Reading Time: 2 minutes

आजकाल सगळेच जण सरासपणे क्रेडिट कार्ड वापरताना दिसतात. क्रेडिट कार्ड वापरून लहान-मोठी खरेदी ही केली जाते. अनेक बँकांद्वारे क्रेडिट कार्डच्या वापर केल्यावर विविध आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट दिला जातो त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना याचा फायदा होतो. (credit card EMI conversion information in Marathi)

आज आपण या लेखामधून क्रेडिट कार्ड ची खरेदी आणि त्याचे हप्ते याबद्दल माहिती करून घेऊया. 

  • क्रेडिट कार्डवर मोठी खरेदी करण्याचे प्रमाण बरेच दिसून येते त्यामागचं महत्त्वाचं आणि उपयोगी असं कारण म्हणजे केलेल्या खरेदीचे हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय. अर्थातच हे एक प्रकारचे लोन च आहे. 
  • हप्त्यांमध्ये व्यवहाराचे पैसे भरल्यामुळे निश्चितच मोठी खरेदी करून सुद्धा अतिरिक्त आर्थिक भार येत नाही. 
  • क्रेडिट कार्ड वापरणे हा एक सोयीस्कर पर्याय असला तरी पैसे वेळेवर म्हणजे दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे योग्य ठरते. 
  • मुदतीच्या आधी पैसे भरल्यास दंड म्हणून अतिरिक्त व्याजाचे पैसे भरावे लागत नाही .
  • मात्र EMI चे पैसे मुदतीच्या आधी भरले नाही तर त्यासाठी व्याजासकट पैसे भरावे लागतात. 
  • EMI साठी कालावधी व्याजाची रक्कम आणि व्याजदर याचे गणित लक्षात घेऊन ठरवावा.  
  • सगळेच व्यवहार किंवा काही निवडक व्यवहार तुम्ही EMI मध्ये रूपांतरित करू शकता यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तसे सूचित करावे लागते किंवा ऑनलाईन मध्ये पर्याय निवडावा लागतो. 
  • व्याजदर आणि इतर शुल्क  : (interest rate and other fees)
  • व्यवहार करताना EMI चा पर्याय निवडल्यास प्रत्येक वेळी व्याजदर तपासा. 
  • प्रत्येक व्यवहार ज्या प्रमाणे वेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी आणि व्याज दराचे नियम वेगळे असू शकतात.  
  • व्याजदर वार्षिक असून 12.5% ते 36% पर्यंत असतो. .   
  • बऱ्याच वेळेस EMI चा पर्यायासाठी प्रक्रिया शुल्क ही भरावे लागते, साधारण व्यवहाराच्या मूळ रकमेवर 1 % ते  3% शुल्क असते. 
  • मुदतीपूर्व सर्व पैसे भरायचे असल्यास कार्ड धारकाला 3% पर्यंत शुल्क भरावे लागते.
Credit Card Provider Bank Interest Rate Processing Fees Pre Closure Charges
Axis Bank 18% p.a.* | 13% p.a. onwards 1.5% of the amount (Min. Rs. 150) 3% of the outstanding amount
Bank Of Maharashtra 18% p.a.* | 13% p.a. onwards 2% of the amount (Min. Rs. 100) 3% of the outstanding amount
Citibank 24% p.a.* | 13% p.a. onwards 2.5% of the amount (Min. Rs. 200) 3% of the outstanding amount
HDFC Bank 18% p.a.* | 15% p.a. onwards 1% of the amount (Min. Rs. 150) 3% of the outstanding amount
ICICI Bank 15.96% p.a.* | 12.99% p.a. onwards 2% of the amount
RBL Bank 13% p.a. onwards 3% of the outstanding amount
SBI Card 22% p.a.* | 14% p.a. onwards 2% (Min. Rs. 99 | Max. Rs. 1,000) 3% of the outstanding amount
Standard Chartered Bank Starts from 12.96% p.a.* | 13% p.a. onwards 1% Nil

हे पण वाचा: Credit Card : ‘ओव्हर लिमिट’ म्हणजे काय रे भाऊ ?

वरील तक्त्यावरून तुम्हाला बँकांच्या व्याजदर,प्रक्रिया शुल्क,मुदतपूर्व रक्कम भरल्यास शुल्क  किती लागेल याची कल्पना येईल. 

  • GST  : 
  • क्रेडिट कार्ड च्या व्याजदर,प्रक्रिया शुल्क,मुदतपूर्व रक्कम शुल्क यावर 18% GST लागू पडते.

क्रेडिट लिमिट ब्लॉक :  (credit limit block)

  • तुमची बिलाची रक्कम जो पर्यंत ईएमआय द्वारे पूर्णपणे भरली जात नाही तोपर्यंत  क्रेडिट कार्डच्या लिमिट मधून ती रक्कम तात्पुरता ब्लॉक केली जाते.
  • पर्यायाने तुमच्या क्रेडिट कार्ड ची लिमिट तात्पुरता कमी होते आणि नवीन व्यवहारावर मर्यादा येतात. 

हे वाचा : Credit Card Statement: या ९ प्रसंगांमध्ये क्रेडिट कार्ड स्टेटमेंट जतन करा

निष्कर्ष :  

  • क्रेडिट कार्ड व्यवहारात वेळ आणि पैसे याचा ताळमेळ जुळवून शिस्तबद्ध पद्धतीने पैसे भरल्यास ही सुविधा सर्वांसाठी सोयीस्कर आहे. याचा फायदा तुमचे क्रेडिट कार्ड चे क्रेडिट लिमिट वाढण्यास होतो. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.