Electronic gold receipts
Reading Time: 5 minutes

आजच्या लेखात आपण संगणकीय सुवर्ण पावती (Electronic Gold Receipts) गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे थोडे सोने जमा करून त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणे एवढाच आपला सोन्याशी संबंध. संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. 

सुवर्ण गुंतवणूक –

  • नवीन शैलीचा दागिना बनवायला जितक्या सहजतेने जुने दागिने मोडले जातात त्या तुलनेत अत्यंत कठीण प्रसंगातही ते विकून पैसे उभे उभारणे होता होईतो टाळले जाते. त्यामुळे यातून मानसिक समाधानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष परतावा मिळत नाही.  
  • या उलट अशा स्वरूपाच्या व्यवहारात वजनात घट आणि मजुरी यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून आपले नुकसानच होते याशिवाय त्यावर कर द्यावा लागतो. 
  • सोने हे पर्यायी चलन म्हणून समजले जाते, चलन या शब्दाचा  संबंध गतिमानतेशी आहे. जेव्हा त्याचे दागिने बनतात तेव्हा त्याची गती म्हणजे हालचाल थांबते तेव्हा आपल्या गरजेहून अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घेणे यात आर्थिक नुकसान आहेच, याशिवाय सुरक्षितपणे साठवण्याची जोखीम आहेच.
  • आपली गुंतवणूक विविध प्रकारात विभागून असावी. ती सुरक्षित, महागाईहून अधिक परतावा देणारी असावी आणि त्यात रोकडसुलभता असावी. 
  • गेल्या 10 वर्षात विविध गुंतवणूक प्रकारांनी महागाईच्या तुलनेत किती परतावा दिला हे तपासून पाहिले असता शुद्ध स्वरूपातील सोन्यास हे तिन्ही निकष लागू पडतात. 
  • सोन्यातून मिळालेला परतावा 10% असून तो महागाईवर मात करणारा आहे. मोठ्या आर्थिक संकटात लोकांचा प्रचलित चलनावरील विश्वास कमी होऊन ते अधिक प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करीत असल्याने सुवर्ण गुंतवणुकीचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. 
  • आपल्या एकूण गुंतवणुकीतील 10% भाग  सोन्यामध्ये असावा याबाबत सर्व गुंतवणूक तज्ञांमध्ये एकमत आहे. हा धातू दुर्मिळ आणि जगमान्य असल्याने त्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. जगभरातील बँकांची पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्यास प्रथम पसंती आहे.

गुंतवणूक म्हणून सोने खालील प्रकारांनी खरेदी करता येईल.

नाणे / वळे स्वरूपात सोन्याची खरेदी: 

  • बँकेतून किंवा सोनाराकडून अशी खरेदी कधीही अथवा सुमुहूर्तावर करता येईल. यावर 3% जीएसटी द्यावा लागतो. 
  • खरेदी विक्रीचे दर प्रचलित बाजारभावाशी मिळतेजुळते असतात. दुकानात खरेदी आणि विक्रीचे दरपत्रक लावलेले असते. विक्रीचा भाव  खरेदीच्या भावाहून अधिक असतो. 
  • बँकेतील सोन्याची विक्री किंमत प्रचलित बाजारभावाहून अधिक असते याशिवाय ते विकायचे असल्यास बँका विकत घेत नाहीत.

सुवर्ण संचय योजना: 

  • अनेक सोनारकडे अशा योजना असून त्याद्वारे दरमहा पैसे भरून मुदत पूर्ण झाली की काही रक्कम बोनस म्हणून जमा होईल त्याचे सोने घेऊन घडणावळीत सूट अशा स्वरूपाची ही योजना असते. 
  • दुसऱ्या प्रकारच्या योजनेत आपल्याकडील सोने विशिष्ठ कालावधी करता ठेवून त्याबद्धल पैसे किंवा सोने अशा स्वरूपाची ही योजना आहे. 
  • सोने ठेवल्याबद्दल पैसे घेण्यापेक्षा त्यावर सोने घेणे अधिक फायदेशीर आहे. यामध्ये आपण ज्या पेढीशी हा व्यवहार करणार तिची विश्वासहर्ता महत्वाची असून यात फसवणुकीचे प्रकार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले आहे. 
  • सोन्यावर सोने देणाऱ्या योजनांवर रिजर्व बँकेने बंदी आणली असून अशा योजनांचा लाभ विद्यमान धारकांनाच घेता येईल.

