Reading Time: 2 minutes

आरोग्य विमा योजना (Health Insurance Policy) वैद्यकीय आणीबाणीमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान करते. वाढत्या महागाईमध्ये आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत केलेली बचत पुरेशी नसू शकते म्हणून आरोग्य विमा असणे फायदेशीर असते. आरोग्य विमा खरेदी करताना ग्राहकास आरोग्य विमा संबंधित सर्व माहिती व्यवस्थित जाणून घेणे आवश्यक असते. आरोग्य विमा योजना उपचारादरम्यान वैद्यकीय खर्चामध्ये विमा संरक्षण प्रदान करते. परंतु त्यासाठी ठराविक कालावधीमध्ये दावा करणे आवश्यक असते.

आरोग्य विमा अंतर्गत कॅशलेस हॉस्पिटलायजेशन किंवा प्रतिपूर्ती हॉस्पिटलायजेशन दावा करता येतो.
आरोग्य विमा अंतर्गत दावा करताना दिलेल्या कालावधीत दावा करणे आवश्यक असते जर दिलेल्या वेळेच्या मर्यादेत दावा दाखल केला नाही तर विमा कंपनीद्वारे दावा नाकारला जातो. यामुळे दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा माहीत असणे आवश्यक असते.

आरोग्य विमा अंतर्गत दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा का आहे?

आरोग्य विमा अंतर्गत काही खोटे दावे केले जाऊ नये, यामुळे दावा करण्यासाठी वेळ मर्यादा दिलेली असते. वेळ मर्यादेमुळे खोटे दावे करणे कठीण जाऊ शकते. तसेच दिलेल्या कालावधीमुळे पॉलिसी धारकास दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळू शकते.

आरोग्यविमा अंतर्गत विविध प्रकारच्या दावा प्रक्रियेमध्ये दावा करण्यासाठी वेळ मर्यादा –

नियोजित हॉस्पिटलायजेशन मध्ये कॅशलेस प्रक्रियेत दावा करण्यासाठी वेळ मर्यादा –

नियोजित हॉस्पिटलायजेशनसाठी पॉलिसी धारकाने विमा कंपनीने सूचीबद्ध केलेल्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास पॉलिसी धारकास कोणताच वैद्यकीय खर्च करावा लागत नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या किमान २ ते ३ दिवस आधी विमा कंपनीस माहिती देणे आवश्यक असते. जेणेकरून पॉलिसी धारक कॅशलेस दाव्याची सुविधा घेऊ शकतो.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायजेशन दावा करण्यासाठी वेळ मर्यादा –

अनपेक्षित घटना काही सांगून घडत नाहीत. यामुळे आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास कॅशलेस हॉस्पिटलायजेशन दावा प्रक्रियेसाठी विमा कंपनीस अगोदर माहिती देणे शक्य होत नाही. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर किमान २४ तासांच्या आत विमा कंपनीस दावा करणे आवश्यक असते. या कालावधीत दावा करणे शक्य न झाल्यास विमा कंपनीद्वारे दावा नाकारला जाऊ शकतो.

हेही वाचा – Delhivery IPO : शेयर बाजारात आजपासून खुला होतोय डेल्हिव्हरी आयपीओ, जाणून घ्या ..

प्रतिपूर्ती हॉस्पिटलायजेशन दावा करण्यासाठी वेळ मर्यादा –

प्रतिपूर्ती दावा म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर सर्व वैद्यकीय खर्च पॉलिसी धारकास करावा लागतो. नंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ७ ते१५ दिवसांच्या आत वैद्यकीय खर्चाच्या भरपाईसाठी प्रतिपूर्ती दावा करणे आवश्यक असते. यासाठी पॉलिसी धारकास विमा कंपनीचा नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे अनिवार्य नसते. इतर कोणत्याही हॉस्पिटलमधून उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिलेल्या कालावधीत दावा दाखल करता येतो.
दावा दाखल करण्यासाठी पॉलिसी धारकास संपूर्ण हॉस्पिटल बिल, ओळखपत्र, अपघात झाला असल्यास FIR कॉपी इत्यादी आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक असते.

हॉस्पिटलायजेशन नंतरच्या दाव्यासाठी वेळ मर्यादा –

आरोग्य विमा अंतर्गत पॉलिसी धारकाच्या हॉस्पिटलायजेशननंतर वैद्यकीय खर्चामध्ये देखील विमा संरक्षण मिळते. शक्यतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० किंवा ९० दिवसांच्या कालावधीनंतर १५ दिवसाची दावा दाखल करण्याची वेळ मर्यादा असते. यामधील वेळ मर्यादा आरोग्य विमा कंपनीवर व पॉलिसी धारकाने घेतलेल्या आरोग्य विमा योजनेवर अवलंबून असते.

लक्षात ठेवा, आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर पॉलिसी धारकास दावा प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. दावा नाकारला जाणे टाळण्यासाठी पॉलिसी धारकास दिलेल्या कालावधीत दावा दाखल करणे गरजेचे असते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.