाजाराच्या पुनरुत्थानामुळे, २०२१ हे वर्ष ‘मल्टीबॅगर स्टॉक’साठी मोठ्या आशेचे वर्ष म्हणून साबित झाले. बजाज फायनान्स हा असाच एक स्टॉक आहे, जो आजपर्यंत १७.६४ रुपये प्रति स्टॉकच्या पातळी वरून तब्बल ६७५०.०५ रुपये प्रति स्टॉकच्या पातळीवर गेला आहे. यात गेल्या १२ वर्षात सुमारे ३८२ टक्क्यांनी वाढ झालीय.
Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी!
कितीच्या गुंतवणुकीवर किती परतावा?
- बजाज फायनान्सच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासाचा विचार करून, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ६ महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज घडीला त्या लाखाचे १.२७ लाख रुपये झाले असते.
- त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी १ लाख गुंतवले असते, तर त्या लाखाचे सुमारे १.८४ लाख रुपये झाले असते.
- तेच जर २००९ सालच्या जागतिक मंदीनंतर म्हणजे १२ वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर, त्याच्या १ लाख रुपयांचे आज सुमारे पावणेचार कोटीहून अधिक रुपये झाले असतील. कारण या १२ वर्षांच्या काळात बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत तब्बल 3८२ पट झाली आहे.
- गुंतवणूकीच्या या वाढीमध्ये केवळ शेअरच्या किमतीतील उत्पन्नाचा समावेश आहे. परंतु या व्यतिरिक्त, कंपनी दर तिमाहीनंतर शेअर लाभांश देखील देते तो लाभ तर वेगळाच.
बजाज फायनान्सचा थोडक्यात इतिहास:
- २५ मार्च १९८७ साली दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी ‘फायनान्स’ कंपनी म्हणून ‘बजाज फायनान्स’ची सुरुवात झाली.
- २४ सप्टेंबर १९८८ रोजी बजाज फायनान्सची ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’ म्हणून नोंद झाली.
- त्यानंतर एक दशकाने म्हणजेच ५ मार्च १९९८ रोजी ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ मध्ये ‘बजाज फायनान्स’ ‘नॉन-बँक कंपनी म्हणून नोंदवली गेली.
- या सर्व घडामोडीनंतर जुलै २००२ मध्ये कंपनी भारतीय शेअर मार्केटमध्ये उतरली.
- आज घडीला अगदी मोबाईल पासून ते घरापर्यंत सर्वच बाबींच्या कर्जासाठी ‘बजाज फायनान्स’च्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.
बजाज फायनान्सच्या शेअरचा इतिहास:
- बजाज फायनान्सचा शेअर ५ जुलै २००२ रोजी ‘एनएसई’मध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. त्या दिवशी त्याची दिवसअखेर किंमत ५.७५ रुपये एवढी होती.
- २००८ साली जागतिक बाजारपेठांसह भारतीय बाजारपेठेलाही आर्थिक मंदीची झळ पोहचली होती. तरीही बजाज फायनान्सचा स्टॉक सुमारे ४५ रुपयाच्या पातळीवर गेला होता.
- बाजार स्थिर झाल्यानंतर, बजाज समूहाचा हा स्टॉक पुन्हा चढाई करू लागला आणि गेल्या १२ वर्षांमध्ये, हा स्टॉक १७.६४ रुपये प्रति स्टॉकमार्क वरून ६७५०.०५ रुपयांवर गेला आहे.
- गेल्या ५ वर्षात बजाज फायनान्स स्टॉकच्या किंमती सुमारे ६ पट, तर गेल्या १२ वर्षात ३८२ पट वाढल्या आहेत.
- सूचीबद्ध होण्याच्या दिवशी म्हणजे ५.७५ रुपये प्रमाणे घेतलेला एक स्टॉक आज तब्बल ६७३५ रुपये किमतीचा झाला आहे. म्हणजे १९ वर्षात तब्बल ११७१ पटीने परतावा मिळवण्याची संधी होती.
महत्वाचा लेख: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा
अशा गुंतवणुकीसाठी महत्वाच्या बाबी
- गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची मनस्थिती हवी. जसे की, अतिशय सुरक्षित योजना म्हणजे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सारख्या राष्ट्रीयीकृत बँकेत ‘फिक्स्ड डीपॉझिट’ म्हणून १० वर्षांसाठी लाखभर रुपये टाकले असते तर ७.७५% दराने ७ लाख ७५ हजार रुपयांचा परतावा मिळाला असता.
- हेच जर जोखीम पत्करून परंतु एकूणच बाजाराचा अभ्यास करून आपण बजाज फायनान्समध्ये १२ वर्षांसाठी लाखभर रुपयांची गुंतवणूक केली असती तर तब्बल ३८५ पट म्हणजे पावणे चार कोटी रुपये एवढी रक्कम आज हातात असती.
- अर्थात या जर-तरच्या बाबी असल्या तरीही चांगल्या कंपनीच्या स्टॉकमध्ये एकहाती परंतु दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास बराच चांगला मोबदला मिळतो यावर तज्ज्ञांचे एकमत आहे.
एकुणात काय? जर तुमच्याकडे गुंतवणुकीचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही ‘लाखाचे बारा हजार’ नव्हे तर ‘लाखाचे कोटी’ करू शकता.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Smart Investor in Marathi, Smart Investor Marathi Mahiti, Smart Investor Marathi, How to become a Smart Investor Marathi Mahiti