म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की त्यातील वाढ कम्पाउंडिंगच्या शक्तीने होत जाते. जास्त काळ एसआयपीद्वारे गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावाही जास्त असतो. बाजारात शेकडो म्युच्युअल फंड असताना कशात गुंतवणूक करायची हे मात्र गुंतवणूकदाराला समजत नाही.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? –
- योग्य म्युच्युअल फंडाची निवड केली तर तुमचे आर्थिक ध्येय पूर्ण करणे सहज सोपे जाते. तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ला किंवा शेअर बाजाराचा स्वतः अभ्यास केल्यावर हे शक्य होते.
- समजा एखाद्या म्युच्युअल फंडाची निवड केल्यानंतर त्यातून १२% दराने परतावा मिळत असेल आणि तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी १ कोटींपेक्षा जास्त रकमेची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता.
- पण हे गुंतवणुकीचे ध्येय कसे गाठायचे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. बँकेत गुंतवणूक करून १ कोटी रुपये मिळवण्यासाठी सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक करावी लागते.
- म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला सुरुवात केली तर २५ वर्षात ५ कोटींपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
म्युच्युअल फंडातून ५ कोटी रुपये कसे मिळवावेत? –
- समजा, गुंतवणूकदाराने दर महिन्याला ३०,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्याला १२% दराने वार्षिक परतावा मिळाला तर १ कोटी रुपये मिळवायला गुंतवणूकदाराला १२ वर्ष लागतील.
- आपण कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरच्या मदतीने हे पाहू शकता. याचा प्रवास समजून घेऊयात.
- वार्षिक १२% परताव्याने ३०,००० रुपयांची एसआयपी चालू केली तर १२ वर्षांमध्ये १ कोटी रुपये मिळू शकतात. त्यानंतर १ पासून २ कोटी रुपये मिळवायला पुढचे ५ वर्ष लागतील. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चक्रवाढ दराने वाढत जाईल.
- पुढील ३ वर्षात ३ कोटी आणि २ वर्ष ३ महिन्यात त्याच रकमेचे ४ कोटी रुपये होतील. त्यानंतर मात्र २ पेक्षा कमी वर्षात ४ कोटींचे ५ कोटी रुपये होऊन जातील.
नक्की वाचा : म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करताना
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे का? –
- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात करणे सुरक्षित समजले जाते. कारण त्यामध्ये एकच फंडद्वारे जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते.
- योग्य अभ्यास आणि शेअर बाजाराची माहिती असली की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सुरक्षित समजले जाते. कारण त्यावर दीर्घ आणि आपत्कालीन चढ उताराचा परिणाम दिसून येत नाही.
- ज्यांच्या बँक खात्यात पैसे आहेत त्यांच्यावर चलनवाढीचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. पण दीर्घकाळासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांवर याचा परिणाम दिसून येत नाही.
- दीर्घकाळानंतर चांगली संपत्ती निर्माण करायची असेल तर चक्रवाढ, रुपयाची सरासरी किंमत, व्यावसायिक व्यवस्थापन मुद्यांचा म्युच्युअल फंडात विचार केला जातो. दीर्घकाळानंतर त्यातून मिळणारा परतावाही जास्तच असतो.
- गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना खालील ५ चुका अवश्य टाळा –
१. योग्य फंड निवड –
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कोणत्या फंडातून चांगला परतावा मिळेल याचा अभ्यास करावा. गरज वाटत असेल तर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
- काही गुंतवणूक क्षेत्र ठराविक काळातच तेजीत असतात, त्यामुळे गुंतवणूकदाराने भविष्य काळाचा विचार करूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी.
२. एसआयपीतील गुंतवणूक थांबवणे –
- एसआयपी मध्ये जशी वाढ होते तशीच त्यामध्ये घट पण होते. त्यातच कंपनीकडून गुंतवणुकीचे कायम ई-मेल पाठवले जातात. त्यामुळे घट झालेल्या काळात एसआयपी बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.
- एसआयपी बंद करण्याचा निर्णय गुंतवणूकदाराने घेऊ नये. त्यामध्ये पैसे टाकता येत नसतील तरी एसआयपी कमीत कमी बंद तरी करू नये.
३. एसआयपी चालू करून विसरून जाणे –
- एसआयपी चालू केल्यानंतर तिच्यावर लक्ष ठेवायला हवे. यामुळे योग्य परतावा मिळतो का नाही याची माहिती गुंतवणूकदाराला समजते.
- अनेक जण असे असतात जे एसआयपी चालू करतात पण नंतर त्यातील गुंतवणुकीकडे लक्ष देत नाहीत. एसआयपी मधून योग्य परतावा मिळत नसेल तर दुसऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.
४. योग्य संधीची वाट पाहणे –
- गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी कधी येताच नाही. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे असते.
- अनेकदा गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार संधीची वाट पाहतात पण अशावेळी संधी कधीही येत नाही.
५. एसआयपीच्या परताव्यातून आपले ध्येय न ठरवणे –
- एसआयपी मधून चांगला परतावा मिळतो. एसआयपी मध्ये पैशांची गुंतवणूक करत असताना त्यातून किती कालावधीनंतर चांगला परतावा मिळेल याची माहिती काढावी.
- त्यानुसार गुंतवणूक करणे सोपे जाते. लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते.
- बाजार दिशेप्रमाणे बदल करणाऱ्या म्युच्युअल फंडातून कायमच चांगला परतावा मिळतो.
६. कमी कालावधीसाठी गुंतवणूक –
- एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असताना कमी कालावधीसाठी ती करूच नये.
- एसआयपीमधून दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळतो. त्यामुळे शक्यतो यामध्ये गुंतवणूक करताना जास्त काळासाठीच करावी.
- शेअर बाजार कायमच खाली वर होत असतो, त्यामुळे एसआयपी मधून अपेक्षित परतावा मिळवायला वेळ लागतो.
नक्की वाचा : म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे नक्की वाचा
लक्षात ठेवा ! शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नसेल तर म्युच्युअल फन्ड्स हे गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे !