Reading Time: 3 minutes

दरमहा जमा होणारा पगार कापरासारखा कधी उडून जातो हे अनेकांना समजत नाही. लहान वयापासूनच पैसे कसे वाचवायचे याबद्दल माहिती दिली जात नाही त्यामुळे पैसे कमवल्यानंतर ते कसे खर्च करायचे याबद्दलची माहिती मिळत नाही. 

पैसे खर्च करून कसे वाचवायचे याबद्दलच्या आयडिया खालील लेखात देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे पालन केले तर तुमच्या बचत रकमेत निश्चितच वाढ होईल. 

 

१. अनावश्यक वस्तू आणि गोष्टींवरील खर्च थांबवा 

  • जेव्हा पैसे हातात येतात तेव्हा ते अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. एखाद्या गोष्टीची खरेदी करण्याची इच्छा होते तेव्हा सर्वसामान्यपणे ती २४ तासानंतर खरेदी करावी, त्यामुळे त्या वस्तूची खरच गरज आहे का हे लक्षात येते. 
  • जेव्हा हा खर्च कमी होतो तेव्हा पैसे आपोआपच तुमच्या बचत खात्यात जमा होतात. 

 

२. तुमच्या मासिक उत्पन्नातून बचत करा 

  • तुम्ही तुमच्या मासिक खर्चातून किती रक्कम बचत करू शकता हे ठरवायला हवे. महिन्याच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या पैशातून बचत करून उरलेली रक्कम खर्च करायला हवी. 
  • जेव्हा खर्च करायला कमी रक्कम राहील तेव्हा खर्चाबद्दल संबंधित व्यक्ती जागरूक आणि सावध होतो. एकदा का तुम्हाला बचत करण्याची सवय लागली की तुमच्या बँक खात्यातील रक्कम वाढत जाते. 

 

३. पैसे खर्च करताना समाधानी वृत्ती ठेवा

  • सध्याच्या घडीला प्रत्येकाला सोशल मीडियातून जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्यात म्हणून आग्रह केला जातो. 
  • त्यामुळे सगळेजण महागड्या आणि अनावश्यक वस्तू खरेदी करत असतात. जास्तीच्या खरेदीमुळे बचतीवर ताण येतो. तुमच्याकडे आधीपासून असलेल्या वस्तूंसह तुम्ही जगू शकता याचे भान ठेवा. 

 

नक्की वाचा – Lifestyle: तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

 

४. आपत्कालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्ट्ये ठरवा 

  • करिअरच्या सुरुवातीलाच छोट्या रकमेमधून पैशांची बचत करायला हवी. तुम्ही एका वर्षासाठी रक्कम वाचवण्यापेक्षा आठवड्यातून ठराविक रक्कम वाचवण्याचे ध्येय बाळगायला हवे.
  • तुमच्यासाठी आपत्कालीन निधी उभारणे आणि पैशांची बचत उभी करणे हे छोटे ध्येय असायला हवे. एकदा का बचतीची सवय लागली की कार, घर आणि फिरायला जाण्याचे स्वप्न आपोआप पूर्ण होते. 

 

५. नवीन खरेदी करताना सवलतींचा फायदा घ्या

  • नवीन खरेदी करायला जेव्हा कोणीही जाते तेव्हा सर्वसाधारणपणे कूपन, कॅशबॅक ऑफर्स, क्रेडिट कार्ड पॉईंट्स यांचा वापर केला जातो. 
  • पुढील वेळेला तुम्ही जेव्हा खरेदीला जाल तेव्हा मला सवलत कशी मिळू शकेल याचाही विचार करा. सवलतींचा लाभ घेतला तर कमी किंमतीत खरेदी होऊन जाते आणि पैशांची बचत होते 

 

६. एटीएमचा वापर कमी करा 

  • एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त वेळा डेबिट कार्ड मधून रक्कम काढल्यामुळे दंड भरावा लागतो. जेव्हा तुम्ही एटीएम मधून पैसे काढता तेव्हा त्याच्यावर चार्ज लागतो. प्रत्येक बँक ही जास्तीत जास्त ५ वेळा पैसे काढण्याची मुभा देते, त्यानंतर काढलेल्या प्रत्येक रकमेवर अतिरिक्त रक्कम आकारली जातो. 
  • जर तुम्हाला कायम पैसे काढावे लागत असतील तर एकदम पैसे काढा आणि ते जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरा किंवा युपीआय च्या माध्यमातून पेमेंट्स करा. 

