BYJU’S Success Story
Reading Time: 4 minutes

BYJU’S Success Story

आजच्या लेखात बायजू रविंद्रन यांच्या यशोगाथेची जडणघडण (BYJU’S Success Story) जाणून घेऊया. ही यशोगाथा फार रंजक आणि प्रेरणादायी आहे. भारतातील सर्वात जास्त बाजारमूल्य असणारे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे शैक्षणिक ॲप म्हणजे बायजूज. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या जाहिरातीमुळे हे ॲप अगदी सर्वांपर्यंत पोहचलं आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत याचा आयपीओ येईल असे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी सांगितले आहे.

हे नक्की वाचा: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा ! 

BYJU’S Success Story:बायजू रविंद्रन’ यांची यशोगाथा

बायजू यांच्या कुटुंबाविषयी:

  • बायजू रवींद्रन यांचा जन्म १९८० साली केरळच्या किनारपट्टीवरील आझिकोड येथील एका मल्याळी कुटुंबात झाला.
  • त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्रन आणि आईचे नाव शोभनवल्ली आहे. त्यांचे वडील साम्यवादी विचारधारेचे निवृत्त भौतिकशास्त्र शिक्षक आहेत आणि आई निवृत्त गणित शिक्षिका.
  • बायजू यांनी कोचिंग क्लासेस घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची दिव्या गोकुलनाथ नावाची एक विद्यार्थिनी होती. पुढे जाऊन तिच्याशी त्यांनी लग्न केले.
  • याच दिव्या गोकुलनाथ यांनी ‘बायजूज’ची यशोगाथा रचण्यासाठी बायजू रविंद्रन यांना मोलाची साथ दिली.

बायजू रवींद्रन यांचे शिक्षण:

  • बायजू रवींद्रन यांनी केरळच्या आझिकोडच्या स्थानिक मल्याळम माध्यमिक शाळेत आपले शिक्षण सुरू केले जेथे त्यांचे दोन्ही पालक शिक्षक होते. 
  • त्यांनी कॅलिकट विद्यापीठाच्या कन्नूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी प्राप्त केली.
  • बायजू रवींद्रन यांना वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी दोन्ही क्षेत्रात आवड होती. परंतु, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअर होण्याचे ठरवले.
  • अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बायजू यांना बहुराष्ट्रीय शिपिंग फर्ममध्ये सेवा अभियंता म्हणून नोकरी मिळाली त्यातून त्यांनी जगभर प्रवास करण्यास सुरुवात केली.
  • बायजू गणितामध्ये खूप चांगले असल्याने काही मित्रांनी त्यांच्या एमबीएच्या प्रवेशपरीक्षेसाठी मार्गदर्शन करायला सांगितले.

एका शिक्षकाचा उद्योजक:

  • बायजू यांनी फक्त मजेसाठी त्याच्या मित्रांसह ‘एमबीए’ची प्रवेशपरीक्षा देण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे ते अंतिम परीक्षेत १०० टक्के गुणाने उत्तीर्ण झाले.
  • त्यांचे आश्चर्यकारक निकाल पाहिल्यानंतर, त्यांच्या मित्रांनी कोचिंग क्लास सुरू करण्याचा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी बायजू आपल्या बुद्धिमत्तेचा चांगला वापरू करून विद्यार्थी घडवू शकतील असा त्यांना ठाम विश्वास होता.
  • बायजू यांनीही विचाराअंती सहमती दर्शवत उच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि कोचिंग क्लास सुरू झाला.
  • बायजू यांचा पहिला कोचिंग क्लास त्यांच्या मित्राच्या घराच्या टेरेसवर सुरु झाला.
  • सुरुवातीला,  बायजू फक्त एमबीएच्या प्रवेश परीक्षेसाठी शिकवायचे, नंतर त्यांनी पूर्णवेळ कोचिंग क्लासेस चालवायला सुरुवात केली. 

महत्वाचा लेख: Ghadi Detergent: घडी डिटर्जंट कंपनीचा थक्क करणारा प्रवास 

टेरेसवरचा क्लास सभागृहापर्यंत पोहचला:

  • बायजू यांच्या शिकवण्याची अनोखी पद्धत पाहून विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, तसतसे त्यांनी २०११ मध्ये बायजूज (थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड) नावाने आपली एज्युकेशन टेक्नॉलॉजी फर्म सुरू केली, ज्याची टॅगलाईन ‘फॉल इन लव्ह विथ लर्निंग’ म्हणजेच ‘शिकण्याच्या प्रेमात पडा’ अशी आहे.
  • बायजू यांनी त्यांच्या काही ‘आयआयएम’ मधून पदवीप्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शैक्षणिक सामग्री तयार केली.
  • २ लाख रुपये गुंतवणूक करून बायजू यांनी आपला वर्ग टेरेस वरून बंदिस्त सभागृहामध्ये हलवला.
  • २००९ साली विद्यार्थ्यांचा आग्रह आणि वाढती संख्या लक्षात घेऊन बायजू यांनी ‘कॅट’ परीक्षेसाठी व्हिडीओच्या सहाय्याने कोचिंग देणे चालू केले. तेव्हा खऱ्या अर्थाने बायजूने तंत्रज्ञानाची कोचिंगसाठी मदत घ्यायला सुरुवात केली.
  • त्यांची कोचिंगची पद्धत इतकी लोकप्रिय होती की एक काळ होता जेव्हा मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नईसह विविध राज्यांमध्ये केवळ बायजू रवींद्रन यांचे २०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी होते. 

