Reading Time: 4 minutes

रिच डॅड पुअर डॅड’ मधून मी समजून घेतलेल्या तसेच आत्मसात केलेल्या गोष्टी :-

  • माणसानं  स्वावलंबी असावं. 
  • जे इतरांच्या नजरेतून सुटत ते पाहणं. 
  • Kiss – keep It Simple Stupid.’’  कोणतंही काम अवघड न समजता सोप्या रितीने पूर्णत्वास कसं नेता येईल हे पहावं. कोणतीही अडचण आपल्या आंतरिक शक्ती पेक्षा जास्त श्रेष्ठ नसते. 
  • अगदी लहानपणापासून मला पडत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मला ‘रिच डॅड पुअर डॅड’ ने दिलं. 

श्रीमंतीची ‘वही’वाट

श्रीमंत लोक अधिक श्रीमंत का होत राहतात आणि गरीब लोक गरीब का राहतात?

  • गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात आणि श्रीमंतांसाठी त्यांचा पैसा काम करतो. आलेल्या उत्पन्नातून श्रीमंत मालमत्ता विकत घेतात आणि गरीब व मध्यमवर्गीय फक्त खर्च करतात.
  • मालमत्ता म्हणजे अशी एक गोष्ट जी आपलयाला उत्पन्न मिळवून देते. गरीब आणि मध्यमवर्गीय त्यांच्या घरालाच त्यांची मालमत्ता समजतात. कोणतीही अशी गोष्ट ज्यावर आपले पैसे खर्च होतात ती मालमत्ता नसून कर्ज आहे. स्वतःच घर असणं महत्वाचं आहे मात्र त्या घराला आपण मालमत्ता म्हणू शकत नाही. 
  • आर्थिक उत्त्पन्न आणि आकस्मिक धनलाभातून आलेले पैसे गरीब व मध्यमवर्गीय चैनीच्या गोष्टी घेण्यात खर्च करतात कारण त्यांना श्रीमंत दिसायचं असतं. त्यामुळे ते श्रीमंत दिसतात पण प्रत्यक्षात कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असतात. याउलट श्रीमंत लोक आलेल्या उत्पन्नातून मालमत्तेचा रकाना भक्क्म करतात आणि त्या मालमत्तेपासून उत्पन्न सुरु झाल्यावर मगच चैनीच्या गोष्टी खरेदी करतात. 
  • गरीब व मध्यमवर्गीय त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाहीत कारण आलेल्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणं, मुला-बाळांना शिकवणं यातच त्यांना जग जिंकल्यासारखे वाटते.याउलट श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी धडपड करत असतात.आपली आर्थिक बुद्धिमत्ता वाढवतात. 

श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवं?

  • आपले विचार बदलायला हवेत. सकारात्मक असायला हवं. “मला माझी परिस्थिती बदलायची आहे आणि त्यात मी बदल घडवूनच दाखवेन”, असा ठाम निश्चय करायला हवा. 
  • आपल्याला आवडलेल्या महागड्या वस्तू पाहून “मी हे विकत घेऊ  शकत नाही,एवढी माझी ऐपत नाही”, असे म्हणू नये. “ही वस्तू मला हवी आहे. ती मला विकत घ्यायची आहे”, असं ठरवून ती गोष्ट विकत घेण्याची ताकद कशी मिळवता येईल याचा विचार करावा. 
  • “हे विकत घेण्याची माझी ऐपत नाही” याचा खरा अर्थ “माझा मेंदू काम करत नाही” असा होतो. तुम्ही जेव्हा ती वस्तू  मला विकत घ्यायची आहे, असं ठरवता तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. 
  • लक्षात ठेवा, अधिक पैसा हा क्वचितच कोणाचा तरी प्रश्न सोडवतो, बाकी प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ताच कामी येते. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी पुरेसा साठवलेला पैसा जवळ असणे गरजेचे नाही. 
  • बरचसे प्रश्न आणि अडचणी लोकांचं ऐकल्यामुळेच निर्माण होत असतात. त्यामुळे गरजेप्रमाणे आपण आपल्या मनातल्या आरश्यात डोकावयास हवं. एकदा तिथे डोकावलं की आंतरिक शहाणपणा दिसतो. फक्त त्यावर भीती स्वार न होऊ देण्याची काळजी घ्यावी लागते. 
  • ‘स्वतःसाठी काम करा, इतरांसाठी नको’. श्रीमंत होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट. उच्चशिक्षण घेऊन जर आपण केवळ इतरांसाठी काम करत असू तर आपल्या कष्टांना काहीच अर्थ उरत नाही. जसं आपण पुढील पिढीला उपयोगी येण्यासाठी पैसा साठवत असतो तेव्हा तेव्हा पैशांप्रमाणेच आपली मेहनत उद्या त्यांच्या कमी कशी येईल याचा विचार करावा. 
  • आपण इतरांसाठी काम करतो, याचाच अर्थ आपण त्यांना श्रीमंत करण्यासाठी काम करतो, त्यांचं निवृत्तीनंतरचं जीवन सुखावह करत असतो. 
  • जेव्हा आपण पैशांबद्दल बोलत असतो,तेव्हा भावना ही आर्थिक बुद्धिमत्ता कमी करते. त्यामुळे भावनेला आपल्या मेंदूचा ताबा न मिळवू देता ठरवलेल्या गोष्टींवर अंमल करावा. 

