Reading Time: 5 minutes

आयकर परतावा भरून झाल्यावर आता अनेकजण रिफंडची रक्कम कधी जमा होणार, या विचारात असतील. अनेकदा कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे किंवा घाईगडबडीत जास्तीचा ॲडव्हान्स टॅक्स भरला गेल्यास अथवा जादा टीडीएस कपात झाली असल्यास, आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करून ही जास्तीची रक्कम आयकर विभागाकडून करदात्याला परत मिळते. 

खालील परिस्थितींमध्ये आयकर विभागाकडून करदात्याला रिफंड मिळतो. 

  • नोकरदारांच्या (salaried individual) बाबतीत अनेकदा करबचत करणाऱ्या गुंतवणुकांची माहिती किंवा कागदपत्रे एम्प्लॉयरकडे दाखल करायची राहून जातात. त्यामुळे संबंधित गुंतवणुकांना गृहीत न धरता कर्मचाऱ्याची  कर कपात केली जाते. त्यामुळे साहजिकच जास्तीचा कर भरला जातो. ही जास्तीची रक्कम ‘आयटीआर’ फाईल करून परत मिळविता येते. यासाठी संबंधित गुंतवणुकीबाबतची माहिती व आवश्यक कागदपत्रे आयटीआरसोबत दाखल करणे आवश्यक आहे. 
  • मुदत ठेवींमधून (FD) मिळणाऱ्या व्याजातून १०% टीडीएस कपात झाली असेल परंतु संबंधित आर्थिक वर्षासाठीचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाखांपेक्षा कमी असेल तर, कपात करून घेण्यात आलेली टीडीएसची रक्कम आयटीआर दाखल करून तुम्ही परत मिळवू शकता. 
  • समजा, तुम्ही एखादया मालमत्तेची विक्री केली आणि खरेदीदाराने नियमाप्रमाणे विक्री मूल्याच्या १% टीडीएस वजा करून पॅन क्रमांकावर सरकारकडे जमा केला. परंतु, त्याचेवेळी विक्रीच्या मिळालेल्या पैशातून तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी केलीत सदर उत्पन्नावर  कर आकारण्यात येत नाही. त्यामुळे आयकर विवरण भरताना त्यामध्ये जास्तीची टीडीएस कपात नमूद करावी लागेल. भांडवलाच्या नफ्यासाठी करमाफी असल्यामुळे आयकर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर भरून तुम्हाला तुमच्या टीडीएसची रक्कम परत केला जाईल.

आयकर रिफंडचे (Refund) काही नियम:

  • आयकर कायद्यामध्ये तरतूद केलेल्या कोणत्याही कारणाने करदात्याकडून करापोटी जास्तीची रक्कम भरणा झाली असल्यास आयटीआर दाखल करून परत मिळवता येते. 
  • करदात्याने आयटीआर दाखल केल्यावर आयकर विभागाकडून त्याची पडताळणी करण्यात येते. यासाठी करदात्याने १२० दिवसांच्या आत त्याचे रिटर्न इ- व्हेरिफाय (e-verify) करणे आवश्यक आहे. इ-व्हेरिफाय केल्याशिवाय करदात्याला रिफंडची रक्कम परत मिळू शकत नाही. 
  • आयकर कायदा कलम १४३(१) मधील तरतुदींनुसार यासंदर्भात सर्व पडताळणी केली जाते. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यावर अंतिम करदायित्व (final tax liability)  किंवा रिफंडची रक्कम निश्चित करण्यात येते. 
  • रिफंडची रक्कम निश्चित झाल्यावर आयकर विभागाकडून करदात्याला एसएमएस किंवा इमेलद्वारे रिफंड संदर्भात माहिती देण्यात येते. त्यानंतर रिफंडची रक्कम करदात्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. यासाठी करदात्याला रिफंड सिक्वेन्स क्रमांक देण्यात येतो. 
  •  करदाता त्याच्या रिफंडच्या रकमेचे स्टेटस ऑनलाईनही तपासू शकतो. 

जर आयकर विभाकडून यासंदर्भात कोणताही मेसेज किंवा इमेल आले नाही तर करदाता आयकर विभागाच्या इ-फायलिंग वेबसाईटवर जाऊन  रिफंडचे स्टेट्स तपासू शकतो. यासाठी- 

१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन लॉग-इन करा. लॉग इन करण्यासाठी पॅन क्रमांक, इ फायलिंग पासवर्ड व कॅप्चा कोड एंटर करावा लागतो. 

२. त्यानंतर व्ह्यू रिटर्न/ फॉर्म्स या पर्यायावर क्लिक करा.  

३. यानंतर ‘‘Income Tax Returns’ हा पर्याय निवडून ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. 

४. त्यानंतर स्क्रीनवर स्क्रोल केल्यावर दिसणारा अक्नॉलेजमेंट क्रमांकावर (acknowledgement number) क्लिक करा. 

५. त्यानंतर स्क्रीनवर आयटीआर फायलिंग आणि प्रोसेसिंगची माहिती उपलब्ध होईल. त्यामध्ये आयटीआर दाखल केल्याची तारीख, तो तपासल्याचा दिनांक, प्रक्रिया पूर्ण झाल्याची तारीख, रिफंड मंजूर केल्याची तारीख, मोड ऑफ पेमेंट, इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या असतील. 

६. जर रिफंड इश्यू करण्यात आला नसेल तर, त्याची कारणे व तो रीइश्यू करण्यासाठीची लिंक देण्यात येते. 

