Reading Time: 3 minutes

फोर्ब्ज या प्रसिद्ध अमेरिकन बिझनेस मॅगझीनमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या श्रीमंत माणसांच्या यादीत मुकेश अंबानी यांचं नाव तेराव्या स्थानावर आहे. त्यांच्या मालमत्तेची एकूण किंमत ५१.४ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. या यादीत ॲमझोनचे सीईओ जेफ बेजोस प्रथम स्थानावर असून, त्यांची संपत्ती ११०.५ बिलिअन डॉलर्स  आहे. वर्तमानपत्रामध्ये किंवा टिव्हीवर अशा प्रकारच्या बातम्या आपण बघत किंवा ऐकत असतो.  

अनेकदा मिलियन, बिलिअन आणि ट्रीलिअन मधले आकडे गोंधळून टाकणारे असतात. 

१०० बिलिअन डॉलर्स म्हणजे नक्की किती रुपये? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि अनेकवेळा उत्तरे न मिळताच ते विरुनही जातात.

या लेखात आपण मिलियन, बिलिअन म्हणजे काय? 

या शब्दांचे भारतीय मूल्य किती? 

अशा प्रशांची उत्तरे समजून घेणार आहोत.

रिच डॅड पुअर डॅड – श्रीमंतीचा प्रवास 

  • आपण बर्‍याच जणांनी एकाच संख्येसाठी भिन्न संज्ञा वापरल्याबद्दल ऐकले आहे. 
  • शाळेत असताना सगळेजण  उजवीकडून डावीकडे आकडे मोजायला शिकले असतील. यानुसार एकम, दहम, शतम, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज आणि त्यापुढे खर्व – निखर्व. बहुदा दशकोटीच्या पुढे कोणीही गेलंही नसेल. या संख्यांमुळे अनेकांनी गणिताचा राग रागही केला असेल. पण कितीही राग आला, तरी आपल्याला गणिताचा अभ्यास करावाच लागला होता. आणि हे सगळं शिकावंच लागलं होतं. कारण हीच आपली संख्या प्रणाली (Number System) आहे.
  • भारतीय संख्याप्रणालीप्रमाणे आपण एक लाख असे म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय युनिट सिस्टममध्ये १,००,००० म्हणजे शंभर हजार. 
  • आतंरराष्ट्रीय चलन हे नेहमी मिलियन, बिलिअन व ट्रिलियनच्या भाषेतच गणले जाते, तर ‘लाख’ हा भारतीय क्रमांकन प्रणालीत वापरला जाणारा शब्द आहे.
  • १० लाख रुपये म्हणजेच आंतरराष्ट्रीय चलन  बाजारात १ मिलियन रुपये. 
  • कृपया हे लक्षात घ्या की १० लाख  म्हणजे १ मिलियन!
  • याचप्रकारे १० लाख डॉलर्स म्हणजे १ मिलियन डॉलर्स!
  • आता भारतीय चलनाचे मूल्य कमी आहे म्हणजे १ डॉलर विकत घेण्यासाठी ७० भारतीय रुपये मोजावे लागत असतील, तर १ मिलियन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपये!

 खालील तक्त्यामध्ये भारतीय चलन आणि त्याचे आंतरराष्ट्रीय चलन (Currency) मूल्य समजणे सोप जाईल

भारतीय चलन आंतरराष्ट्रीय चलन 
१ – एक 1- Ones
१० – दहा 10- Tens
१०० – शंभर 100- Hundred
१००० – हजार 1000- Thousand
१०,००० – दहा हजार 10,000- Ten thousand
१,००,००० – एक लाख 100,000- Hundred thousand
१०,००,००० -दहा लाख 1,000,000- Million
१,००,००,००० – कोटी 10,000,000- Ten Million
१०,००,००,००० – दहा कोटी 100,000,000- Hundred million
१,००,००,००,०००- एक अब्ज 1,000,000,000- Billion
१०,००,००,००,०००- दश अब्ज 10,000,000,000- Ten Billion

जर तुम्हाला भारतीय रुपया डॉलरमध्ये रूपांतरित करायचा असेल, तर डॉलरची किंमत माहित असणे आवश्यक आहे. कारण अमेरिकन डॉलरचे दर रोज बदलत असतात. आणि यासाठी तुम्हाला मिलियन, बिलियन चलन पद्धती समजून घेणं आवश्यक आहे. 

खालील तक्त्यावरून मिलियन, बिलियन चलन पद्धती समजून घेणं जास्त सोपं जाईल. 

चलन (Currency ) एकूण शून्य एकूण डिजिट चलन
१ लाख ५ शून्य ६ डिजिट १,००,०००
१० लाख ६ शून्य ७ डिजिट १०,००,०००
१० मिलियन ७ शून्य ८ डिजिट १,००,००,०००
१०० करोड ९ शून्य १० डिजिट १,००,००,००,०००
१००० बिलियन १२ शून्य १३डिजिट १०,००,००,००,००, ०००

आता या दोन्ही तक्त्यांच्या आधारे तुमच्या मनात मिलियन, बिलिअन चलनपद्धतीबद्दल असणाऱ्या सर्व शंका दूर झाल्या असतील व आंतरराष्ट्रीय चलन पद्धती लक्षात आली असेल. 

आता आपण भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत असणारे आंतरराष्ट्रीय चलन बाजारातले मूल्य किती असते ते समजून घेऊ. 

गृहीतक: भारतीय चलन रु. ७० = १ अमेरिकन डॉलर 

१ मिलियन डॉलर्स     = ७ कोटी रुपये 

१० मिलियन डॉलर्स   = ७० कोटी रुपये 

१०० मिलियन डॉलर्स =  ७०० कोटी रुपये

१ बिलियन डॉलर्स     = ७००० कोटी रुपये

भारतात श्रीमंत, अति श्रीमंत असे प्रकार आपल्या ओळखीचे आहेत. पण “डॉलर बिलेनियर” म्हणजे १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले श्रीमंत भारतीय हे गर्भश्रीमंत म्हणून ओळखले जातात.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीनुसार भारतामधील टॉप ५ श्रीमंत व्यक्ती व त्यांची संपत्ती 

१. मुकेश अंबानी   – ५१.४ बिलिअन डॉलर्स 

२. गौतम अदानी   – १५.७ बिलिअन डॉलर्स 

३. हिंदुजा ब्रदर्स    – १५.६ बिलिअन डॉलर्स 

४. पालूनजी मिस्त्री   – १५ बिलिअन डॉलर्स 

५. उदय कोटक     – १४.८ बिलिअन डॉलर्स 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

टेलिग्राम ॲपवर आम्हाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचे @arthasakshar हे चॅनेल सबस्क्राइब करा-  

https://t.me/arthasakshar

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.