बचत व आर्थिक शिस्तीचे मार्ग
Image credit https://bit.ly/3bgMVwy
Reading Time: 3 minutes

गणपती बाप्पाची नावे आणि बचत व आर्थिक शिस्तीचे मार्ग

गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. गणपती स्तोत्र न येणारा क्वचितच कोणीतरी असेल. या गणपती स्तोत्रामध्ये गणेशाच्या बारा नावांचा उल्लेख आहे. ही नावे आपल्याला बचत व आर्थिक शिस्तीचे मार्ग शिकवतात. ही बारा नावे म्हणजे वर्षातले बारा महिने असा विचार करुन जर प्रत्येक महिन्यासाठी आर्थिक नियोजन केले तर वर्षाअंती एका ठराविक रक्कमेचा संचय आपण करु शकतो. 

गणपतीची काही नावे जरी त्याचं शरीर-वैशिष्ट्य दाखवणारी असली तरी काही नावांमध्ये मात्र गहन अर्थ दडलेला आहे. 

बाप्पाची नावे आणि  बचत व आर्थिक शिस्तीचे ७ मार्ग :

१. वक्रतुंड: 

  • वक्र म्हणजे वाकडे व तुंड म्हणजे तोंड असा ढोबळ मानाने विचारात घेतलेला अर्थ इथे अभिप्रेत नाही. इथे वक्र किंवा वाकडे म्हणजेच दुष्ट किंवा वाईट व तुंड म्हणजे संहार करणारा असा अर्थ आहे.

  • त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करताना, 

    • झटपट पैसे कमावून देणारी गुंतवणूक 

    • अथवा कुठलाही त्रास न होता आपल्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटिने अधिक प्रमाणात मिळणारे कर्ज 

  • अशा वक्र किंवा दुष्ट प्रस्तावांपासून स्वतःच रक्षण करा व अशा प्रस्तावांसाठी मनात येणाऱ्या प्रलोभनांचा नाश करुन त्यापासून दूर रहा. 

  • यामध्ये प्रामुख्याने शेअर्स, भरमसाठ व्याज देणाऱ्या खाजगी  पतसंस्था, क्रेडिट कार्ड कर्ज, सावकारी कर्ज इत्यादींचा सामावेश होतो. 

हे नक्की वाचा: बाप्पाकडून शिका आर्थिक नियोजन

२. एकदंत:

  • एकदंत म्हणजे एक दात असणारा. हे नाव गणेशाला त्याच्या शरीर वैशिष्ट्यामुळे पडले आहे. 

  • आर्थिक नियोजन करतानाही जरी तुमच्याकडे उत्पन्नाचा एकच स्त्रोत असेल तरी तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाच योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे/ करु शकता, असा संदेश यातून मिळतो. यासाठी छोट्या गुंतवणूकींचे पर्याय उपलब्ध आहेत.

  • उदाहरणार्थ रिकरिंग डिपॉझीट, पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझीट इत्यादी पर्यायांचा विचार तुम्ही गुंतवणूक म्हणून करु शकता. 

३. कृष्णपिंगाक्ष

  • कृष्णपिंगाक्ष या शब्दाची फोड केली तर ‘कृष्ण’ म्हणजे रंगाने काळा असा पृथ्वीचा थर. तर ‘पिंग’ या शब्दाला ढगांच्या अर्थाचा शब्द मानला असून ‘अक्ष’ म्हणजे डोळा.

  • गणपती हा स्वर्गापासून मृत्यूलोकांपर्यंत त्यांच्या डोळ्यांनी सर्व मनुष्यकर्म पाहू शकतो. त्यामुळे गणपतीला ‘कृष्णपिंगाक्ष’ म्हटलं जातं.

  • त्याचप्रमाणे कुठल्याही गुंतवणूकीबद्दल अथवा कर्जाबद्दल सर्व बाजूंनी पाहून म्हणजेच विचार करुनच त्याबद्दलचा निर्णय घेणे आवश्यक आहे.

  • अर्धवट माहितीच्या आधारे किंवा दिखाव्यावर भूलून घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक नुकसानीचं संकट येवू शकतं. इन्श्यूरन्स, म्युच्युअल फंड्स, बॉंड्स यामध्ये गुंतवणूक करताना यासंदर्भातील सर्व व नियम व अटींची संपूर्ण माहिती घेऊनच यामध्ये गुंतवणूक करावी. 

इतर लेख: कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

४. लंबोदर

  • लंबोदर म्हणजे (लंब म्हणजे लांब व उदर म्हणजे पोट) मोठं पोट असणारा. भक्तांच्या चुका पोटात घेऊन त्यांना माफ करणाऱ्या  गणेशाला हे नाव त्याच्या शरीर वैशिष्ट्यामुळे पडले आहे.
  •  ज्याप्रमाणे गणेश भक्तांच्या सर्व चुका पोटात घेतो त्याप्रमाणे आपण आर्थिक व्यवहारांमध्ये केलेल्या चुका विसरुन त्याबद्दल विचार करुन योग्य ती गुंतवणूक करायला शिकल पाहिजे.
  • परिस्थिती ही नेहमीच बदलती असते. ती चांगली किंवा वाईट असते. काहीवेळा अचानक उद्भवलेली अनपेक्षित परिस्थिती आर्थिक नुकसानीच कारण ठरते.
  • प्रत्येक वेळी गुंतवणूकीतून फायदाच होतो असं नाही कधीकधी तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे नफा व तोटा या दोन्ही गोष्टी पचवायची ताकद आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे.  
  • म्युच्युअल फंड्स, शेअर्स यामध्ये केलेल्या गुंतवणूकींच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडतं. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना भविष्यात यामधून तोटाही सहन करावा लागू शकेल यासाठीची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. 