ऑफलाइन क्लासेस ऑनलाईन झाले:

  • बायजूजचे २०१५ साली शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिले ‘लर्निंग ॲप’ सुरु झाले. या ॲपसाठीचा कंटेंट बनवण्यासाठी त्यांना तब्बल ४ वर्षे लागली असे म्हणतात.
  • कॅट, राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET), नागरी सेवा परीक्षा, पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (GMAT), संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि पदवीधर रेकॉर्ड परीक्षा (GRE)  यासारख्या प्रवेश परीक्षांसाठी देखील या लर्निंग ॲपद्वारे क्लासेस घेतले जाऊ लागले.

बायजूज एक ब्रँड बनला:

  • लर्निंग ॲपचा उद्देश चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग देणे होता. बायजूने ते प्रभावी तसेच मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न केला.
  • बायजूजचे लर्निंग मोबाईल ॲप लोकप्रिय झाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्याच्या लर्निंग ॲपला ३.५० लाखहून अधिक वार्षिक सदस्यता मिळाली. आजवर बायजूजचे मुख्य लर्निंग ॲप ५ कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे.
  • ॲनिमेशन, आकर्षक व्हिडिओ, परस्परसंवादी पद्धती, ओरिजिनल कंटेंट यांमुळे बायजूजचे लर्निंग ॲप हे ४ ते १२ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त पसंतीचे शिक्षणासाठीचे मोबाईल ॲप्लिकेशन बनले आहे.

विशेष लेख: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास 

बायजूजची आर्थिक वृद्धी:

  • २०१३ साली बायजूज करिता पहिली मोठी गुंतवणूक आली. मोहनदास पै आणि रंजन पै यांनी २०१३ साली बायजू क्लासेसमध्ये ५० कोटी रुपये गुंतवले होते.
  • बायजू हे आशियातील एकमेव स्टार्टअप आहे ज्यास मार्क झुकेरबर्गने निधी दिला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये, बायजूला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी डॉ. प्रिस्किला, टाइम्स इंटरनेट लिमिटेड, लाइटस्पीड वेंचर्स आणि सोफिना यांनी बनवलेल्या परोपकारी संस्थेकडून चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह (CZI) कडून ५ कोटी रुपये मिळाले होते.
  • शैक्षणिक ॲप बनल्यानंतर, बायजूचे उत्पन्न २०११-१२ मध्ये ४ कोटी, २०१२-१३ मध्ये १२ कोटी, आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये २० कोटी,  आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ४८ कोटी, २०१५-१६ मध्ये १२० कोटी आणि आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये हे वाढून २६० कोटी रुपये अशा चढत्या क्रमाने झाल्याचे पहायला मिळते.
  • दिव्या गोकुलनाथ यांनी माध्यमांशी बोलताना २०२०-२२१ या आर्थिक वर्षाचे उत्पन्न २८०० कोटी असेल, असा विश्वास वर्तवला आहे.
  • सध्या, बायजूकडे ७०० पेक्षा जास्त ‘प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीम’ मेम्बर्स आहेत. २०० हून अधिक कंटेंट क्रिएटर आहेत, तर व्हिडीओज बनवण्यासाठी १५०, तर टेक्निकल बाजू सांभाळण्यासाठी १०० तंत्रज्ञ आहेत.

बायजूजची उल्लेखनीय कामगिरी:

  • बायजूने सीएनबीसी-टीव्ही १८ क्रिसिल इमर्जिंग इंडिया अवॉर्ड इन एज्युकेशन, बिग रिसर्च एनडीटीव्ही प्रॉफिट बिझनेससह अनेक पुरस्कार जिंकले.
  • बायजूचे शैक्षणिक ॲप हार्वर्ड युनिव्हर्सिटीने २०१७ साली केस स्टडीसाठी समाविष्ट करून घेतले होते.
  • २०१९ साली बायजूज कंपनीचे बाजारमुल्य तब्बल ४८१७९ कोटी रुपयांहून अधिक होते.
  • बायजूज आता दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड या देशांतही लर्निंग ॲप सुरु करण्यासाठी पावले उचलत आहे.

जर तुमच्याकडे कौशल्य असेल आणि त्या कौशल्याला व्यवसायात बदलवण्याची धमक असेल तर ‘स्काय इज द लिमिट’ हे बायजू रविंद्रन यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: BYJU’S Success Story Marathi Mahiti, BYJU’S Success Story in Marathi, BYJU’S Success Story Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…