foreclosure of loan
Reading Time: 3 minutes

Foreclosure of loan

घर घेण्यासाठी कर्ज घेणे आणि त्याची परतफेड करणे (Foreclosure of loan) हा जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्यासारखा झालाय. परंतु ती परतफेड करताना होणारी दमछाक शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. 

ठरलेल्या कालावधी अगोदर किंवा त्याच मुदतीत आपण कर्जाची परतफेड केली म्हणजे आपण मुक्त झालो असे जर कुणाचे मत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. केवळ व्याजासह पैशांचा परतावा करणे हा गृहकर्ज परतफेडीचा महत्वाचा भाग जरी असला तरी त्यानंतर आपणास काही गोष्टी लक्षपूर्वक करून घ्याव्या लागतात त्याशिवाय आपण घराचे खरे मालक बनू शकत नाहीत. त्या ७ महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे. 

हे नक्की वाचा: तुम्ही डिजिटल सावकाराच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना? 

Foreclosure of loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर या ७ गोष्टी अजिबात विसरू नका

१. परतफेड केलेल्या सर्व पावत्या स्वतःकडे घ्या:

  • आजकाल सर्वच बाबी संगणकीकृत म्हणजेच ऑनलाईन झाल्या आहेत त्यामुळे आपण ज्या बँकेकडून कर्ज घेता ती बँक आपणास युजरनेम आणि पासवर्ड देतेच. त्यातून आपण आजवर किती परतफेड केली आणि किती शिल्लक आहे हे सहज पाहू शकता.
  • याच साईटवरून आपण वेळोवेळी परतफेड केल्याच्या रिसीट डाऊनलोड करून घायला हव्यात. जर आपण एकाचवेळी मोठी रक्कम जमा करत असाल तर त्याचीही पावती आपल्याकडे घेऊन ठेवणे गरजेचे आहे.

२. संपूर्ण परतफेड केल्यानंतर बँकेला स्वतःहून कळवा:

  • अर्थात आपल्या बँकेकडे आपल्या सर्व बाबींची नोंद असते तरीही आपल्या कर्जाची मुदत संपत असेल किंवा आपण मुदतपूर्व परतफेड करत असाल, तर संबंधित बँकेला याविषयी माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील सर्व बाबी लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते.

३. सर्व मूळ कागदपत्रे बँकेकडून माघारी घ्या:

  • जेव्हा आपण गृहकर्ज घेत असतो तेव्हा खरेदीखताची मूळ कागदपत्रे आपल्याला बँकेकडे जमा करावी लागतात तेव्हाच कर्जाची रक्कम आपल्याला अथवा आपल्या विकासकाच्या खात्यात जमा होते. 
  • बँकेकडे सुपूर्द केलेल्या त्याच सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आपल्याकडे परत घ्यायला हव्यात.
  • बँकेने आपल्याला सर्व मूळ कागदपत्रे दिली असे दर्शवणाऱ्या एका प्रमाणपत्रावर आपली सही घेतली जाते. 
  • सही करण्याअगोदर सर्व फाईल्समधील सर्वच्या सर्व कागदपत्रे त्यात आहेत ना? याची खात्री केल्याशिवाय त्यावर सही करू नये, कारण त्यानंतर बँक आपल्या कुठल्याही तक्रारीस उत्तर देण्यास बांधील नसते.

विशेष लेख: Zero cost EMI: ‘झीरो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय असतं रे भाऊ? 

४. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घायला विसरू नका:

  • बँकेच्या कर्जाची कुठलीही रक्कम आता आपण देणे लागत नाही, सर्व बाबींची आपण पूर्तता केलेली आहे असे नमूद असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजेच ‘एनओसी’ आपल्याला बँकेकडून घेणे गरजेचे आहे.
  • या प्रमाणपत्रामध्ये आपले नाव, घराचा पत्ता अचूक असल्याची खात्री करून घायला विसरू नका.

५. दुय्यम निबंधक कार्यालयातून बँकेचा मालमत्तेवरील धारणाधिकार काढून घ्या:

  • कर्ज असतानाही आपण परस्पर ती मालमत्ता कुणास विकून टाकू नये म्हणून बऱ्याचदा आपल्या मालमत्तेवरील धारणाधिकार बँक स्वतःकडे घेऊन ठेवते. 
  • आपल्या बँकेनेही असे काही केले आहे का याची चौकशी करून बँक ऑफिसरच्या मदतीने दुय्यम निबंधक कार्यालयातून आपल्या बँकेचा मालमत्तेवरील धारणाधिकार काढून घ्यायला हवा. त्याशिवाय आपण भविष्यात ती मालमत्ता इतर कुणास विकू शकत नाही.

६. जमा केलेले ‘सिक्युरिटी चेक्स’ माघारी घ्या:

  • कर्ज घेत असताना आपण ‘सिक्युरिटी चेक’ म्हणून काही चेक्स म्हणजेच धनादेशांवर सह्या करून बँकेच्या नावाने दिलेले असतात. ते सर्व धनादेश परत घ्यायला विसरू नका.

महत्वाचा लेख: कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी 

७. ‘एनक्युम्ब्रान्स सर्टिफिकेट’ घ्यायला विसरू नका:

  • बँकेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि ‘मालमत्तेवरील धारणाधिकार काढून घेतल्याचे पत्र’ मिळाल्यानंतर निबंधक कार्यालयात जाऊन ‘ईसी’ म्हणजेच ‘एनक्युम्ब्रान्स सर्टिफिकेट’ घ्यायला विसरू नका.
  • आपल्या मालमत्तेवर काय काय आर्थिक व्यवहार झाले आहेत हे त्या प्रमाणपत्रात नमूद असते. जेव्हा आपण नव्याने हे प्रमाणपत्र मागवतो तेव्हा बँकेच्या कर्जाचा बोजा त्यावरून हटवला आहे की नाही हे समजते. 
  • जर त्यात कर्जाची परतफेड झाल्याचा उल्लेख नसेल तर आपणास पुन्हा बँकेकडे जाऊन त्यावर कार्यवाही करण्याची विनंती करावी लागेल. 
  • जेव्हा या प्रमाणपत्रावर सर्व कर्जाचा बोजा उतरला आहे असे नमूद होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या कर्जफेडीची प्रोसेस समाप्त झाली असे म्हणावे.

अशा या सात अतिशय महत्वाच्या बाबी पूर्ण झाल्या म्हणजे आता खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या घराचे खरे मालक झाला आहात असे समजावे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…