Term Insurance
टर्म इन्शुरन्स असणे कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनिश्चिततेचा विचार करता आजच्या काळात आपल्यानंतर कुटुंबास आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी टर्म इन्शुरन्स गरजेचे आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ?
टर्म इन्शुरन्स ही जीवन विमा योजना आहे. जी पॉलिसी धारकाच्या अनपेक्षित मृत्युनंतर कुटुंबास आर्थिक सुरक्षा प्रदान करते. टर्म इन्शुरन्स पॉलिसी कालावधी पॉलिसी धारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास नॉमिनीस विम्याची पूर्व निर्धारित रक्कम मिळते. जेणेकरून पॉलिसी धारकाच्या अनपेक्षित मृत्यू नंतर देखील कुटुंबास त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास अडचण मदत मिळते. टर्म इन्शुरन्सचे आणखीन वैशिष्ट्ये म्हणजे कमी प्रीमियम खर्चामध्ये विमा संरक्षण मिळते.
हेही वाचा – Types of Term Insurance : जाणून घ्या मुदत विमा योजनांचे विविध प्रकार
टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम स्वस्त का आहेत ?
टर्म इन्शुरन्स प्रीमियम स्वस्त असण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे:
१)पॉलिसी धारकाची निरोगी जीवनशैली- टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पॉलिसी धारकाच्या जीवनशैलीवर देखील अवलंबून असतो. यामुळे टर्म इन्शुरन्स खरेदी करताना विमा कंपनी पॉलिसी धारकास वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करू शकते. पॉलिसी धारकास धूम्रपान व मद्यपान यांसारखे व्यसन असल्यास टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा इतर निरोगी पॉलिसी धारकांपेक्षा जास्त असतो. यामुळे निरोगी जीवनशैली असणे हे टर्म इन्शुरन्सच्या कमी प्रीमियमसाठी फायदेशीर आहे.
हेही वाचा – Term Insurance Rejection : ‘ही’ आहेत टर्म इन्शुरन्स क्लेम नाकारला जाण्याची कारणे
२)टर्म इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्यास – टर्म इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्यास एजंट कमिशन यांसारखे अनेक खर्च वाचतात. यामुळे टर्म इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्यास कमी प्रीमियमचा लाभ घेता येतो.
३)कमी वयात टर्म इन्शुरन्स खरेदी करणे-टर्म इन्शुरन्स खरेदी करताना पॉलिसी धारकाचे वय जेवढे कमी असेल तेवढा कमी प्रीमियम असतो. कारण तरुण वयात आरोग्याच्या समस्या शक्यतो कमी असतात व निरोगी जीवनशैली असते यामुळे मृत्यू धोका कमी असतो. म्हणून तरुण वयातच टर्म इन्शुरन्स खरेदी करणे फायदेशीर ठरते.
४)पॉलिसी कालावधी – टर्म इन्शुरन्स पॉलिसी धारकाला ठराविक कालावधीसाठी विमा संरक्षण प्रदान करते.टर्म इन्शुरन्स खरेदी करताना कालावधी निवडणे आवश्यक असते. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पॉलिसी कालावधीनुसार वेगळा असतो जेवढा जास्त कालावधी तेवढा जास्त. प्रीमियम व कमी कालावधी असल्यास कमी प्रीमियम असतो. यामुळे टर्म इन्शुरन्सची प्रीमियम रक्कम ही पॉलिसी कालावधीवर देखील अवलंबून असते.
हेही वाचा – Smoking affects health insurance premium : तुम्ही सिगारेट ओढत असाल तर विम्याबाबत ‘हे’ नक्की वाचा
म्हणून कमी प्रीमियम खर्चात टर्म इन्शुरन्स घेऊन आपल्या परिवाराचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकता.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies