Reading Time: 3 minutes

सगळ्यात कठीण काय आहे तर रिटर्न फाईल करणं आणि त्याहूनही कठीण काय असेल तर जास्त भरलेल्या आयकराचा रिफंड (परतावा) परत मिळवण. अनेकदा अस होत की आपली रिफंडची रक्कम परत मिळत नाही किंवा परत मिळण्यास विलंब होतो. का होत असेल असं? यामध्ये नक्की चूक कोणाची असते? आपली की टॅक्स डिपार्टमेंटची?  रिफंडसंदर्भातील या आणि अशा काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या लेखातून मिळणार आहेत.

 

१. रिफंड बॅंकर या संकल्पनेची अंमलबजावणी कधी आणि कुठल्या शहरांसाठी करण्यात आली ? 

   ~ दिनांक २४ जानेवारी २००७ पासून रिफंड बॅंकर  संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात आली. सदर सुविधा नॉन-कॉर्पोरेट करदात्यांसाठी, संपूर्ण भारतभर देण्यात आली आहे. 

२. रिफंड कोण पाठवत आणि कुठे जमा होतो?

~ स्टेट बॅंक ऑफ इंडिया टॅक्स डिपार्टमेंटसाठी  रिफंड बॅंकर म्हणून काम करते. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच ‘द कॅश मॅनेजमेन्ट प्रॉडक्ट डिपार्टमेंट (CMP SBI) द्वारे ही प्रक्रीया पार पाडली जाते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून रिफंडची सर्व माहिती सदर डिपार्टमेंटला पाठवण्यात येते. त्यानंतर रिफंडच्या रकमेबद्दलची माहिती करदात्यापर्यंत पोहचविण्यापर्यंतची प्रक्रिया हे डिपार्टमेन्ट करत.  

. रिफंडची रक्कम मिळण्याची प्रक्रिया काय आहे ?

~ रिफंड दोन प्रकारे जमा केला जातो. पहिला म्हणजे ECS आणि दुसरा म्हणजे चेक किंवा DD. जर करदात्याने ECS हा पर्याय निवडला असेल तर तर रिफंडची रक्कम त्याच्या बॅंक खात्यावर जमा होते. परंतु यासाठी रिटर्न भरताना करदात्याने बॅंक खात्याची माहिती, बॅंकखात्याचा MICR कोड आणि संपर्काचा पत्ता इ. माहिती देणे बंधनकारक आहे. जर “चेक” हा पर्याय निवडला असेल तर बॅंक अकाउंट नंबर आणि संपूर्ण पत्ता देणे बंधनकारक आहे.

५.  घराचा पत्ता बदलला असल्यास रिफंडची रिसिट (पावती)    नवीन पत्त्यावर येण्यासाठी कुठे संपर्क करावा लागेल?

~ यासंदर्भातील कुठल्याही समस्येसाठी करदात्याने असेसिंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

६. जर बॅंक खाते बंद झाले असेल तर रिफंडची रक्कम माझ्या खात्यावर कशी जमा होइल ?

~ नवीन अथवा बदलेल्या बॅंक अकाउन्टची माहिती व त्या बॅंकेच्या MICR कोडसहीत असेसिंग ऑफिसरशी संपर्क साधावा.

७. “पाठवलेला रिफंड”  मिळाला नाही तर कोणाशी संपर्क साधावा?

~ यासाठी करदात्याने सर्वप्रथम स्पीडपोस्ट नंबर सहीत स्थानिक पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. स्पीडपोस्ट नंबर NSDL-TIN च्या वेबसाईटवर मिळेल. 


८. ECS ची पावती मिळाली आहे स्टेटसही अदा केले (paid) दिसतय परंतु खात्यावर पैसे जमा झाले नाहीत तर कुठे संपर्क करायचा?

~ ECS ची पावती मिळाली आहे स्टेटसही अदा केले (paid) दिसतय परंतु खात्यावर पैसे जमा झालेले नसतील तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी खालील पत्त्यावर संपर्क करावा.

पत्ता:

    कॅश मॅनेजमेन्ट प्रॉडक्ट(CMP)

    स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI)

    SBIFAST

    31, महल इंडस्ट्रियल इस्टेट,

    ऑफ महाकाली केव्ज रोड,
    अंधेरी (पूर्व),

    मुंबई – ४०००९३ 

    फोन नं.- १८००४२५९७६०

९.  ECS ची पावती मिळाली नाही  स्टेटसही अनपेड  (Unpaid) दिसतय तर कुठे संपर्क करायचा?

  ~ ECS ची पावती मिळाली नाही  स्टेटसही अनपेड  (Unpaid) दिसत असेल तर करदात्याने खातेक्रमांक बरोबर दिला आहे का? MICR कोड बरोबर दिला आहे का याची खात्री करुन सदर माहिती संबंधित आयकर खात्यातील असेसिंग ऑफिसरला यासंदर्भात माहिती द्यावी. संबंधित असेसिंग ऑफिसर याची माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाला देतील आणि बॅंक ऑफ इंडियाकडून रिफंडचा नवीन चेक करदात्याला देण्यात येइल. 