गोल्ड फंडातील गुंतवणूक: 

  • यात दोन प्रकारचे फंड आहेत, प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे सोन्याच्या फंडात गुंतवणूक करणारे फंड आणि कंपन्या यात गुंतवणूक करणारे फंड. 
  • म्युच्युअल फंडाच्या अन्य योजनेप्रमाणे यात एकरकमी किमान ₹ 100/- तर एसआयपी स्वरूपात ₹ 100/- व त्यावर ₹1/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल. 
  • यासाठी डी मॅट खाते हवेच ही अट नाही. यातील गुंतवणुकीची विक्री करून फायदा मिळवता येईल. 
  • यात उलाढाल कमी असल्याने हजर भावात पडणारा फरक येते ताबडतोब प्रतिबिंबित होत नाही.

गोल्ड ईटीएफ: 

  • हे वेगळ्या प्रकारचे फंड असून त्याचा पुरस्कार करणाऱ्या कंपन्या 95% गुंतवणूक धातूस्वरूपातील सोन्यात करतात बाजारातील सोन्याच्या भावाप्रमाणे यात चढ उतार दिसून येतात. 
  • एक ग्रॅम अथवा त्याहून कमी वजन असलेले वेगवेगळे ईटीएफ उपलब्ध आहेत. शेअरप्रमाणे याचे व्यवहार केले जातात. 
  • यासाठी डी मॅट खाते असणे गरजेचे असून या युनिटची बाजार भावाप्रमाणे खरेदी विक्री करता येऊन फायदा मिळवता येईल अथवा नियमानुसार युनिट जमा करून त्याबदल्यात प्रत्यक्ष सोने घेता येईल.

ई गोल्ड: 

  • एमसीएक्स, एनसिडीएक्स या वस्तुबाजारात यातील पुढील तारखेचे म्हणजे भविष्यातील व्यवहार होतात. 
  • यातील भावातील फरक मिळवणे किंवा प्रत्यक्ष वस्तू ताब्यात घेऊन व्यवहारपूर्ती करणे असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून वस्तुबाजारातील लॉट साइज प्रमाणेच यात व्यवहार होतात. 
  • यात डिलिव्हरी घेण्याचे प्रमाण नगण्य असून 98% व्यवहार भावातील फरकाने समायोजित केले जातात.

डिजिटल गोल्ड: 

  • यापद्धतीने अगदी अल्प रक्कम गुंतवून सोने खरेदी / विक्री करता येते. पाहिजे तर ते धातू स्वरूपात रूपांतरित करता येऊ शकते. 
  • सध्या अनेक अँप, वॉलेट यांनी आपल्या धारकांना अशा सुविधा दिल्या आहेत.

सार्वभौम सुवर्ण रोखे: 

  • सोने खरेदीमध्ये खर्च होणारे बहुमूल्य परकीय चलन वाचावे या उद्देशाने रिझर्व बँकेने याची निर्मिती केली असून यातील गुंतवणुकीस सरकारी हमी असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. 
  • ठराविक कालावधीने ते जारी केले जातात. एक रोखा 1 ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करतो वर्षभरात एका गुंतवणूकदार ते 4 किलोपर्यंत खरेदी करू शकतो. 
  • विक्रीदर घाऊक बाजारातील दराशी निगडित असून डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन म्हणून ₹50 सूट मिळते. यातील रकमेवर वार्षिक 2.5% दराने दर सहामाहीस व्याज मिळते 8 वर्षांनी बाजारभावाने रक्कम परत मिळते. 
  • दुय्यम बाजारात याची खरेदी विक्री होऊ शकते. मात्र त्यासाठी डी मॅट व ट्रेडिंग खाते असण्याची गरज आहे, याशिवायही हे रोखे खरेदी करता येतील.

