Reading Time: 3 minutes

आरोग्यावरील खर्चात सातत्याने होणारी वाढ आणि त्यामुळे कुटुंबाची कदाचित होऊ शकणारी आर्थिक फरफट याचा विचार करता कुटुंबातील प्रत्येकाचा आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे. या योजना सर्वसाधारण विमा याच्या अंतर्गत मोडतात. हा विमाकंपनी आणि ग्राहक यामधील एक लिखित करार असून त्याचा साधारण कालावधी एक वर्षाचा असतो. त्यानंतर त्याचे नूतनीकरण करता येते. यात नमूद असलेल्या अटी शर्ती दोन्ही बाजूंकडून पाळल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. आपल्याला हवी असणारी योजना त्याच किंवा त्याहून अधिक चांगल्या लाभांसह दुसऱ्या कंपनीकडे बदलता (पोर्ट) येते आणि आपले लाभ सुरक्षित ठेवता येतात. आरोग्यविम्याचे दर कोविडपश्चात सातत्याने वाढत असून आपल्याला योग्य अशी योजना परवडणाऱ्या प्रीमयममध्ये मिळवणे हे आव्हानात्मक आहे. अनेकजण याचा प्रीमियम हा नाईलाजाने करण्याचा खर्च समजतात. वास्तविक यातून आपणास आरोग्यावरील खर्चापासून संरक्षण मिळत असल्याने यातून जोखीम संरक्षण होत असल्याने यास खर्च न समजता गुंतवणूक समजावे. ही सुविधा आपण किंवा आपले कुटुंबीय यांना वापरायला न लागावी यासाठी प्रार्थना करावी. आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा न ठेवताच ही गुंतवणूक केली जावी. ही सुविधा वापरायला न लागणे म्हणजे आपले आरोग्य उत्तम असणे. आता अनेक कंपन्यांनी दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी आरोग्यविमा खरेदी करण्याची सोय देऊ केली असून त्यासाठी त्यात भरण्यात येणाऱ्या  एकरकमी प्रीमयममध्ये काही सूट देऊ केली आहे.

हेही वाचा- जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक

अशा पद्धतीने आरोग्यविमा घेतल्याने होणारे फायदे असे-

★प्रीमयममध्ये वाढ होण्याची शक्यता नाही-

आरोग्य खर्चात सातत्याने वाढ होत असली तरी येत्या 2/3 वर्षात काहीही झालं तरी प्रीमयम तोच राहणार असल्याने यावर होणाऱ्या खर्चात वाढ होणार नाही. त्यामुळे या वाढीच्या चिंतेपासून मुक्ती.

★प्रीमयममध्ये सूट: पुढील वर्षाचा प्रीमयम आगाऊ भरल्याने या कंपन्या एकरकमी प्रीमियमवर सूट देतात हा ग्राहकांच्या दृष्टीने किफायतशीर सौदा आहे.

या दोन्ही गोष्टींचा उल्लेख सुरुवातीला आलाच आहे. याशिवाय-

★ईएमआयचा फायदा- अशा प्रकारे आरोग्यविमा घेताना त्याचा प्रीमियम आपल्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक पध्दतीने ग्राहकाला भरायला परवानगी देण्याची सूचना इन्शुरन्स नियामक आयआरडीए यांनी केली आहे त्यानुसार कंपन्यांनी अशी सोय उपलब्ध केली आहे  आता ग्राहक त्याच्या सोयीनुसार हप्ते भरू शकतो.

★करवाजावट: आरोग्यविम्याच्या हप्त्याला जुन्या करप्रणालीनुसार (या वर्षांपासून आपण समजत असलेली नविन करप्रणाली ही सर्वमान्यप्रणाली असून त्यात आरोग्यविम्यावर कोणतीही सवलत नाही करदात्यांना पूर्वापार चालत असलेली पद्धत स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध आहे म्हणून तिचा उल्लेख जुनी करप्रणाली असा केला आहे.) करसवलत उपलब्ध असून करदात्यांस त्याने भरलेला एकरकमी प्रीमियम पुढील वर्षात विभागून घेता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही 3 वर्षाचा प्रीमयम ₹ 75000/- या वर्षी भरला असेल तर त्यावरील प्रीमियम  विघागणी दरवर्षी ₹25000/- प्रतिवर्षं याप्रमाणे विभागून त्यावरील करसवलत घेता येईल.

अधिक कालावधीचा आरोग्यविमा घेण्यातील काही तोटे-

★योजना कालावधीत कंपनी बदलता येणार नाही: कंपनीच्या सेवेत असलेल्या त्रुटी विचारात घेऊन तुम्ही त्यात बदल करणार असाल तर सदर योजना रद्द करणे अथवा नवी योजना घेणे हे दोनच पर्याय असू शकतात. असे करणे हे व्यवहार्य नसल्याने यात ग्राहक म्हणून आपले आर्थिक नुकसान होणार.

★करारातील बदलामुळे कंपनी बदलण्याची अडचण:: प्रत्येक कंपनीच्या करारात फरक असल्याने जर कंपनी बदलण्याचा विचार करत असाल तर आजाराचा पूर्वेतिहास असल्यास

 अडचण येऊ शकते.

     असे काही ठळक तोटे असले तरी अधिक कालावधीसाठी आरोग्यविमा घेणे हा एक सुयोग्य गुंतवणूक निर्णय असू शकतो.

★अधिक काळासाठी अशी योजना स्वीकारताना कोणती काळजी घ्यावी?

■आपली गरज, आरोग्यविम्याची आवश्यकता, कंपनीकडून स्वीकारले जाणारे आजार, खर्चावरील मर्यादा आणि प्रीमियम या सर्वांचा  तुलनात्मक विचार करावा.

★दुसऱ्या कंपनीकडे जाण्याऐवजी अन्य उपलब्ध पर्याय आहेत का?

■कंपनी बदलणे हे आर्थिक नुकसानीचे ठरते हे आपण पाहिले. काही कंपन्यांनी बाजाराच्या सापेक्ष करारात बदल करण्याची सवलत ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे अशी सवलत देणारी कंपनी अधिक उजवी ठरेल.

हेही वाचा- Health Insurance Premium – तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?

अधिक वर्षासाठी आरोग्यविमा ग्राहकाला द्यायचा की नाही, यासंबंधीचे प्रत्येक कंपनीचे निकष वेगवेगळे आहेत. यात विमाधारकाचे वय आणि आजाराचा इतिहास यांचा विचार केला जातो. आपणास एखादी विमा कंपनी अधिक कालावधीसाठी आरोग्यविमा देऊ करत असेल तर त्याची  माहिती आणि खात्री करून घेऊनच अशा देकाराचा विचार करावा.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असल्याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…