ITR Refund: तुम्हाला तुमचा कर परतावा अजून मिळाला नाही का? – जाणून घ्या, रिफंड न येण्यामागची प्रमुख कारणे
- इन्कम टॅक्सची नवी वेबसाइट आल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे आता सोपे व पेपरलेस झाले आहे.
- आयटीआर वेळेवर भरणे फार गरजेचे असते, कारण जितक्या लवकर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भराल, तितक्याच लवकर तुम्हाला तुमचा कर परतावा म्हणजेच रिफंड (ITR Refund) मिळेल.
- पण जर तुम्ही आयकर रिटर्न भरुनही तुमचा कर परतावा आला नसेल व तो न येण्यामागची कारणे काय असतील हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आयकर परतावा (रिफंड) म्हणजे काय ?
- रिफंड म्हणजे करदात्यांनी जास्तीचा कर भरला असेल तर त्यांना प्राप्तीकर विभागातर्फे अतिरिक्त रक्कम परत केली जाते.
- हा रिफंड किंवा कर परतावा तुम्हाला तुम्ही कर विवरण पत्र (ITR) भरल्यानंतर काही दिवसातच मिळतो. मात्र तुमच्या कर विवरण पत्रामधे काही चूक झाल्यास रिफंड मिळण्यास वेळ लागतो.
जाणून घ्या कर परतावा कसा तपासावा (Income Tax Refund Status) –
– सर्व प्रथम www.incometax.gov.in या वेबसाइटवर जा.
– त्यावर यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
– ‘ई-फायलिंग’ वर क्लिक करा आणि ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ निवडा.
– ‘View Filed Return’ वर क्लिक करा.
– ITR डिटेल्स स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या कर परताव्याची सर्व माहिती मिळेल.
हे ही वाचा – ITR भरणे का गरजेचे आहे? जाणून घ्या ITR भरण्याचे हे ९ फायदे
आयकर परतावा न मिळण्याची कारणे ?
- इन्कम टॅक्स रिटर्नची पडताळणी न होणे (Verification) –
- जर तुमचा आयटीआर ठरलेल्या मुदतीत व्हेरिफाय झाला नाही, तर आयकर कायदा, १९६१ अंतर्गत, त्यांना अवैध घोषित केले जाते.
- पडताळणीसाठी बँकेत दिलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी बरोबर आहे का, याची खात्री करून घ्यावी.
- ITR दाखल करण्यापूर्वी व्हॅलिडेट करण्यासाठी तपशील जुळत नसल्यास ते अपडेट करावेत.
- त्यामुळे दाखल करण्यात येणारे विवरणपत्र पुन्हा एकदा पडताळून पाहणे आवश्यक आहे.
2. बँकेशी संबंधित माहिती –
- तुमच्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेली बँकेची सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
- तुमच्या बँक डिटेल्समध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला तुमचे रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो.
- यामध्ये तुम्हाला ईमेल व दूरध्वनी क्रमांक यांसोबतच तुमच्या बँकेच्या केवायसी ची (KYC) संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- आयटीआर वैध मानण्यासाठी बँकेचे सर्व तपशील पडताळून पाहणे गरजेचे आहे.
3. तांत्रिक अडचणी (टेक्निकल इश्यू) –
- इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर काही टेक्निकल म्हणजेच तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न मिळण्यास वेळ लागू शकतो.
- तुमचा कर परतावा न मिळण्याचे हे देखील एक प्रमुख कारण असू शकते.
4. आयकर परताव्याची विनंती नाकारणे (Refusal of Refund request)-
- तुम्ही दाखल केलेली आर्थिक माहिती अर्धवट किंवा चुकीची असेल तर तुम्हाला परतावा येण्याऐवजी अधिकचा आयकर भरावा लागू शकतो किंवा आयकर विभागाकडून थकीत कर रक्कम भरण्याची डिमांड नोटिस येऊ शकते.
- अशावेळेस, रिटर्न फॉर्ममध्ये दाखल केलेले चुकीचे आकडे व माहिती दुरुस्त करून, पुन्हा एकदा तुमच्या दाव्याचे समर्थन करणारे, कलम १३९(४) अंतर्गत सुधारणा रिटर्न दाखल करा.
- असे केल्यास तुम्हाला तुमचा पूर्वी इतकाच आयकर परतावा मिळतो किंवा थोडा परतावा कमी होऊ शकतो.
हे ही वाचा – ITR यावर्षीची इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे ?
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुमचा परतावा पाठवला आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे तुम्ही NSDL वेबसाईटवर तपासू शकता – https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.htm
तुम्ही आपल्या आयकर खात्याकडून येणाऱ्या ईमेल्स कडे आणि sms कडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही तुमच्या आयकर रिटर्नबद्दल सतत अपडेट राहणं गरजेचं आहे.