Reading Time: 2 minutes
  • प्रत्येक करदात्याने त्याचे प्राप्तिकर विवरणपत्रक (Income Tax Return) अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.
  • आयकर रिटर्न नक्की कधीपर्यंत भरायचे, याबाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम दिसून येतो. म्हणूनच प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या देय तारखांविषयी सतत अपडेट राहणं हे नेहमी गरजेचे असते. 
  • या लेखातून, आपण वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी वैयक्तिक, कंपन्या, LLP आणि फर्म आणि HUF साठी सर्व महत्त्वाच्या आयटीआर फाइलिंग साठीच्या अंतिम तारखा जाणून घेऊयात. (ITR last date 2022)

 

आयकरानुसार देय तारखेचा अर्थ (Due date for Filing ITR)

  • ज्या व्यक्तींचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे त्या व्यक्तींनी  प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर आयकर विभागाकडे आयकर विवरणपत्रक भरणे आवश्यक आहे. 
  • रिटर्न वेळेवर भरणे सुनिश्चित करण्यासाठी, कर विभागाने देय म्हणजेच अंतिम तारीख सुनिश्चित केली आहे. या शेवटच्या तारखेला इन्कम टॅक्स रिटर्ननुसार अंतिम तारीख म्हटले आहे. 
  • आयकर रिटर्न भरण्याची देय तारीख ही करनिर्धारणाच्या वर्गांवर म्हणजेच कर आकारणीच्या प्रकारांवर अवलंबून असते. उदा. वैयक्तिक, HUF, फर्म, LLP, कंपनी, ट्रस्ट आणि AOP/BOI, इत्यादी. 

 

आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या देय तारखा काय आहेत ?

1. व्यक्ती आणि HUF द्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख – 

करनिर्धारणाचा वर्ग  (Class of assessee) आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23)
वैयक्तिक आणि HUF
  • ऑडिट नसलेली प्रकरणे
  • (उदा. व्यक्ती, व्यावसायिक, छोटे व्यवसाय इ.) 
  • [ITR-1, ITR-2 किंवा ITR-4 सुगम]
३१ जुलै २०२२
  • 44AB (ITR-2) अंतर्गत ज्यांचे ऑडिट आवश्यक आहे अशा फर्म किंवा LLP चे कार्यरत (वर्किंग) भागीदार
३१ ऑक्टोबर २०२२
  • नॉन-वर्किंग पार्टनर
३१ जुलै २०२२
  • ऑडिट प्रकरणे
  • [ITR-3]
  • ३१ ऑक्टोबर २०२२
  • (ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करणे आवश्यक)

 

हे ही वाचा – ITR भरणे का गरजेचे आहे? – जाणून घ्या ITR भरण्याचे हे ९ फायदे

 

2. फर्मद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –

करनिर्धारणाचा वर्ग  (Class of assessee) आर्थिक वर्ष 2021-22 (AY2022-23)
फर्म, LLP, AOP, BOI, AJP, स्थानिक प्राधिकरण, सहकारी संस्था ऑडिट प्रकरणे [ITR-5] ३१ ऑक्टोबर २०२२ (ऑडिट अहवाल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करणे आवश्यक)
ऑडिट नसलेली प्रकरणे [ITR-5] ३१ जुलै २०२२

 

3. कंपन्यांद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख – 

करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23)
सर्व कंपन्या [ITR-6]
  • ३१ ऑक्टोबर २०२२
  • (ऑडिट अहवाल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करणे आवश्यक)

 

4. ट्रस्ट, राजकीय पक्ष इत्यादींद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –

करनिर्धारणाचा वर्ग  (Class of assessee) आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23)
ट्रस्ट, धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था , राजकीय पक्ष ऑडिट आवश्यक 

[ITR-7] नुसार दाखल करणे  आवश्यक.

३१ ऑक्टोबर २०२२

(ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करणे आवश्यक)

ऑडिट आवश्यक नसल्यास ३१ जुलै २०२२

 

5. विशेष प्रकरणांमध्ये उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख – 

करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23)
  92E अंतर्गत नोंदवायचा अहवाल
  • ३१ ऑक्टोबर २०२२
  • (ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करणे आवश्यक)
ट्रान्सफर प्रयजिंग बाबतीत प्राप्तिकर रिटर्न सादर करणे ३० नोव्हेंबर २०२२
सुधारित परतावा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत
उशीरा परतावा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत

 

 

विवरणपत्र भरण्यास उशीर झाल्यास व्याज आणि दंड किती आहे?

दंडाची रक्कम 

आर्थिक वर्ष 21-22 (AY 2022-23)

कायद्याचे कलम
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास विलंब
  • एकूण उत्पन्न रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल – रु. ५,०००
  • इतर कोणतेही प्रकरण – रु. १,०००
234F
TDS रिटर्न भरण्यास विलंब
  • देय तारखेपासून – रु. २०० प्रतिदिन 

(असा दंड TDS च्या रकमेपेक्षा जास्त नसावा.)

  • दंडः-  किमान रु.१०,००० व कमाल रु. १,००,००० 
  • देय तारखेपासून एक वर्षाच्या आत रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही.
234E

 

 

271H

 

हे ही वाचा – Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..

 

आयकर विभागातील नवीन सुधारणा पाहता, आयकर भरण्याची अंतिम तारखेची वाट पाहणे यापुढे महागात पडू शकते, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आता तुम्हाला लवकरात लवकर तुमचा कर वेळेवर भरा आणि आयकर विवरणपत्रक दाखल करा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.