हे नक्की वाचा: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी

Electronic Gold Receipts: संगणकीय सुवर्ण पावती

  • सोने फक्त खरेदी किंवा खरेदी/ विक्री साठी अनेक पर्याय उपलब्ध असले प्रचलित यंत्रणेतून पारदर्शक पद्धतीने सोन्याच्या बाजारभावाचा शोध घेता येण्यावर अनेक मर्यादा आहेत. 
  • यासाठी चालू अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्रांनी कोठार विकास आणि नियामन प्रशिकरणाची निर्मिती आणि स्वतंत्र सुवर्ण बाजाराची स्थापना यांची घोषणा करून त्याचे नियमन सेबीकडे असेल, यासंबंधातील नवी नियमावली लवकरच सेबी जाहीर करेल, अशी घोषणा केली होती. 
  • यातील अपेक्षेनुसार सोन्याचा भाव हा खऱ्याखुऱ्या मागणी पुरवठा यांनी शोधला जावा यासाठी सोन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकीय सुवर्ण पावत्या (Electronic Gold Receipts) तयार केल्या जातील. 
  • त्यांना सुवर्ण रोखे म्हणून मान्यता देण्याची सेबीची योजना असून यात शक्य असल्यास स्वतंत्र सुवर्णबाजार निर्माण करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. 
  • यामुळे ईजिआर आणि सोन्याचे प्रत्यक्ष स्वीकार आणि वितरण करणारा नियमित सुवर्ण बाजार (Gold Exchange) भविष्यात निर्माण होऊ शकेल, जेथे या ईजिआरची खरेदी विक्री केली जाईल.
  • त्याची निर्मिती खऱ्याखुऱ्या सोन्याच्या बदल्यात केली गेल्याने यासाठी एक स्वतंत्र व्हॉल्टिंग यंत्रणा तयार करण्यात येत आहे. 
  • सध्या अस्तित्वात असलेले शेअरबाजार या ईजिआरची खरेदी विक्री करण्यासाठी सध्याच्या बाजारातच स्वतंत्र खरेदी विक्री दालनाची निर्मिती करू शकतात.
  • याबाबत 31 डिसेंबर 2021 ला सेबीने जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे व्हॉल्ट व्यवस्थापकांची नोंदणी करण्यात येऊन ईजिआर तयार करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे ठेवलेल्या सोन्यासाठी व्हॉल्टिंग सेवा प्रदान करण्यासाठीचे मध्यस्थ म्हणून सेबीकडून नियमन केले जाईल. 
  • व्हॉल्ट व्यवस्थापक घातूस्वरूपातील सोन्याचा स्वीकार करून त्याचे ईजिआर रोख्यात रूपांतर करेल. जमा झालेले सोने सुरक्षित ठिकाणी साठवण्यात येईल. डिपॉसीटरीमधील व्यवहारांची नोंद ठेवेल याचप्रमाणे एक्सचेंजमधील झालेले व्यवहार नियमित काळात पूर्ण करेल.
  • व्हॉल्ट व्यवस्थापक म्हणून व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली व्यक्ती किंवा संस्था ज्यांची किमान संपत्ती ₹ 50/- कोटी असेल. सेबीद्वारा नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र वैध असेल.
  • व्हॉल्ट व्यवस्थापक अन्य कोणताही व्यवसाय करीत असल्यास सोने साठवण्यासाठी, ईजिआर व्यवसायासाठी स्वतंत्र जागा आणि साठवणुकीचे ठिकाण असणे गरजेचे आहे. या जागेत अन्य वस्तूंचा साठा करता येणार नाही.
  • व्हॉल्टिंग सेवेसंबंधीत सर्व व्यवहार करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, सोन्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा, ईजिआर निर्मिती आणि रद्द करण्याची त्याचप्रमाणे यासंबंधातील तक्रार निवारण करणारी यंत्रणा त्याचप्रमाणे व्यवहार तपशील पुढील पाच वर्ष जपून ठेवण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे.
  • व्हॉल्टमध्ये सोने ठेवण्यासाठी ईजिआर बनवण्यास कोणत्याही व्यक्तीस रीतसर विनंती करावी लागेल. ते सोने जमा करून त्याचे वजन शुद्धता तपासून ईजिआरची निर्मिती करून त्याच्याकडे असलेल्या डिपॉसीटरीकडील धारकाच्या लाभार्थी मालक खात्यात तेवढे सोने जमा करेल.
  • याचप्रमाणे सोने धातूरूपात पाहिजे असलेल्या गुंतवणूकदारास डिपॉसीटरीकडे विनंती करावी लागेल. याची खात्री करून घेऊन डिपॉसीटरीकडून मान्यता मिळाल्यावर संबंधित गुंतवणूकदारास सोने सुपूर्द करून त्यासमान ईडीआर रद्द करण्यात येईल.

Tax Planning: आपण स्वतः कर नियोजन करावे का ? 

सुवर्ण बाजाराच्या हितरक्षणासाठी सेबी संबधित व्हॉल्टची, ठेवींची, कागदपत्रांची तपासणी करू शकेल. ही तपासणी करण्यापूर्वी 10 दिवस आधी व्हॉल्टधारकांना त्याची सूचना देण्यात येईल. याबाबत सर्व नियम 31 डिसेंबरपासून लागू झाले असून त्यामुळे सुवर्णबाजारात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

– उदय पिंगळे

 

 

तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी फायदेशीर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर लगेच संपर्क करा

     

    For suggestions queries – Contact us: [email protected] 

    Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

    Download Arthasakshar App – CLICK HERE

    Read – Disclaimer policies 

    Web search: Electronic Gold Receipts Marathi Mahiti, Electronic Gold Receipts in Marathi

    Share this article on :
    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You May Also Like

    बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

    Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

    MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

    Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

    पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

    Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

    मार्केट कधी पडणार?

    Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…