Smart SIP
Reading Time: 3 minutes

Smart SIP 

स्मार्ट एसआयपी (Smart SIP) हा सध्याच्या गुंतवणूक प्रकारांपैकी एक लोकप्रिय प्रकार आहे. आजच्या लेखात आपण या गुंतवणूक प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया.  

म्युच्युअल फंड व्यवसायावर नियमन ठेवण्यासाठी सर्व म्युच्युअल फंडानी मिळून एक ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर स्वयं नियंत्रण संस्था (AMFI) स्थापन केली असून बहुतेक सर्व (44) मालमत्ता व्यवस्थापन संस्था (AMC) या संस्थेच्या सभासद आहेत. सन 1995 साली या संस्थेची स्थापना झाली असून तिला भांडवल बाजार नियामक (SEBI)  सेबीकडून मार्गदर्शन मिळत असते. यापूर्वी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) ही एकमेव संस्था म्युचुअल फंडाच्या विविध योजना बाजारात आणीत असे आर्थिक सुधारणानंतर विविध मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या उदयास आल्या आणि बाजारात स्पर्धा सुरू झाली ही स्पर्धा करीत असताना त्यांनी नैतिक मूल्यांची जपणूक करावी त्याच्या कार्यप्रणालीत समानता असावी. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करावे आणि त्याच्या आर्थिक ज्ञानात भर घालावी असा यामागील हेतू होता, यासाठी मान्य केलेल्या  नियमांचे सर्वांनी पालन करावे. स्वयं नियमनाद्वारे हे कार्य केले जाते.

हे नक्की वाचा: “एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

म्युचुअल फंड सही है –

  • म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, अधिकाधीक लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक करावी या हेतूने अँफीकडून नामवंत कलाकार, खेळाडू यांना घेऊन ‘म्युचुअल फंड सही है।’ या नावाने एक जाहिरात योजना वर्षानुवर्षे  राबवली जात आहे. 
  • काळाच्या ओघात म्युच्युएल फंड योजनांनी पारंपरिक योजनाहून अधिक परतावा मिळवून दिल्याने, त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या बचत योजनांतून मिळणारा लाभ कमी कमी झाल्याने, थेट शेअरबाजारात गुंतवणूक करून अधिक जोखीम स्वीकारण्याऐवजी,
  • अनेकांनी युनिटमध्ये गुंतवणूक करण्याचा थोड्या कमी जोखमीचा मध्यम मार्गाचा स्वीकार केला आहे. 
  • या सर्वच योजनांचे वैशिष्ठ म्हणजे गुंतवणूकदाराची गरज आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार अनेक प्रकारच्या योजना येथे उपलब्ध आहेत त्यांचे अनेक प्रकारही आहेत. जेणेकरून गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीचे पर्याय उपलब्ध आहेत. 
  • या योजनांची विभागणी 5 मुख्य व 36 उपप्रकारात केलेली आहे.
    • गुंतवणूक कालावधीवरून दोन–  निरंतर (Open ended) आणि मुदतबंद ( Closed ended) 
    • उत्पन्न विभागणीवरून दोन–  उत्पन्न वाढ (Growth) आणि त्याची विभागणी (Dividend)  तर, 
    • गुंतवणूक मालमत्तेच्या प्रकारावरून – समभागाधारित (Equity) कर्जरोखे आधारित (Debt), समभाग कर्जरोखे मिश्रित (Hybrid) विशेष प्रकारच्या (Solution Oriented)  या सर्वाहून वेगळ्या (Other’s Schemes) 

महत्वाचा लेख: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

SIP: एसआयपी 

  • एसआयपीही (SIP) अशीच गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. कमी किंमतीत युनिट खरेदी करून अधिक किमतीला विकणे हे कायम शक्य होईल असे नाही. त्यामुळे एकरकमी युनिट खरेदी करणे कदाचित चुकू शकते यावर नियमित गुंतवणूक करून मात करता येते.  
  • त्यामुळे विशिष्ठ दिवशी असलेल्या बाजारभावाने युनिट मिळतात त्यामुळेच सरासरी योग्य भाव मिळाल्याचा फायदा गुंतवणूकदारास होतो. थोडं थांबायची तयारी असेल तर दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. अगदी कमी म्हणजे ₹ 500/- दरमहा एवढी किमान रक्कम नियमित गुंतवून एसआयपी सुरू करता येते. त्यामुळेच अनेकजणांना ती आपल्या आवाक्यातील आहे असे वाटते. 
  • अधिकाधिक गुंतवणूकदार आपल्याकडे यावेत म्हणून मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या करीत असतात. 
  • त्या जाहिरात करतात, मागील वर्षांत मिळालेला परतावा जाहीर करतात. तसेच त्या तुलनेत अगदी वाजवी प्रमाणात परतावा मिळेल असे गृहीत धरून भविष्यात किती रक्कम मिळू शकेल याचा अंदाज देतात. 
  • त्याचप्रमाणे अशा योजनांत अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्यासाठी काही कल्पक बदल त्यात करीत असतात त्यामुळे ही गुंतवणूक एखाद्या रिकरिंग डिपॉझिट प्रमाणे न राहता नियमित गुंतवणुकीहून अधिक परतावा मिळवते. 