 

हे ही वाचा – Common Tax Saving Mistakes : कर बचत करताना टाळा ‘या’ 8 चुका

 

७. महिन्याच्या खर्चाचे निरीक्षण करणे  

  • तुम्ही महिनाभरात प्रक्रिया केलेल्या किंवा बाहेरील अन्न खरेदीवर जास्त पैसे खर्च करत असाल तर ते वेळीच थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळे खर्च कमी  होण्यासोबतच शरीराचे आरोग्य निरोगी राहते.
  • जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूवर कायमच खर्च करत असाल तर त्याऐवजी बागकाम किंवा त्यासारख्या गुंतवणून ठेवणाऱ्या छंदांची जोपासना करणे योग्य राहते. 

 

८. क्रेडिट कार्ड व्याज वेळेवर भरा 

  • तुमचे क्रेडिट कार्ड बिल जर तुमच्या पगारापेक्षा जास्त असेल तर ते वेळीच कमी करायला हवे. 
  • जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल तुम्ही वेळेवर भरत नाहीत तेव्हा त्याच्यामुळे क्रेडिट स्कोअर तर कमी होतोच, सोबत कर्ज घेतलेल्या  रकमेवर पण जास्त व्याज लागते. अशावेळी ज्याची गरज आहे तेच खरेदी करून क्रेडिट कार्डचा वापर पूर्णपणे टाळायला हवा. 

 

९. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा 

  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास कमी पैशात प्रवासाचा खर्च होतो. जवळच्या बसस्टॉपवर जाऊन बसमध्ये बसून  तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी जाऊ शकता. यामुळे बचत होऊन तुमचा महिन्याचा खर्च कमी होऊ शकतो. 
  • प्रत्येकवेळेस स्वतःची गाडी वापरायचा अट्टहास सोडायला हवा. 

 

१०. आकर्षक ईमेल सदस्यत्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यत्व रद्द करा 

  • ईमेल न्यूजलेटरचे सदस्यत्व गरज नसल्यास घेऊ नये. बहुतेक प्लॅटफॉर्मवरती ज्याची गरज नसते त्याचीच जाहिरात दाखवली जाते. जेव्हा कधी तुम्ही याचे सदस्यत्व घेणार असाल तेव्हा त्यामुळे तुम्हाला काय मिळेल याचा विचार करावा. 
  • तुम्हाला गरज नसेल तर ते इ-मेलचे न्यूजलेटर अनसबस्क्राईब करून टाकावे. बऱ्याच जणांनी गरज नसताना ओटीटी प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घेतलेले असते. जेव्हा गरज नसते तेव्हा हे बंद करून टाकावे. 

 

११. कार शेअरिंग करून प्रवास करा 

  • जेव्हा तुम्हाला ऑफिसला जायचे असते तेव्हा त्या मार्गावर उपलब्ध असणाऱ्या सहकाऱ्यांसोबत शेअरिंग करून कॅब मधून प्रवास करावा. एकट्याने प्रवास करणापेक्षा राईड शेअर हा पर्याय निवडावा.
  • त्यामुळे तुम्हाला नवीन लोक भेटण्यासोबतच एकूण बिलावर सूट पण मिळत जाईल. यामुळे महिन्याकाठी कारवर होणारा खर्च वाचवला जातो.  

 

पैसे वाचवणे हे एकप्रकारचे तुमचे अधिकचे उत्पन्न आहे. पुरेसे पैसे अकाउंटला आहे हे सुख अनेकांना आवडते. त्यामुळे पैसे वाचवा आणि सुखी व्हा !  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…