Gautam Adani
Reading Time: 4 minutes

Gautam Adani

आज गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव केवळ भारतीय उद्योगजगतात नाही तर जागतिक उद्योगजगतातही मानाने घेतलं जाते. अनेकांना असं वाटतं की केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि अदानी यांचे खूपच निकटचे संबंध आहेत. अर्थात याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या राजकीय संबंधांबद्दल नाही, तर गौतम अदानी यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक माहिती घेणार आहोत. 

यशाच्या वाटेमध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात. परंतु, जी व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर या अडथळ्यांना पार करते ती यशस्वी होते. अशा व्यक्तींचा संघर्ष सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहतो. गौतम अदानी भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारं एक मोठं नाव आहे. देशातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. परवा त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, अदानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

विशेष लेख: Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

Gautam Adani: गौतम अदानी यांची यशोगाथा –

सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी

  • यशाच्या शिखरापर्यंत पोचून नावलौकिक मिळवण्यासाठी अदानी यांनी मागच्या अनेक वर्षांपासून व्यवसायामध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांना एवढा मोठा व्यवसाय परंपरागत मिळाला नाही. आपल्या कौशल्याच्या जोरावरती हा सर्व डोलारा त्यांनी  उभा केला आहे. 
  • शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत की, गौतम अदानी यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दुसऱ्याच वर्षी शिक्षणाला रामराम केला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यांचे वडील कापडाचा व्यवसाय करत असत.
  • दुसऱ्याच वर्षी कॉलेज सोडल्यानंतर गौतम अदानी यांनी मुंबईला प्रस्थान केले. दोन-तीन वर्ष मुंबईच्या बाजारात लहान-मोठं काम केल्यानंतर आपल्या संपर्क .कौशल्याच्या जोरावर त्यांनी हिऱ्याच्या बाजारात उडी घेतली. हा त्यांनी उभा केलेला पहिला व्यवसाय होता.  परंतु अगदी काहीच वर्षांनी त्यांच्या बंधूंनी त्यांना प्लास्टिक फॅक्टरीचं काम सांभाळण्यासाठी अहमदाबादला बोलावून घेतलं. 

 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसायास सुरुवात

  • प्लास्टिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना पॉलीव्हीनाईल क्लोराईडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवसाय करण्याची संधी मिळाली.
  • मित्रांनो लक्षात घ्या सर्वांना आयुष्यात यशस्वी होण्याची एक तरी संधी नक्कीच मिळतेच, परंतु प्रत्येक जण संधीच सोनं करू शकत नाही, मात्र गौतम अदानी यांनी त्याकाळी त्यांना मिळालेली ही संधी ओळखली.  
  • भारत सरकार आपली बाजारपेठ आंतरराष्ट्रीय स्तरावरती खुली करणार होता आणि यातून प्रत्येकाला आपला व्यवसाय मोठा करण्याची संधी चालून आली होती.

अदानी ग्रुपची स्थापना

  • 1988 मध्ये गौतम अदानी यांनी अदानी ग्रुप या कंपनीची स्थापना केली मात्र सुरुवातीला ही कंपनी फक्त शेती विषयक उत्पादनांमध्ये काम करत असत. 
  • 1991 मध्ये अदानी यांनी शेती विषयक उत्पादनांसोबतच मायनिंग, गॅस, विज उत्पादन अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय काम करायला सुरुवात केली. 
  • याच काळामध्ये अदानी ग्रुप यशस्वीतेची शिखरं गाठत होता. विविध क्षेत्रात काम करत असल्यामुळे अदानी ग्रुप अगदी ग्रामीण भागात देखील ओळखला जाऊ लागला. 
  • जवळपास प्रत्येक भारतीयाच्या घरात रोजच्या स्वयंपाकामध्ये फॉरच्युन कंपनीचे (Adani wilmar) कुठले ना कुठले उत्पादन वापरले जाते. हा फॉर्च्युन समूह अदानी यांचाच आहे. 
  • या काळात कंपनी भरभराट करत असली तरीही गौतम अदानी मात्र स्वतः नम्र राहिले. 
  • मोठ्या प्रमाणात वैभव निर्माण करण्यासाठी अदानी यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. पण फक्त मेहनत नाही तर त्यासोबतच संधी शोधून त्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येणं ही देखील मोठी गोष्ट आहे. 
  • गौतम अदानी यांचा संपूर्ण जीवन प्रवास बघितला तर, त्यांनी दूरदृष्टीने समोर आलेली संधी ओळखून त्याचं सोनं केलं आहे, असं लक्षात येतं.
  • अदानी ग्रुप आज विविध क्षेत्रात काम करत आहे. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रमुख कंपन्या म्हणजे –
    • अदानी एंटरप्राइजेस
    • अदानी पोर्ट
    • अदानी ग्रीन एनर्जी
    • अदानी पॉवर
    • अदानी ट्रान्समिशन
    • अदानी टोटल गॅस
    • सरगुजा रेल कॉरिडोर

