Reading Time: 2 minutes

आपण पुढील 6 नियमांचा अभ्यास करणार आहोत, त्यातून चांगला गुंतवणुकदार कसे बनता येऊ शकेल, ते आपण समजून घेणार आहोत. 

  1. कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासणे – 
  • आपण एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तिचा जुना ट्रॅक रेकॉर्ड तपासून पहावा. कंपनीला वारंवार दंड किंवा सरकारी संस्थांकडून चेतावणी दिली गेली नाही ना याची माहिती घ्या. 
  • आपल्याला याबद्दलची माहिती गुगलवर सर्च करून मिळवता येईल. कंपनीचा वार्षिक अहवालही आवर्जून वाचावा. 
  • आपण नामांकित कंपन्यांचे नाव कधी घोटाळ्यामध्ये ऐकले आहे का? नाही ना. नियमाला धरून काम करत असल्यामुळे त्यांचे शेअर्स कायमच चढते असतात. 
  • आपण कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड वाचल्यावर त्यामध्ये नकारात्मक गोष्टी आढळून आल्यास त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू नये. 
  1. व्यवस्थापनाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून पाहणे – 
  • आपण एखाद्या कंपनीत विश्वासाने गुंतवणूक करत असतो. त्यामुळे एखाद्या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्यावर तिच्यात सहसा कोणी गुंतवणूक करत नाही. 
  • त्यामुळे शेअर मार्केटमधील चांगला इतिहास आणि शक्यतो फार दिवसांपासून असलेल्या कंपनीतच गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. 
  • आपण रतन टाटा यांच्या टाटा ग्रूप च्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याचा धोका अतिशय कमी असतो अशी गुंतवणुकदारांची अनेक दशकांपासून श्रद्धा आहे त्यामुळे नामांकित कंपन्यांचेच शेअर्स खरेदी करावेत. 

नक्की वाचा : डिव्हिडंड मिळणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

  1. कर्जाच्या परिस्थितीची माहिती घ्या – 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांपासून लांब राहावे. त्यांचे शेअर्स खरेदी करू नये. 
  • आपण कर्ज नसलेल्या किंवा कमी कर्ज असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावे, त्यामधून आपल्याला दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळू शकतो. 
  • आपण हे उदाहरणातून समजून घेऊयात. समजा, आपण एखाद्या कर्जबाजारी कंपनीत गुंतवणूक केली आणि कंपनीला कर्जबाजारीपणामुळे मालमत्ता विकावी लागली तर आपल्याकडील शेअरचे मूल्य कमी होत जाते. 
  • त्यामुळे जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ नये, अशावेळी तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. 
  1. भांडवलाची माहिती घ्या – 
  • एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करत असताना त्यामध्ये किती भांडवल गुंतवलेले आहे, याची माहिती घ्या. 
  • कंपनीच्या शेअरच्या नफ्यामध्ये किती फायदा मिळाला आणि त्यामधून किती परतावा मिळू शकतो, याची माहिती घ्या. त्यातूनही सर्व खर्च जाऊन आपल्या हातात किती रुपये राहतात याचा आढावा घेऊनच कंपनी किती मार्जिन ठेवतेय याची माहिती मिळते. 
  • भांडवलावरील परतावा हा नफ्यातील गुंतवणुकीच्या तुलनेत मिळणारा नफा दाखवत असतो. एखाद्या कंपनीच्या व्यवसायात भांडवलावर किती परतावा मिळतोय हे समजल्यावरच कंपनीचा व्यवसाय कसा चालू आहे, हे कळते. 
  • या सर्व बाबींची माहिती घेऊनच आपण संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. 

नक्की वाचा : टाटांचे ४ वर्षातले ४० वाढदिवस..!!

  1. ग्राहकांचे समाधान होतेय का, याची चाचपणी करा – 
  • एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस सुरुवातीच्या काळात लोकप्रिय होऊन त्यांच्या विक्रीत वाढ होऊ शकते. पण यामुळे त्या कंपनीचे शेअर्स घ्यायला हवेत का नाही याची माहिती हवी. 
  • दररोजच्या वापरातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरुवातीला करू शकतो. त्या कंपनीबद्दलची आपल्याला माहिती सहज पद्धतीने मिळते. 
  1. सजगतेने गुंतवणूकदारासारखा विचार करा – 
  • आपण एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना त्या कंपनीचा नफा किती आहे, याचा अभ्यास करा. त्यानुसार आपण गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता. 
  • आपण गुंतवणूक करताना संबंधित कंपनीचा भविष्यात नफा किती वाढू शकतो, कंपनीच्या वाढीची क्षमता किती आहे आणि भविष्यात कोणाशी स्पर्धा करावी लागेल याची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. 

निष्कर्ष : 

  • आपण शेअर बाजारात गुंतवणूक करताना अभ्यास करूनच शेअर खरेदी करायला हवेत. त्यामुळे आपल्याला दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळू शकतो. 
  • सुरुवातीपासून गुंतवणूक करताना दीर्घकाळाचा विचार करावा, त्या दृष्टीने आपण योग्य ठिकाणीच गुंतवणूक करतो.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…