एसआयपी मध्ये असलेले विविध पर्याय –

  • सोयीनुसार दैनिक, साप्ताहिक, मासिक, तिमाही कालावधीत नियमित गुंतवणूक करण्याचे पर्याय.
  • आवश्यकतेनुसार नियमित कालखंडानंतर (Step up)  गुंतवणूक रकमेत वाढ करण्याचे पर्याय.
  • काही कालावधीसाठी गुंतवणूक तात्पुरती स्थगित ( Freeze) करण्याचा पर्याय.
  • काही कालावधीसाठी गुंतवणुकीत तात्पुरती वाढ करण्याचा पर्याय. 
  • पैशांच्या उपलब्धतेनुसार कमी अधिक गुंतवणूक करण्याचा पर्याय. 

विशेष लेख: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा

Smart SIP: स्मार्ट एसआयपी

स्मार्ट एसआयपी हा असाच एक कल्पक पर्याय आहे. अलीकडेच काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी हा गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला असून यामागे आपल्या गुंतवणुकीवर सुयोग्य परतावा आणि अधिक लाभ मिळावा याहेतूने बाजाराच्या दिशेनुसार योजनेत काही बदल जाणीवपूर्वक केले जातात. उदाहरणार्थ-

  • स्मार्ट एसआयपी ही इक्विटी या प्रकारात  शेअर्सचे भाव योग्य प्रमाणात असतील तोपर्यंत गुंतवणूक करते. जर भाव तुलनेत कमी झाले असतील म्हणजेच अधिक आकर्षक असतील तर यातील गुंतवणुकीत वाढ करते. भाव कमी असताना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करणे भविष्यात अधिक फायदेशीर ठरते.
  • ज्यावेळी शेअर्सचे भाव काही कालावधीत अधिक वाढलेले असतील अशा वेळी अधिकाधिक गुंतवणूक काढून घेऊन लिक्विड फंड योजनांत वळवली जाते यामुळे नंतर बाजारभाव कमी झाले तरी मिळालेला वाढीव नफा तसाच शिल्लक राहून भाव खाली आल्यावर ही गुंतवणूक पुन्हा शेअर्समध्ये केली जाते. 
  • याचाच थोडक्यात अर्थ असा की काही कालावधीसाठी इक्विटी योजनेतील गुंतवणूक स्थगित केली जाते.
  • जेव्हा गुंतवणुकीतून अपवादात्मक दराने नफा होत असेल अशा वेळी इक्विटी मधील गुंतवणुक काढून घेऊन ती लिक्विड अथवा कॉर्पोरेट बॉण्ड कडे वळवून जास्तीचा फायदा खरोखर मिळवला जातो.
  • जेव्हा शेअरबाजार खूप अस्थिर (Volatile) म्हणजे मोठ्या प्रमाणात रोज वरखाली होत असतो अशा वेळी कमी भावाने खरेदी अधिक भावाने विक्री किंवा प्रथम अधिक भावाने विक्री करून कमी भावात खरेदी करून भावातील चढ उताराचा अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी वापर केला जातो.

अशा प्रकारे एसआयपी करीत असताना प्रत्येक कंपनीने स्वतःचे निकष ठरवले असून याच पद्धतीने गुंतवणूक विभागली जाते म्हणजे समजा ही गुंतवणूक बाजारभाव आणि प्रतिशेअर कमाई (PE ratio) या गुणोत्तरावर आधारित असेल तर हे गुणोत्तर अधिक असताना शेअर्समधील गुंतवणूक कमी केली जाईल तर गुणोत्तर कमी झाल्यावर शेअर्समधील गुंतवणूक वाढवली जाईल. नियमित एसआयपीहून यातून मिळणारा परतावा अधिक असल्याने  गुंतवणूकदारांनी आपल्या कंपनीचे स्मार्ट गुंतवणुकीचे मॉडेल समजून घ्यावे. समजत नसेल तर तज्ज्ञांकडून समजूत घेऊन जर ते योग्य वाटत असेल तर आपल्या भविष्यकालीन योजना लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी त्याचा स्वीकार करावा आणि आपली गुंतवणूक अधिक स्मार्ट करावी. 

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Smart SIP Marathi Mahiti, Smart SIP in Marathi, Smart SIP Marathi, Smart SIP mhanje kay?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…