Reading Time: 2 minutes

“ऍप लेलो ..हमारा ऍप..छोटासा ऍप.. सबकुछ मिलेगा इसमे..लेलो ऍप लेलो..” सगळीकडे ऍप्सच्या जाहिराती दिसतात, ऍप्स डाउनलोड करायला सांगतात. संपूर्ण जग हे ऍपमय झालंय. जो तो ऍप विकतोय आणि लोक ऍप विकत घेताय.

केमिस्ट्री, फिजिक्समधील ऍप्स नाक मुरडायला लावायचे, घाबरवायचे; पण सध्याचे अँड्रॉइड आणि महागड्या सपरचंदाचे (Apple) ऍप म्हटलं की युजर्सच्या डोळ्यात एक चमक येते.

“बस एक सनम चाहीये आशिकी के लिये” पेक्षाही “बस एक ऍप चाहीये जिंदगी के लिये” अशी अवस्था आहे. ऍप हे एक संकुचन केलेलं सॉफ्टवेअर व्हर्जन असतं. गूगल तर सॉफ्टवेअरचा सगळ्यात मोठा शासक आहे. गूगलने शेकडो हजारो ऍप्ससाठी आपलं अँड्रॉइड व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. या ऍप्सद्वारेही गूगल पैसा कमावतं.

  • आज प्रत्येकाचं आयुष्य ऍप्सवर अवलंबून झालंय. ऍप्स आयुष्यातील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. या ऍप्स आणि जाहिरातीचा संबंध आहेच. “प्ले स्टोअर” मॉलमध्ये हजारो ऍप्स डाऊनलोड करताना प्रथम तिथे एक नोटिफिकेशन दिसतं की ”ऍप कंटेंंस ऍड्स”.
  • ऍप डाउनलोड केल्यावर जाहिराती सतत दिसत असतात. सध्या तर ऍप सुरू असताना, म्हणजे फेसबुक , वॉट्स ऍप किंवा इन्स्टाग्राम सुरू असताना अचानक एक जाहिरात “पॉप अप” होते. इतकंच काय तर मोबाईलचं “पॅटर्न लॉक” वापरताना, किंवा काढताना सतत जाहिरात येते.
  • बरेचदा यूजर त्या उत्कंठावर्धक जाहिरारीवर क्लिक करतो. कधी लॉक पॅटर्न उघडताना चुकून क्लीक केलं जातं. या द्वारे गूगलला आणि त्याच्या जाहिरातदारांना महसूल मिळतो.
  • आपलं ऍप गूगलच्या प्लेस्टोअरमध्ये यावं यासाठी ऍप डेव्हलपर्सची धडपड असते. कारण गूगल प्ले स्टोअरमध्ये ऍप आलं की लोक ते डाउनलोड करतील आणि त्याद्वारे डेव्हलपर्स पैसे कमावतात. डेव्हलपर्सला त्यांच्या ऍप्ससाठी जागा दिल्यावर जाहिराती गूगल ऍपमध्ये दाखवू लागतं. याद्वारे गूगल पैसा कमावतं. गूगलचं प्ले स्टोअरसुद्धा त्याचं एक महसूल गोळा करणारं साधन आहे.
  • सध्या कोणीही स्वतःचं ऍप तयार करू शकतं. आपल्याकडील योग्य ती सेवा उपलब्ध करून देणारं  ऍप प्रथम तयार करावं लागतं. हे ऍप कसं तयार करावं यासाठीही गूगलकडे ऍप्स आहेत. त्यावरून किंवा आणखी कुठल्या गूगल सेवेतून शिकून ऍप तयार केलं आणि ते ऍप गूगल प्ले स्टोअरमध्ये समाविष्ट झालं की युजर्स ते ऍप डाउनलोड करतात की हळूहळू गूगल त्या ऍपवर गूगलला मिळालेल्या जाहिराती दाखवू लागतं. यामुळे ज्याचं ते ऍप असतं तो ही पैसे कमावू लागतो.
  • सध्या टीव्हीवर , इंटरनेटवर सगळीकडे ऍप्सच्या  जाहिराती दिसतात, ऍप्स डाउनलोड करायला सांगतात. कम्प्युटरवरील सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये कुठली सेवा बघताना जे मूल्य आकारलेलं दिसतं त्याहून कमी ऍपवर  मूल्य ग्राहकांना कित्येकदा द्यावं लागतं. हे ग्राहकासाठी परवडणारं असतं. ग्राहकाने ऍप डाउनलोड करावं, यासाठीच हा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ, समजा एका सहलीच्या ठिकाणचे हॉटेल्स लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर बघताना जे रेट्स दिसतात, तेच रेट्स त्या कंपनीचं ऍप डाउनलोड केल्यावर थोडे कमी दिसतात किंवा त्यावर काही ऑफर्स दिसतात.
  • प्रथम ऍप डाउनलोड करणाऱ्या ग्राहकाला प्रथम ग्राहक म्हणून काही खास ऑफर्स किंवा कमी दरात सेवा प्रदान केली जाते. समजा एका विमान कंपनी किंवा ट्रॅव्हल कंपनीद्वारे सहलीचं किंवा विमानाचं बुकिंग लॅपटॉपवरून केल्या जात असेल तर जे दर दिसतात त्याहून थोडेसे कमी दर किंवा खास “कॅशबॅक ऑफर्स” त्याच कंपनीच्या ऍपवर मिळतात. म्हणून ग्राहक त्या कंपनीचं ऍप डाउनलोड करतो. ऍप डाउनलोड केल्यावर गूगलला जाहिरात दाखवायला आणखी संधी मिळते. कंपनीचा प्रसार होतो, ग्राहकाला हवी ती सेवा ठरवताना खूप पर्याय प्राप्त होतात, आणि गूगल या सगळ्यातून प्रचंड महसूल कमावतो.

अशाप्रकारे गुगलकडे असलेलं ऍप स्टोअर हे त्याच्यासाठी पैसा कमवण्याचं एक ऍप बनलंय.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2EznckG )

गूगल पैसा कसं कमावतं? भाग १गूगल पैसा कसं कमावतं? भाग २,  गुगल पे मार्फत आर्थिक व्यवहार,  ‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.