५. विकट:

  • गणपतीला ‘विकट’ नावानेही ओळखले जाते.  ‘वि’ म्हणजे विकृत बुद्धीचा नाश करून ‘अकट’ म्हणजे मोक्ष देणारा म्हणजे ‘विकट’ होय.
  • याचप्रमाणे आर्थिक नियोजन करताना अतिरिक्त व  अनावश्यक खर्चास कारणीभूत ठरणारी प्रलोभनं टाळून उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणीकीचा विचार करणं खूप महत्वाच आहे.
  • यामध्ये क्रेडिट कार्डवर अथवा डेबीट कार्डवर मिळणाऱ्या चकचकीत  ऑफर्सचा सामावेश करता येइल, ज्या अनावश्यक खर्चास कारण ठरतात.  
  • काही वेळा या ऑफर्स लाभदायी ठरत असल्या तरी बहुतांश वेळा जास्तीच्या खर्चाला आमंत्रण देणाऱ्या ठरतात. गरज नसताना निव्वळ ऑफर आहे म्हणून अनेक महागड्या गोष्टी खरेदी केल्या जातात.
  • तेव्हा अशा ऑफर्सच्या भोवऱ्याला भुलणाऱ्या  मनोवृत्तीला आवर घालून मोहाचा नाश करणेच हितावह आहे. 

हे नक्की वाचा : कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

६. विघ्नराजेंद्र

  • ‘विघ्नराजेंद्र’ या शब्दाचा सोपा अर्थ असा होतो की, ‘विघ्न’ म्हणजे संकट किंवा दु:ख आणि ‘ईश’ म्हणजे देव विघ्न दूर करणारा देव म्हणजे ‘विघ्नेश’ किंवा ‘विघ्नराजेंद्र’ नावाने ओळखला जातो.
  • याचप्रमाणे आर्थिक नियोजन व सुयोग्य गुंतवणूक आपल्याला व आपल्या कुटुंबियांना आर्थिक  संकटाच्या काळात उपयोगी पडते व आर्थिक संकटातून बाहेर पडताना जास्त त्रासही होत नाही.
  • अनेकदा नैसर्गिक आपत्ती, आजारपण, अपघात यामुळे कुटुंबातील माणसांच आयुष्य विस्कळीत होतं.
  • यामध्ये अनेकदा आर्थिक नियोजन बिघडतं आणि आवक कमी जावक जास्त अशी परिस्थिती निर्माण होते. यावर्षी कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
  • याचवेळी आरोग्य विमा, जीवनविमा, अपघात विमा, इमर्जन्सी फंड, गुंतवणूक खूप मोलाची भुमिका बजावतात व कुटुंबावरील आर्थिक भार हलका होतो. त्यामुळे विम्यामधील वा तत्सम गुंतवणूक किती आवश्यक आहे हे यावरून लक्षात येइल.

७. धूम्रवर्ण

  • धूम्रवर्ण धूरासारखा रंग असलेला असा होतो, पण इथे हा अर्थ नसून,  गणपती हा तेज तत्वाचा स्वामी मानला जातो आणि जिथे अग्नी तिथे धूर होणारच . म्हणजे जिथे अग्नी, तेज, धूर तेथे गणपती अशा सोप्या अर्थाने गणरायाचं तत्व प्रदर्शित करणाऱ्या रूपाच हे नाव.
  • आर्थिक नियोजनाच्या बाबतीत जिथे नियम, असंदिग्ध अटी व विश्वसनीय संस्था/ कंपनी असेल तिथे केलेली गुंतवणूकच योग्य असते.
  • जीथे धूर दिसतो तिथे आग असणारच म्हणजे जिथे झटपट पैसे मिळवून देणारा पर्याय असतो तिथे संशयाचा धूर निर्माण होतो. त्यामुळे अशी गुंतवणूक फसवी असणार यात शंकाच नाही.
  • त्यामुळे आर्थिक नियोजन करतानाहीे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी.  तेव्हा अशा ठिकाणी गुंतवणूक शक्यतो करुच नये.

तर, अशी आहेत आपल्या गणपतीची काही नावे. या नावांची आर्थिक नियोजनाशी घातलेली सांगड बघता यामध्ये किती गहन अर्थ दडलेला आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.

चला तर मग या गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपल्या आर्थिक नियोजनाचा आरंभ करुया.

टीम अर्थसाक्षरतर्फे अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.