हे नक्की वाचा: Success Story of ITC-‘आयटीसी’ची यशोगाथा

यशाचं रहस्य

  • एका मुलाखतीत गौतम अदानी यांनी त्यांच्या यशाचं रहस्य सांगितल आहे.  ते असं म्हणतात की, “कुठल्याही व्यावसायिकाने स्वतःला फक्त एकाच उत्पादना पुरतं बांधून ठेवू नये. जेव्हा एखाद्या व्यवसायात तुम्ही यश मिळवाल तेव्हा त्या व्यवसाय सोबतच अजून कुठल्या व्यवसायात तुम्हाला जम बसवता येईल याचा विचार करा. व्यवसाय वाढल्याने तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींवर नक्कीच मात करता येईल.’’ 
  • गौतम अदानी त्यांच्या संभाषण कौशल्य साठी आणि वाटाघाटी करण्याच्या कौशल्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. 
  • गौतम अदानी यांनी आयुष्यात कधीही नवीन गोष्टी शिकण्यास नकार दिला नाही, त्यांनी कुठल्याही मोठ्या प्रसिद्ध अशा बिझनेस स्कूल मधून व्यवसाय शिकलेला नाही.  त्यांनी आज जे काही वैभव उभ केल आहे ते फक्त मेहनत, दूरदृष्टी आणि निरीक्षण कौशल्यावर. त्यांच्या निरीक्षण शक्तीचं प्रत्येक व्यवसायिक कौतुक करतो.
  • यशस्वी उद्योजक असण्यासोबतच अदानी एक व्यक्ती म्हणूनही  लोकप्रिय आहेत. 26/11 चा दहशदवादी हल्ला झाला तेव्हा अदानी ताज हॉटेलमध्येच होते. त्यावेळी कठीण परिस्थितीत ते शांत राहिले. स्वतःच्या सुटकेसाठी पोलीस, हॉटेलचा कर्मचारी वर्ग आणि एकूणच यंत्रणेवर कोणताही दबाव न टाकता त्यांनी अतिशय संयमाने सहकार्य केले. यशाच्या आकाशात भरारी मारत असतानाही अदानी यांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर राहिले. 

कोरोना काळात देशाला मदत

  • गौतम अदानी एक सहृदय आणि जबाबदार व्यक्ती आहेत. कोरोनाव्हायरसच्या प्रसारामुळे देश कठीण परिस्थितीतून जात असताना इतर उद्योजकांप्रमाणे अदानी समूहानेही केंद्र आणि काही राज्यसरकारला एकूण  114 कोटी रुपयांची मदत केली आहे. यामध्ये –
    • पीएम फंडाला 100 कोटी रुपये,
    • गुजरात व केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 5 कोटी,
    • आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला 2 कोटी,
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि झारखंड सीएम रिलीफ फंडाला प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले आहेत.
    • इस्कॉन द्वारका यांच्यातर्फे दिल्लीतील सुमारे 1 लाख गोरगरिबांना जेवण देण्यात येते. अदानी यांनी त्यासाठी 50 लाख रुपयांची मदत दिली आहे.
    • अहमदाबाद महानगरपालिकेला 100 व्हेंटिलेटर, तर भारत सरकारला 10,000 पीपीई किट प्रदान केले आहेत.
    • या व्यतिरिक्त, अदानी ग्रुपच्या कर्मचार्‍यांनी 4 कोटी रुपये ‘अदानी फाउंडेशनमध्ये’ जमा केले आणि या फाउंडेशनतर्फे एकूण 8 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

इतर लेख: Success Story Of Titan – टायटन कंपनीची यशोगाथा 

अनेक वर्षांच्या अनुभवातून अदानी यांनी एक गोष्ट नक्कीच शिकली आहे ती म्हणजे, “भविष्यात आवश्यक असणाऱ्या व्यवसायाची चाचपणी करणं आणि इतर कुठल्याही उद्योजकाच्या आधी त्या व्यवसायात एकाधिकारशाही निर्माण करणं.” त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे त्यांनी मुकेश अंबानी यांच्यानंतर आशियातील श्रीमंत व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवला आहे. एवढेच नाही तर अदानी जगातील चौदावे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून देखील ओळखले जातात. मागील आठवड्यात त्यांनी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच चीनमधील उद्योजक झोंग शान शान यांना मागे टाकत तो क्रमांक पटकावला आहे.

(अदानी गृपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Gautam Adani in Marathi, Gautam Adani Marathi Mahiti, Gautam Adani Marathi, Success story of Gautam Adani, Success story of Gautam Adani in Marathi, Success story of Gautam Adani Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.