Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..

Reading Time: 2 minutes

Common ITR Filing Mistakes

आयटीआर भरताना होणाऱ्या काही मूलभूत चुका (Common ITR Filing Mistakes) टाळायला हव्यात अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. ‘विविध कर’ नियमितपणे भरणे ही आपल्या सर्वांचं देशाप्रती असलेलं कर्तव्य आहे. भारत सरकारने नागरिकांची सोय व्हावी म्हणून या प्रक्रियेत मध्यंतरी बरेच बदल केले आहेत. पण, तरीही प्राप्तीकर भरणाऱ्या नागरिकांचा टक्का फारसा बदललेला नाही. प्राप्तीकर  भरण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे अर्ध्यातून ही प्रक्रिया पूर्ण न करू शकणारे कित्येकजण असू शकतात. ‘प्राप्तीकर’भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने आम्ही अशा काही चुकांची यादी देत आहोत ज्या लोकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कर भरत असताना नेहमीच होत असतात. या चुका कोणत्या आहेत,  याबद्दल जाणून घेऊया.  सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत न वाट बघता आजच आपले आयटीआर भरा. 

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना होणाऱ्या ८ चुका (Common ITR Filing Mistakes)

१. चुकीचं वर्ष निवडणे:

 • तुम्ही जर २०२०-२०२१ च्या उत्पन्नाचा कर भरत असाल तर तुम्ही ‘असेसमेंट’ म्हणजेच ‘पडताळणी’ वर्ष हे २०२१-२०२२ हे निवडलं पाहिजे. 
 • कर भरताना अगदी सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. ही चूक झाली तर तुम्हाला दोन वेळेस कर भरायची गरज पडू शकते. 

२. चुकीचा अर्ज निवडणे: 

 • प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नानुसार वेगवेगळे अर्ज हे अर्थ कर भरण्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत. 
 • तुम्हाला लागू पडणारा अर्ज हा व्यवस्थितपणे तपासून मगच तो अर्ज भरावा. तुम्ही निवडलेला अर्ज जर चुकिचा असेल, तर तुम्हाला ‘प्राप्तीकर’ भरण्याची पुनर्सूचना येईल आणि मग परत तुम्हाला नव्याने योग्य तो अर्ज भरावा लागेल.

३. फॉर्म २६ एएस सोबत पडताळणी न करणे : 

 • फॉर्म २६ एएस मध्ये तुम्ही टीडीएस आणि तुम्हाला तुमच्या पगार, व्याज किंवा मालमत्ता विक्री उत्पन्नानुसार किती कर भरणे क्रमप्राप्त आहे याचा सारांश असतो. 
 • प्रत्येक करदात्याने प्राप्ती कर भरण्या आधी फॉर्म २६ एएस आधी तपासून घ्यावा. 

४. बँक खात्याची माहिती न देणे: 

 • प्रत्येक करदात्याने आपल्या बँक खात्याची योग्य माहिती विवरण पत्रकात व्यवस्थित भरून द्यावी.  
 • तुमच्या दोन-तीन खात्यांपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची माहिती तुम्ही निवडू शकतात. 

५. चुकीची माहिती भरणे: 

 • आयकर भरण्याच्या अर्जामध्ये बरेच तक्ते असतात. आयकर खात्याला अपेक्षित असलेली माहिती ही त्यांनी आखून दिलेल्या रचनेतच देणं गरजेचं आहे. 
 • तुमच्याकडे एकापेक्षा अधिक फॉर्म १६ असतील तर तुम्ही प्राप्ती कर भरतांना अधिक सतर्क असणं गरजेचं आहे. 
 • ज्या करदात्यांकडे एकापेक्षा अधिक फॉर्म १६ असतील त्यांनी सर्व उत्पन्न, त्या उत्पन्नावर लागू असलेला कर याचा एक कच्चा नमुना करून घेणं हे संभाव्य चुका टाळू शकतात.

६. प्रत्येक उत्पन्न जाहीर न करणे: 

 • प्राप्तीकर भरताना तुमचं छोट्यातील छोटं उत्पन्न सुद्धा जाहीर करणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. 
 • तुम्हाला येणारं घरभाडं, तुम्ही आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल आणि त्याचे अतिरिक्त पैसे तुम्हाला मिळाले असतील, तर त्याचा उल्लेख तुमच्या प्राप्तीकर अर्जात केला पाहिजे. 

हे नक्की वाचा: e-filing of ITR: ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल? 

७. व्याजाचा उल्लेख उत्पन्न म्हणून न करणे: 

 • तुमच्या बचत खात्यातील रकमेवर जर तुम्हाला एका आर्थिक वर्षात १०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम जर व्याज म्हणून तुम्हाला मिळालं असेल, तर ही रक्कम सुद्धा तुम्ही उत्पन्न म्हणून दाखवली पाहिजे. 

८. तुम्ही भरलेला प्राप्तीकर विवरण पत्रकाची तपासणी न करणे: 

 • आयटीआर भरल्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज हा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्याकडे १२० दिवसांचा कालावधी असतो. 
 • तुमच्या आधार क्रमांकाची माहिती देऊन तुम्ही तुमच्या अर्जाच्या योग्यतेची पडताळणी करून घेऊ शकतात. ही सुद्धा आता तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग मध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

एखादा आजार झाल्यावर किंवा त्यापासून वाचण्यासाठी आपण ज्याप्रमाणे सतर्कता म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेत असतो. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा आयटीआर भरतांना तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे तुम्हाला  संभावित चुका होण्यापासून वाचवू  शकतं. चुका टाळा आणि आयटीआर नक्की भरा.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Common ITR Filing Mistakes Marathi, Common ITR Filing Mistakes in Marathi, Common ITR Filing Mistakes Marathi Mahiti.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!