Reading Time: 2 minutes

राष्ट्रीय शेअरबाजाराने गेल्या गुरुवारी 23 फेब्रुवारी 2023 रोजी आपले सदस्य, मान्यताप्राप्त मध्यस्थ यांच्यावर स्वतःचा उल्लेख सल्लागार, म्युच्युअल फंड सल्लागार, भांडवल व्यवस्थापक, मालमत्ता/वित्त/ गुंतवणूक संच व्यवस्थापक यासारखी विशेष नामकरणे करण्यास काही बंधने घातली आहेत.

      शेअरबाजाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी अशा अर्थांच्या काही वरील शब्दांची यादी बनवली आहे.  एक्सचेंजचे अनेक सदस्य, ब्रोकर्स त्यांचा असा विशेष उल्लेख सेबी किंवा संबंधित यंत्रणेकडे नोंदणी न करता करीत आहेत हे गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे आहे. जर त्यांनी बाजारात स्वतःची नोंदणी दलाल किंवा मान्यताप्राप्त मध्यस्थ म्हणून केली असेल तर त्याचा संबंध फक्त शेअरबाजारातील खरेदी विक्री व्यवहारांपुरताच मर्यादित आहे. जर अन्य व्यवसायाची नोंदणी न करता ते असा व्यवसाय करीत असल्याचे सांगणे हे चूक आहे

हेही वाचा – शेअर बाजार गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?

         एक्सचेंजने हे पाऊल गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून उचलले असून सध्या स्वतःचा उल्लेख करताना कोणते शब्द सदस्यांनी वापरू नयेत यांची उदाहरणादाखल 61 शब्दांची यादी बनवली असून ते शब्द असे –

01. Adviser/Advisor

02. Advisory Services

03. Asset

04. Asset Advisory

05. Asset consultancy

06. Asset distribution

07. Asset management

08. Asset manager

09. Asset services

10. Asset consultants

11. Capital Adviser/Advisor

12. Capital management

13. Capital services

14. Corporate advisory

15. Financial planner/s

16. Financial planning

17. Fund Adviser/Advisor

18. Fundmart

19. Independent Financial Adviser/IFA

20. Investment

21. Investment Adviser/Advisor

22. Investment consultancy

23. Investment consultancy services

24. Investment consultant/s

25. Investment consulting

26. Investment manager/s

27. Investment planners

28. Investment solutions

29. Money manager

30. Multi Wealth investments

31. Mutual fund services

32. Mutual funds

33. Portfolio

34. Portfolio advisory

35. Portfolio consultancy

36. Portfolio consultants

37. Portfolio management

38. Portfolio manager

39. Portfolio services

40. prime wealth

41. wealth

42. wealth adviser/s or wealth advisor/s

43. wealth advisory

44. wealth advisory services

45. wealth care

46. wealth chanakya

47. wealth consultancy

48. wealth consultants

49. wealth consulting

50. wealth creator/s

51. wealth express

52. wealth investment

53. wealth mall

54. wealth management

55. wealth manager/s

56. wealth planner

57. wealth plus

58. wealth services

59. wealth solution/s

60. wealth vision

61. wealth yantra

        ही यादी परिपूर्ण नाही. अशा प्रकारचा स्वतःचा उल्लेख जर काही संबंध नसेल तर सदस्यांनी दुरान्वयानेही करू नये. यापूर्वी जे सदस्य त्यांच्या माहितीपत्रकात /माध्यमात असा उल्लेख करत असतील त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी तो तेथून हटवावा तसेच कंपनी निबंधकांच्या कागदपत्रात तसा उल्लेख केला असल्यास तो वगळला आहे असे त्यांना कळवावे.ज्यांच्याकडे अन्य व्यवसाय करण्याची परवानगी आहे आणि त्यांनी तशी नोंदणी केली आहे त्यांना हा स्वतःच्या विषेश नामकरण न करण्याचा नियम लागू नाही.

हेही वाचा- गुंतवणूक : जाणून घ्या इंडेक्स फंड चे फायदे !

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक समजावीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…