Benefits of credit card
क्रेडिट कार्ड, नको रे बाबा. ते कशाला वापरायचं? त्याचे काय फायदे आहेत (Benefits of credit card)? क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीला निमंत्रण, क्रेडिट कार्ड म्हटल्यावर साधारणपणे अशीच मतं व्यक्त केली जातात. काही अंशी हे खरं असलं तरीही, नियमितपणे बिल भरून संयमितपणे क्रेडिट कार्ड वापरणारे लोक नेहमीच त्याचे फायदे सांगत असतात. आर्थिक सल्लागार सुद्धा सणासुदीच्या दिवसात क्रेडिट कार्ड वापरणं तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी कसं हितावह ठरू शकतं हे खालील ६ मुद्द्यांमधून नेहमीच सांगत असतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.
हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?
Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे ६ फायदे
१. क्रेडिट स्कोअर वाढवणे:
- क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीने जर दिलेल्या वेळेत क्रेडिट कार्डचं बिल भरलं, तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधरु शकतो.
- क्रेडीट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीने फक्त इतकं लक्षात ठेवावं की, बँकेने आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करू नये. सातत्याने मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यास क्रेडिट कार्ड वापरणारी व्यक्ती भविष्यात गरज पडणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी अपात्र ठरू शकते.
२. पैशांची बचत होऊ शकते:
- सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात कित्येक कंपन्यांनी क्रेडिट कार्ड वापरल्यास कमी किमतीत वस्तू मिळेल, क्रेडिट कार्डने खरेदी करा आणि कोणत्याही व्याजाशिवाय काही महिने पैसे देण्यास वेळ मिळेल अशा ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलती दिल्या आहेत.
- क्रेडिट कार्ड वापरल्याने तुमच्या खात्यात ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ सुद्धा जमा होत असतात. हे पॉईंट्स वापरून आपण सणासुदीच्या काळात आपण आपले मौल्यवान पैश्यांची बचत करू शकतात.
३. बिनव्याजी मिळणारं एकमेव कर्ज :
- प्रत्येक क्रेडिट कार्ड हे तुम्ही वापरलेले पैसे भरण्यासाठी 18 ते 55 दिवसांचा बिनव्याजी कालावधी तुम्हाला देत असते.
- तुमच्या आर्थिक गरजेसाठी त्वरित हजर होणारी क्रेडिट कार्ड ही एकमेव कर्जाची पद्धत अस्तित्वात आहे.
- बँकेकडून मिळालेल्या कालावधीत पैशांची परतफेड करू शकणारे लोक याच कारणामुळे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरतात आणि विनाव्याज कर्जाचा उपभोग घेत असतात.
महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा
४. समान हफ्ते करून कर्जफेड:
- सणासुदीच्या काळात मोठ्या वस्तू घेण्याचा कित्येक परिवारांचा विचार असतो. तुमच्या बचतीला धक्का न लावता क्रेडिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही या वस्तू सहज विकत घेऊ शकतात.
- या कर्जाची परतफेड तुम्ही 12 महिने ते 36 महिने या कालावधीत पूर्ण करू शकता ही तुमच्यासाठी सर्वात किफायतशीर गोष्ट आहे.
५. पूर्व मान्य (Pre-approved )कर्जाची सोय उपलब्ध होते:
- कर्ज पाहिजे असतं तेव्हा कोणाकडेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ आणि संयम नसतो.
- क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बँक ही नेहमीच विना कागदपत्र मिळेल अशा पूर्व मान्य म्हणजेच ‘प्री-अप्रुव्हड’ कर्जाची सवलत जाहीर होत असते.
- या कर्जाची रक्कम बँक त्याच दिवशी, काही क्षणात ग्राहकांच्या खात्यात जमा करत असते. ही सवलत तुम्हाला हवी असल्यास एक तरी क्रेडिट कार्ड सुरू ठेवणं हे तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. क्रेडिट कार्डचा व्याजदर जास्त असतो. पण, पैसे वापरता येण्याचा कालावधी कमी असतो हा मोठा फरक आहे.
६. कॅशबॅक मिळण्याची सोय:
- कोणत्याही वस्तूची खरेदी करतांना जर त्यातून तुम्हाला काही पैसे परत मिळणार असतील तर ते कोणाला नको असतात ? क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास हे शक्य होऊ शकतं.
- क्रेडिट कार्डच्या ‘ऑफर्स’ सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही कॅशबॅक संबंधित उपलब्ध असलेल्या जाहिराती बघू शकता आणि या सेवांचा फायदा करून घेऊ शकता.
- कॅशबॅकची सवलत उपलब्ध नसेल तरीही तुमच्या प्रत्येक खरेदीने मिळणारे ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ हे एक प्रकारचे कॅशबॅकची सोय म्हणूनच मानली जाते. कारण, अशी कोणतीही सोय वस्तू नगदी स्वरुपात खरेदी केल्यास तुम्हाला मिळत नाही.
क्रेडिट कार्डचे हे फायदे समजल्यावर या सणासुदीच्या काळात आपल्याला क्रेडिट कार्ड वापरतांना कोणताही संकोच वाटणार नाही हे नक्की.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Benefits of credit card in Marathi, Benefits of credit card Marathi Mahiti, Credit card che fayade