Tax Planning
Reading Time: 3 minutes

Tax Planning

तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुमच्याशिवाय दुसरे कोणीही चांगली समजू शकत नाही. कर नियोजनामध्ये (Tax Planning) हेच लक्षात ठेवून तुम्ही गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. 

कर नियोजनात तज्ज्ञांची मदत घ्यावी का? बर्‍याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे.

बरेच लोक कर नियोजनाच्या बाबतीत आत्मनिर्भर असतात. कर नियोजन म्हणजे कर वाचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या गुंतवणूकीच्या योजनेत गुंतवणूक करणे. दरवर्षी कर वाचविण्यासाठी आपण निश्चित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

आयकर कायद्यासंबंधित कायदे, कलमे यांचा अभ्यास करून, तसेच पगाराच्या स्वरुपात मिळालेले करमुक्त भत्ते या विषयींच्या कलमांचा अभ्यास करून तुम्ही कर नियोजन करू शकता. जर आपण व्यावसायिक असाल तर आपल्या प्रवास, मुलाचे शिक्षण, मोबाईल / इंटरनेट बिल इ. खर्च आपल्या नफा तोटा पत्रकात आपण कोणत्या खर्चाची वजावट घेऊ शकता. यासंबंधी तुम्ही अचूक गणना करू शकत असाल किंवा हिशोब ठेऊ शकत असाल, तर आपण कर नियोजन करू शकता. तथापि, आपणास कर-सवलत गुंतवणूकीच्या पर्यायांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 

हे नक्की वाचा:  सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन (सन2020-2021)

Tax Planning: कर नियोजन म्हणजे कर चुकविणे नाही 

  • सर्व प्रथम, आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की कर नियोजन म्हणजे कर चुकवणे नाही. कर नियोजनात आपण आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत, एकूण उत्पन्न आणि आयकर बचत गुंतवणूकीचे गांभीर्याने नियोजन करा.
  • कर नियोजनाचा अर्थ असा नाही की आपण आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत विचार न करता गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवाल. 
  • कुशल कर नियोजन आपणास भरायला येणारा आयकर कमी करण्यात मदत करते अथवा बचत करते. 
  • कदाचित आपण लग्न करणार आहात किंवा आपल्यास घराची आवश्यकता असेल, अशा परिस्थितीत आपल्या जोडीदाराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्यास विम्याची आवश्यकता असू शकेल. याचबरोबर, आपल्याला गृह कर्जाच्या परतफेडीच्या रकमेचा देखील विचार करावा लागेल. 
  • विमा कंपन्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसह कमीतकमी १५ पर्यायांमध्ये गुंतवणूक करुन आपण आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत आयकर वाचवू शकता. 
  • कलम 80 सी नुसार जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा १.५ लाख आहे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. 

विशेष लेख: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

आत्मनिर्भर कर नियोजन: स्वतः कर नियोजन करण्याचे फायदे 

कर नियोजन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर आपण करपात्र उत्पन्नावरील बराच आयकर वाचवू शकता. 

  1. आपण आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या कलमानुसार कर नियोजन केल्यास आपण एखाद्या करबचत करणाऱ्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक कशी करावी हे आपल्याला समजेल.
  2. एक करदाता म्हणून, जर तुम्हाला तुमच्या कमाईतील बराचसा हिस्सा म्हणजेच उत्पन्नाचा भाग तुमच्याकडे ठेवायचा असेल तर तो त्यात उपयुक्त ठरेल. अर्थात तुमच्याकडे जास्त पैसे शिल्लक ठेवायचे असतील तर त्याचा फायदा होईल. 
  3. आपण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर नियोजन केले पाहिजे.  यामुळे आपणास आयकर वाचविण्यासाठी शेवटच्या वेळी धावपळ कमी होईल. आर्थिक वर्षाची सुरुवात ०१ एप्रिल पासून होते व आर्थिक वर्षाचा शेवट ३१ मार्च रोजी होतो हे समजून घेणे महत्वाचे आहे.
  4. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी मधील सर्व पर्यायांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्याला गुंतवणूक जास्त अथवा खूप कालावधीसाठी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण लवकरच करबचत गुंतवणुकीस प्रारंभ केल्यास अथवा सुरवात केल्यास आपण त्या योजनांमधून लवकर बाहेर पडाल.
  5. आपणास आर्थिक आव्हानांना सामोरे जायचे असेल तरच कर नियोजन करून आपण आपले होणारे आर्थिक नुकसान वाचवू शकता व यातून अनेक आर्थिक अनुभव घेऊन आपण अर्थसाक्षर होऊ शकता. ज्यातून तुम्हाला पैसा बचतीसाठी मदत होईल. 
  6. यशस्वी कर नियोजनासाठी आयकरातील जटिल तरतुदींची माहिती घ्यावी लागेल. एकंदरीतच कर नियोजन करणे आपल्यासाठी एक मजेदार अनुभव असू शकतो. 
  7. एकदा तुम्हाला सर्व तरतुदींची माहिती झाली की आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही तुम्ही कर नियोजन करण्यासाठी मदत करू शकता. 
  8. याचबरोबर कर नियोजन करताना तुम्ही पैशाची गरज व आपली गुंवणूक क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. स्वावलंबी असाल ज्यामुळे तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता भासणार नाही.
  9.  आपल्या कुटुंबातील  व्यक्तींना तसेच आपल्या मित्र मंडळींनाही कर नियोजन करण्यास मदत करू शकता. 
  10. आयकर नियोजन करताना, आपल्याला आवश्यक खर्चाची पावती, रिसीट हाताळल्यावर आपल्याया बचतीविषयी छोट्या छोट्या गोष्टी समजतील आणि खर्च यासंबंधी अनावश्यक बाबी समजतील ज्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकतो.

जर आपल्याला आत्ता पैशांची आवश्यकता नसेल तर आपण 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असणाऱ्या गुंतवणूक पर्यायात (पीपीएफ) गुंतवणूक करू शकता. तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुमच्यापेक्षा जास्त चांगली कुणालाही समजू शकत नाही. कर नियोजन करताना हे लक्षात ठेवून तुम्ही गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता.

– आशिष भोजने

करसल्लागार, पुणे.

 7038577577

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Tax Planning in Marathi, Tax Planning Marathi Mahiti, Tax Planning Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.