टीआयएन -एनएसडीएलच्या (TIN NSDL) वेबसाइटवरून 

१. यामध्ये टॅक्स रिफंड स्टेटसपर्यंतची सर्व प्रक्रिया वरीलप्रमाणेच करावी लागते. 

२. पॉप अप स्क्रीनवर दिसल्यावर टीआयएन -एनएसडीएलच्या (TIN NSDL) वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करा. 

३. लिंकवर क्लिक केल्यावर रिफंड ट्रॅकिंगचे वेबपेज ओपन होईल. 

४. रिफंड ट्रॅकिंग वेबपेजवर पॅन क्रमांक टाकून संबंधित असेसमेंट इअर टाकून कॅप्चा कोड टाकल्यावर रिफंड स्टेट्सचे पेज ओपन होईल. 

५. त्यामध्ये मोड ऑफ पेमेंट, रेफरन्स नंबर, रिफंड स्टेटस आणि रिफंड इश्यू केल्याची तारीख या सर्व गोष्टी दिसतील. 

६. त्यानंतर प्रोसिड (Proceed) या पर्यायावर क्लिक करावं. 

  • रिफंडची प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पार पाडण्यात येते. आर्थिक वर्ष २०१८-१९ पूर्वी रिफंडची रक्कम करदात्याला आरटीजीएस /एनइएफटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जायची किंवा चेक अथवा डिमांड ड्राफ्ट  (DD) करदात्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात येत असे. 
  • परंतु, आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून ज्या बँक खात्यात पॅन क्रमांक जोडलेला असेल आणि ई-फाइलिंग करण्यापूर्वी ज्याची वेधता (validation)  केलेलं असेल, केवळ अशा बँक खात्यांनाच ई-रिफंड देण्यात येतो.

रिफंड स्टेटसवर दिसणारे विविध पर्याय:

  1. रिफंड रिटर्न: ज्यावेळी आयकर विभागाकडून इलेक्टोनिक कीअरन्स सिस्टीमद्वारा (ECS) रिफंड इश्यू करण्यात येतो, परंतु बँक डिटेल्स चुकीचे असल्यास, हा पर्याय दिसतो. 
  2. प्रोसिड थ्रू डायरेक्ट क्रेडिट बट फेल्ड: याचा अर्थ रिफंड बँकर म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने थेट बँक खात्यामध्ये जमा झालेली रक्कम खालील कारणांमुळे परत आल्यास-
    1. चुकीचा खातेक्रमांक दिल्यास 
    2. खातेदारचा मृत्यू झाला असल्यास, 
    3. बँक खाते दीर्घकाळापर्यंत वापरात नसल्यास
    4. बँक खाते अनिवासी भारतीय (NRI) खाते असल्यास
  3. आरटीजीएस /एनइएफटीद्वारे केलेली अयशस्वी रिफंड प्रक्रिया: रिटर्न भरताना दिलेला बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि आयएफएससी कोड चुकलेला असल्यास एनईएफटी / एनईसीएसद्वारे केलेली रिफंड प्रक्रिया पूर्ण होत नाही.
  4. अयशस्वी ईसीएस (ECS) प्रक्रिया: करदात्याला बँक खात्यात जमा केलेल्या रिफंडचा तपशीलासह ईमेल आला असल्यास, परंतु संबंधित रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली नसल्यास, ही रक्कम चुकीच्या खात्यात जमा झाली आहे की नाही हे आपण आपल्या बँकेतून तपासू शकता. तसेच आपण [email protected] वर ईमेल देखील पाठवू शकता.

रिटर्न री इश्यू विनंती: 

जर करदात्याने आयटीआरमध्ये चुकीचे बँक डिटेल्स दिले असतील आणि त्यानुसार रिफंड प्रक्रिया केली गेली असल्यास रिटर्न री इश्यू करण्याकरिता तुम्ही विनंती करू शकता. यासाठी-

  1. www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉगऑन करा.
  2. ‘माझे खाते’ (‘My Account) टॅबवर जा आणि ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर क्लिक करा.
  3. रिक्वेस्ट प्रकार निवडून ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
  4. पॅन, रिटर्न प्रकार, मूल्यांकन वर्ष, पावती क्रमांक, संप्रेषण संदर्भ क्रमांक, परतावा अयशस्वी होण्याचे कारण आणि प्रतिसाद असे पर्याय समोर दिसतील.
  5. रिस्पॉन्स (प्रतिसाद) या पर्यायावर क्लिक करा.
  6. ज्या बँकेत रिफंड जमा करायचा आहे त्या बँकेचे खाते निवडा आणि कंटिन्यू टॅबवर क्लिक करा.
  7. बँक खाते क्रमांक, आयएफएससी, बँकेचे नाव आणि खाते प्रकार यासारख्या तपशीलांची पडताळणी करा. लक्षात ठेवा, आपले बँक खाते आयकर विभागाने व्हॅलिडेट केलेले असावे.
  8. ‘पॉप-अप’वर ‘ओके’वर क्लिक करा, जर संपूर्ण माहिती योग्य असेल तर, इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (ईव्हीसी), आधार ओटीपी किंवा डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) वापरून रिक्वेस्ट सबमिट करा.
  9. तुमची विंनती मंजूर केल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.

रिफंडची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी आटीआर दाखल करताना अचूक बँक तपशील भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आयटीआर दाखल करताना योग्य ती काळजी घ्या. 

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती

रिफंडबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रिफंडबद्दलची माहिती

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…