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

श्रीमंत होणं का गरजेचं आहे?

  • आपली संपत्ती हेच आपलय यशाचं प्रमाण असतं. 
  • श्रीमंतीमुळे समाजात पतप्रतिष्ठा मिळतेच. शिवाय श्रीमंत लोकांवर झालेला अन्याय ते चुपचाप मान्य करीत नाहीत. त्यावर प्रतिक्रियाही देतात. त्यांच्याकडे पैसा, पैशांमुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जिगर असते. 

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा  हे ७ कानमंत्र

श्रीमंत कोण होऊ शकतो?

  • आयुष्यातला प्रत्येक धक्का सांगत असतो की “ऊठ, जागा हो, प्रयत्न कर. अजून वेळ गेलेली नाही.” जी व्यक्ती अशा धक्क्यांतून लवकर सावरते, त्यातून  प्रेरणा घेते, झालेल्या चुका सुधारते, तसेच पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेते, अशी व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. 
  • बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की फक्त उच्चशिक्षित लोक श्रीमंत होऊ शकतात. मुळात श्रीमंत होण्यासाठी अर्थसाक्षर असणं गरजेचं आहे. अशी व्यक्ती पैशांचा वापर कुठे, कसा व केव्हा करायचा हे जाणते. जी व्यक्ती २४ तास मनात सकारात्मक विचार ठेवते, तसेच नेहमी आपला मेंदू कार्यक्षम ठेवते, अशी कोणताही निर्व्यसनी  व्यक्ती श्रीमंत होऊ शकते.
  • प्रत्येक गरीब व मध्यमवर्गीय पालकांचा असा गैरसमज असतो की शाळा व कॉलेजात भरघोस यश मिळवणारे विद्यार्थीच पुढे श्रीमंत होतात, मात्र वस्तुस्थिती याउलट असते. शाळा व कॉलेजात हुशार असलेले विद्यार्थी पुढे चालून केवळ उत्तम कर्मचारी होतात व आयुष्यभर दुसऱ्यांसाठीच काम करून तिसऱ्याच व्यक्तीला श्रीमंत करत राहतात. केवळ कर्मचारी म्हणून काम करणारे लोक कधीच श्रीमंत होत नाहीत. 
  • आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपला कोणीतरी आदर्श नायक असावा. आपला नायक हा आपल्या बुद्धिमत्तेला जागं करत असतो; वाढवत असतो. 
  • लक्षात ठेवा, आपले नायक आपल्याला स्फूर्तीशिवाय आणखी काही गोष्टीही देतात,ते प्रत्येक गोष्ट सोपी करून दाखवतात. सोपेपणा आला की,आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची खात्रीच वाटू लागते. ‘ते जर हे करू शकतात, तर मी देखील करू शकतो ही जिद्द निर्माण होते. माझे  नायक आणि आदर्श दोन्ही दया सर आहेत. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

थोडक्यात पण महत्वाचे…. 

  • प्रगती करायची असेल तर समतोल सोडयला हवा. 
  • जिंकणाऱ्यांना पराजय प्रेरणा देतो व गमावणाऱ्यांना पराभूत करतो. 
  • बचतीचा उपयोग अधिक पैसे मिळवण्यासाठी करावयाचा असतो,खर्च करण्यासाठी नाही. 
  • जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यासाठी घेता तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा,’यात माझ्यासाठी काय आहे?’
  • समोरच्याच म्हणणं ऐकून घेणं आणि आपलं म्हणणं त्याला पटवून सांगणं मग ती व्यक्ती कोणीही असो. यशासाठी हे मूलभूत कौशल्य आवश्यक आहे. वक्तृत्व, लेखन,संवादकौशल्य आणि भयमुक्तता यामध्ये तुम्ही जेवढे चांगले तेवढंच तुमचं आयुष्य सहजसोपं होईल. 
  • तुम्हाला जे मनापासून करावंसं वाटत तेच करा. कारण तुम्ही एखादी गोष्ट केलीत किंवा केली नाहीत, तरी टीका ही होतेच. 
  • केवळ अर्थसाक्षरता मिळवली की लगेच मालमत्तेचा रकाना भरता  येतो असं नाही. मालमत्ता वाढवणं महत्वाचं आहे कारण त्यातून मिळणारे उत्पन्नच कॅश-फ्लो निर्माण करते. हे सारं जर  अर्थसाक्षरतेने होत असेल तर ते झाल्यानंतरही हा मार्ग लगेच खुला का होत नाही याची पाच कारणं आहेत :-
    • भीती
    • शंका आणि संशय 
    • आळशीपणा 
    • वाईट सवयी 
    • उद्धटपणा 

आपण एखाद्या विषयांत अज्ञानी आहोत याची जाणीव झाली की सर्वात आधी शिक्षण घ्यायला सुरुवात करा किंवा त्या विषयावरची पुस्तकं शोधा व वाचनात आणा. फाजील आत्मविश्वासावर मात करण्याचा हाच एक उपाय आहे. 

– प्रणव उन्हाळे 

(प्रणव उन्हाळे हे एक युवा पुस्तकप्रेमी व समिक्षक असून, ते त्यांच्या फेसबुक पेजवर पुस्तक वाचनाचे अनुभव लिहितात.)

वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…