नववर्षाचे सर्व-सामान्यांना सरकारतर्फे गिफ्ट – 33 वस्तूंवरील जीएसटी कमी

gst rate changes

ARTHASAKSHAR
0 3,549

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

जीएसटी परिषदेच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांत मोठी कपात करण्यात आली असून नववर्षाच्या तोंडावर सामान्यांना दिलासा दिला गेला आहे.

नवे जीएसटी दर या संदर्भात आवश्यक अधिसूचना जारी झाल्यानंतर प्रभावी होतील.

जीएसटी परिषदेचे महत्त्वाचे निर्णय
• ३१ मार्च २०१९ पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.
• फूटवेअरवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के असा करण्यात आला आहे
• गोठवलेल्या भाज्या ५ टक्क्यांवरून ० टक्के
• सोलार प्रकल्पावर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
• थर्ड पार्टी इन्श्यूरन्सच्या हप्त्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
• अपंगांसाठीच्या विविध वस्तूंवरील कर आता 5 टक्के करण्यात आला आहे.
• यात्रेकरूंसाठीच्या विशेष विमानात इकॉनॉमी क्लाससाठी ५ टक्के तर बिझनेस क्लाससाठी १२ टक्के जीएसटी लागेल.
• १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के इतका करण्यात आला आहे
• १०० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या तिकिटावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १८ टक्के इतका कमी करण्यात आला आहे.
• कॉम्प्युटर, टीव्ही (३२ इंच), टायर्स, पॉवर बँक या वस्तूंवरील जीएसटीदर २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका खाली आणण्यात आला आहे.
• २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आता फक्त ३४ वस्तू राहिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने चैनीच्या वस्तूंचा समावेश आहे. सीमेंट आणि अन्य १३ वेगवेगळे ऑटोमोबाइल पार्ट्स सध्या २८ टक्के जीएसटीच्या कक्षेतच ठेवण्यात आले आहेत.
• एसी, डिशवॉशरवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.
• जीएसटी रिफंडबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या लक्षात घेऊन ही प्रक्रिया आता अधिक सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा : https://goo.gl/XT5MH8

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.