Zerodha
Left to RIght: Nithin Kamath and Nikhil Kamath, the cofounders of Zerodha. Bangalore. October 2020. Photograph by Nishant Ratnakar.
Reading Time: 2 minutes

झिरोधा (Zerodha) 

निखिल आणि नितीन कामत या भावंडांना झिरोधा (Zerodha) कंपनीने वार्षिक १०० कोटीचे प्रत्येकी पॅकेज दिले ही बातमी तुम्ही सगळीकडे वाचली असेलच! फोर्ब्जच्या शीर्ष १०० श्रीमंतांच्या यादीत असणारी कामत भावंड, वार्षिक १००० कोटींपेक्षा जास्त नफा मिळवणारी, ११ हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त बाजारमूल्य असणारी त्यांची झिरोधा कंपनीबद्दल आपण माहिती घेऊयात. 

झिरोधा (Zerodha) –

  • झिरोधा एक डिस्काउंट स्टॉक ब्रेकिंग ब्रोकिंग फर्म आहे. झिरोधा नाव संस्कृतमधील रोढा आणि झिरो या शब्दांपासून बनले आहे. रोढा म्हणजे अडथळा.
  • कमी दलालीत, विना अडथळे शेअर ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध करून देणे या  ध्येयाने २०१० मध्ये झिरोधाची सुरुवात झाली. 
  • २०२१ मध्ये भारतातील सर्वात मोठी शेअर ब्रोकिंग कंपनी असणाऱ्या झिरोधाचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. 
  • शेअर बाजारांत होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी १५% व्यवहार झिरोधाच्या माध्यमातून होतात.  

हे सुद्धा वाचा: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास

पार्श्वभूमी –

  • निखिल आणि नितीन कामत यांचे वडील बँक मॅनेजर होते. शालेय शिक्षणात निखिल कामत यांना विशेष रस नव्हता. वयाच्या १४व्या वर्षी सेकंड हॅन्ड मोबाईल खरेदी-विक्रीची सुरुवात त्यांनी केली. घरी कळल्यावर मात्र अडचण झाली. 
  • आईने सर्व मोबाईल फेकून दिले. दहावीच्या बोर्ड परीक्षेलाही निखिल यांना शाळा बसू देत नव्हती. शेवटी शिक्षणाऐवजी काहीतरी काम करायचे त्यांनी ठरवले आणि कॉल सेंटरच्या नोकरीला सुरुवात केली. येथे सुरुवातीचा मासिक पगार फक्त ८,००० रुपये होता.
  • वयाच्या १७व्या वर्षी एका मित्राकडून शेअर ट्रेडिंगची माहिती मिळाली. रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायचे आणि दिवसा शेअर ट्रेडिंग करायचे अशी निखिल कामत यांची सुरुवात होती. 
  • सुरुवातीला शेअर ट्रेडिंग करून त्यांनी मिळवलेले पैसे २००१-०२ च्या शेअर मार्केट क्रॅश मध्ये संपूर्ण नुकसानीत गेले. काही काळानंतर एका एनआरआयने आपले पैसे गुंतवणुकीसाठी कामत यांना दिले. पुढे रिलायन्स मनीची सब ब्रोकरशिप घेऊन त्यांनी भरपूर पैसे स्वतःही मिळवले आणि आपल्या ग्राहकांनाही मिळवून दिले. 

 विशेष लेख: Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

मंदीमध्ये संधी –

  • पुन्हा एकदा २००८ च्या जगतात मंदीच्या काळात झालेल्या शेअर बाजाराच्या पडझडीत भरपूर रक्कम निखिल कामत यांनी गमावली. 
  • जवळपास १० वर्षे शेअर ट्रेडिंग करून शेअर दलाली कंपन्या कशा काम करतात याचा निखिल कामत यांचा सखोल अभ्यास झाला होता. भरभक्कम ब्रोकरेजमुळं बहुसंख्य लोक शेअर ट्रेडिंग करत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले.  
  • नवीन डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून ट्रेडिंगसाठी सोपे माध्यम तयार करण्याची कल्पना त्यांनी झिरोधाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली. 
  • शेअर ट्रेडिंगचा भरपूर अभ्यास असलेला मोठा भाऊ नितीन कामत झिरोधाचा सहसंस्थापक आहे. 
  • ठराविक ग्राहकांकडून भरपूर ब्रोकरेज आकारण्याऐवजी नाममात्र ब्रोकरेज भरपूर ग्राहककांडून गोळा करण्याची नीती झिरोधा वापरत आली. 
  • एचडीएफसी सिक्युरिटीज, शेयरखान, आयसीआयसीआय सिक्युरिटीज अश्या मोठ्या शेअर दलाली कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकून सतत ग्राहक वाढवत नेण्याचे काम झिरोधाने लीलया पार पाडले.  
  • कुठल्याही जाहिरातींपेक्षा उत्तम ग्राहक सेवा देणारी कंपनी लवकर प्रसिद्ध होते यावर त्यांचा विश्वास आहे. आम्ही पैशामागे न पळता दीर्घकाळ योग्य ते काम करतो असे नितीन कामत सांगतात. पुढच्या काही वर्षांत ग्राहकांची संख्या ५ ते १० कोटींपर्यंत वाढवण्याचे झिरोधाचे ध्येय आहे.  

मध्यमवर्गीय कुटुंबातून येत केवळ दहा वर्षांत मेहनत, अभ्यास, टेक्नॉलॉजीचा वापर करून झिरोधासारखा मोठा व्यवसाय उभा करणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

– सी.ए .अभिजित कोळपकर 

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Zerodha Marathi Mahiti, Zerodha in Marathi, Zerodha Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.