तुमचा असेसिंग ऑफिसर कोण आहे, हे समजण्यासाठी येथे क्लिक करा- https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/KnowYourJurisdictionLink.html?lang=eng

१०. जर बॅंकेकडून दिला गेलेल्या चेकवरची तारीख उलटून गेली (Expired),तर कुठे संपर्क साधायचा ?

~  जर बॅंकेकडून दिला गेलेल्या चेकवरची तारीख उलटून गेली (Expires),तर करदात्याने संबंधित असेसिंग ऑफिसरशी तसेच कॅश मॅनेजमेन्ट प्रॉडक्ट(CMP) स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी (SBI) संपर्क साधावा. 

११. जर स्टेटसमध्ये रिफंड परत आले (Return) हा पर्याय दिसत असेल तर कुठे संपर्क करायचा ?

~जर स्टेटसमध्ये रिफंड परत आले (Return) हा पर्याय दिसत असेल तर ते, स्पीडपोस्टकडून न पोहचवलेले (अनडिलीव्हर्ड)रिफंड असतात. सदर स्थितीमध्ये करदात्याने रिफंडसाठी पुन्हा विनंती (request) करावी.  जर रिटर्न इलेक्ट्रॉनिकली भरले गेले असतील तर सदर विनंती ऑनलाईन करता येऊ शकते. त्यासाठी https://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करुन e-filling या पर्यायाचा वापर करावा. जर रिटर्न इलेक्ट्रॉनिकलली भरलेले नसतील तर संबंधित असेसिंग अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. 

१२. TIN स्टेटसनुसार जर रिटर्न एक्स्पायर (expired) झालेला असेल तर काय करता येइल ?

     ~ जर रिफंड ९० दिवसाच्या आत बॅंकेमध्ये सादर केले गेले नाही तर रिफंड एक्स्पायर होवू शकत. अशा परिस्थितीत करदाता रिफंड परत मिळण्यासाठी परत विनंती अर्ज दाखल करु शकतो. 

१३. रिफंडच्या चेकवर जर नाव अथवा अकाउंट नंबर चुकलेला असेल तर ही चूक दुरुस्त कशी करायची?

  ~ सदर परिस्थितीमध्ये मुळ चेक CMP ऑपरेशन सेंटर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सर्वे नं. २१, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीसमोर, मेन गेट,गचीबावली, हैदराबाद- ५०००१९ या पत्तावर चेक चुकल्यासंदर्भातील  लिखित अर्जासोबत  रद्द करण्यासाठी पाठवावा. तसेच करदाता यासंदर्भात असेसिंग अधिकाऱ्यांशीही संपर्क करु शकतो. जर रिटर्न ऑनलाईन भरलेला असेल तर संबंधित बदल  https://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येतील. 

 

१४. TIN स्टेटसला  रिफंड स्टेटस फेल्ड ( डायरेक्ट क्रेडीट     मोड ) दिसत असेल तर काय करायचे ?

    ~TIN स्टेटसला  रिफंड स्टेटस फेल्ड ( डायरेक्ट क्रेडीट मोड ) दिसत असेल तर याचा अर्थ स्टेट बॅक ऑफ इंडिया रिफंड जमा करण्यात अयशस्वी झाली आहे असा होतो.यासाठी अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने

       – खाते बंद झाले असेल तर 

       – खात्यावर निर्बंध घालण्यात आले असतील तर.

       – खाते हे मुदत ठेव खाते (FD)  किंवा पीपीएफ च 

         कर्जखाते असल्यास

       – खाते अनिवासी भारतीय(NRI account)       

         असल्यास

       – खातेदार मृत झाला असल्यास

वरील सर्व कारणांमुळे बॅंकेत  रिफंड जमा होवू शकत नाही व स्टेटस फेल दिसत. 

  

१५. रिफंडच स्टेटस कस पहाता येईल ?

   ~ करदाता त्याच्या रिफंड रिफंडचे स्टेटस इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टच्या वेबसाईटवर पाहू शकतात. 

www.incometaxindia.gov.in

www.tin-nsdl.com

वरील वेबसाईट वर असलेल्या ” Status of tax Refunds” या पर्यायावर क्लिक करुन त्यामध्ये पॅन डिटेल्स आणि असेसमेंट इअर भरुन रिफंड स्टेटस पहाता येइल. याशिवाय SBI च्या हेल्प डेस्क च्या   १८००४२५९७६० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून रिफंडच स्टेटस जाणून घेता येते.      आपल रिफंडचे स्टेटस तपासण्याचे खालील पर्याय उपलब्ध आहेत.

१. ई फाईल रिटर्न “सिपिसी (CPC) बॅंगलोर” टोल फ्री नं. १८००-४२५-२२२९

२. इतर रिटर्नसाठी “आयकर संपर्क केंद्र” टोल फ्री नं. १८००-१८०-१९६१ 

३. SBI संपर्कासाठी फोन नं १८००-४२५-९७६०( फक्त बॅकेच्या व्यवहारांसाठी मर्यादित)

चित्रसौजन्य-   https://goo.gl/xsgfwq 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.