राष्ट्रीय शेअरबाजाराने गेल्या गुरुवारी 23 फेब्रुवारी 2023 रोजी आपले सदस्य, मान्यताप्राप्त मध्यस्थ यांच्यावर स्वतःचा उल्लेख सल्लागार, म्युच्युअल फंड सल्लागार, भांडवल व्यवस्थापक, मालमत्ता/वित्त/ गुंतवणूक संच व्यवस्थापक यासारखी विशेष नामकरणे करण्यास काही बंधने घातली आहेत.
शेअरबाजाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी अशा अर्थांच्या काही वरील शब्दांची यादी बनवली आहे. एक्सचेंजचे अनेक सदस्य, ब्रोकर्स त्यांचा असा विशेष उल्लेख सेबी किंवा संबंधित यंत्रणेकडे नोंदणी न करता करीत आहेत हे गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे आहे. जर त्यांनी बाजारात स्वतःची नोंदणी दलाल किंवा मान्यताप्राप्त मध्यस्थ म्हणून केली असेल तर त्याचा संबंध फक्त शेअरबाजारातील खरेदी विक्री व्यवहारांपुरताच मर्यादित आहे. जर अन्य व्यवसायाची नोंदणी न करता ते असा व्यवसाय करीत असल्याचे सांगणे हे चूक आहे
हेही वाचा – शेअर बाजार गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?
एक्सचेंजने हे पाऊल गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून उचलले असून सध्या स्वतःचा उल्लेख करताना कोणते शब्द सदस्यांनी वापरू नयेत यांची उदाहरणादाखल 61 शब्दांची यादी बनवली असून ते शब्द असे –
01. Adviser/Advisor
02. Advisory Services
03. Asset
04. Asset Advisory
05. Asset consultancy
06. Asset distribution
07. Asset management
08. Asset manager
09. Asset services
10. Asset consultants
11. Capital Adviser/Advisor
12. Capital management
13. Capital services
14. Corporate advisory
15. Financial planner/s
16. Financial planning
17. Fund Adviser/Advisor
18. Fundmart
19. Independent Financial Adviser/IFA
20. Investment
21. Investment Adviser/Advisor
22. Investment consultancy
23. Investment consultancy services
24. Investment consultant/s
25. Investment consulting
26. Investment manager/s
27. Investment planners
28. Investment solutions
29. Money manager
30. Multi Wealth investments
31. Mutual fund services
32. Mutual funds
33. Portfolio
34. Portfolio advisory
35. Portfolio consultancy
36. Portfolio consultants
37. Portfolio management
38. Portfolio manager
39. Portfolio services
40. prime wealth
41. wealth
42. wealth adviser/s or wealth advisor/s
43. wealth advisory
44. wealth advisory services
45. wealth care
46. wealth chanakya
47. wealth consultancy
48. wealth consultants
49. wealth consulting
50. wealth creator/s
51. wealth express
52. wealth investment
53. wealth mall
54. wealth management
55. wealth manager/s
56. wealth planner
57. wealth plus
58. wealth services
59. wealth solution/s
60. wealth vision
61. wealth yantra
ही यादी परिपूर्ण नाही. अशा प्रकारचा स्वतःचा उल्लेख जर काही संबंध नसेल तर सदस्यांनी दुरान्वयानेही करू नये. यापूर्वी जे सदस्य त्यांच्या माहितीपत्रकात /माध्यमात असा उल्लेख करत असतील त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी तो तेथून हटवावा तसेच कंपनी निबंधकांच्या कागदपत्रात तसा उल्लेख केला असल्यास तो वगळला आहे असे त्यांना कळवावे.ज्यांच्याकडे अन्य व्यवसाय करण्याची परवानगी आहे आणि त्यांनी तशी नोंदणी केली आहे त्यांना हा स्वतःच्या विषेश नामकरण न करण्याचा नियम लागू नाही.
हेही वाचा- गुंतवणूक : जाणून घ्या इंडेक्स फंड चे फायदे !
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक समजावीत)