Reading Time: 2 minutes

इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. यात सेन्सेक्स,निफ्टी,बँक निफ्टी या इंडेक्स मध्ये गुंतवणूक केली जाते. 

म्युच्युअल फंड म्हटले की नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे जोखीम आणि अस्थिरता हे आलेच मात्र योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा नक्कीच देते.  

कोणता इंडेक्स फंड चांगला?

  • गुंतवणूक करताना ज्याप्रमाणे एखाद्या पोर्टफोलिओ मध्ये सेक्टर आणि शेअर्स ची विविधता लक्षात ठेऊन गुंतवणूक केली जाते. 
  • त्याचप्रमाणे इंडेक्स फंड निवडताना ही विविधता ध्यानात ठेवून फंडची निवड केली तर सुरुवातीला जोखीम कमी होण्यासाठी मदत होते. 
अधिक माहितीसाठी: गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय: एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड

इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक का करावी? 

  • इंडेक्स फंड ची किंमत इतर म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी असते. यात फंड व्यवस्थापनाचे शुल्कही कमी असते. 
  • आज पर्यंतची इंडेक्स फंड ची कामगिरी पाहता मिळणारा परतावा हा समाधानकारक आहे.
  • योग्य फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे अधिक फायदा नक्कीच असू शकतो मात्र त्यासाठी संयम आणि शिस्त महत्त्वाची ठरते.
  • इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक म्हणजे एक निष्क्रिय गुंतवणूक(पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट) आहे कारण यात तुम्हाला एखाद्या शेअर्स प्रमाणे ट्रॅकिंग करत बसावे लागत नाही. यासाठी वॉरन बफे यांनी इंडेक्स फंड मधल्या गुंतवणुकीला सुरक्षित पर्याय म्हटले आहे. 
  • सेन्सेक्स – निफ्टी मध्ये ज्या प्रमाणात कंपन्यांचे समभाग असतात त्याचप्रमाणे इंडेक्स फंड मध्ये असतात. त्यामुळे सेन्सेक्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर बीएससी सेन्सेक्स इंडेक्स फंड निवडू शकतो.
  • मागील 15-16 वर्षांमध्ये एसआयपी इंडेक्स फंड नी साधारणपणे 12 टक्के ते 13 टक्के (आयआरआर ) परतावा दिला आहे.
  • इंडेक्स  फंडमध्ये तुम्ही दर महिना 500 रुपये अशीही एसआयपी ची सुरुवात करू शकता.  

हे ही वाचा  : म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

इंडेक्स फंड चे व्यवस्थापन सोपे:

  • इतर म्युच्युअल फंड प्रमाणे इंडेक्स फंड मॅनेजर ला पोर्टफोलिओ मध्ये काही कारणास्तव ठराविक कालावधीनंतर बदल करणे अपेक्षित नसते. 
  • निर्देशांकाचे कंपनीचे समभाग ठरलेले असल्याने इंडेक्स फंड चे व्यवस्थापन करणे सोपे होते. 

इंडेक्स फंड साठी काही महत्वाचे मुद्दे : 

  • इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी तुमचे नोंदणीकृत ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. 
  • इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लागणारी फीस,एक्झिट लोड याची माहिती करून मगच निर्णय घ्यावा. 
  • बाजारात बरेच इंडेक्स फंड अनेक वर्षांपासून कार्यन्वित आहे. मागच्या काही वर्षांचे आलेख,तक्ते याचे बारकावे समजून घ्यावे. 

निष्कर्ष : 

  • गुंतवणूक असली म्हणजे जोखीम आलीच. 
  • ही जोखीम कमी करून, कमी शुल्क भरून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक साठी सुरुवात    करायची असेल तर इंडेक्स फंड चा पर्याय उत्तम आहे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…