अर्थसाक्षर गणपती बाप्पा आर्थिक नियोजन
https://bit.ly/32dOtTL
Reading Time: 4 minutes

बाप्पाकडून शिका आर्थिक नियोजन

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’ कडून आर्थिक नियोजन (Financial planning) करायला शिका. गणपती म्हणजे विद्येचा अधिपती. गणपती म्हणजे कलेची देवता. जगात अस्तित्वात असणाऱ्या एकूण १४ विद्या आणि ६४ कलांचा हा स्वामी म्हणजे गणपती. संगीत, नृत्य, वादन  याप्रमाणेच व्यवस्थापन व नियोजन या देखील कलाच आहेत. या कलांचा सुयोग्य वापर करुन आपण आपल्या नोकरी – व्यवसायात यशस्वी होत असतो. याचबरोबर एक अतिशय महत्वाच असणारं  नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन.

https://bit.ly/3iZaZGS

बाप्पाकडून शिका आर्थिक नियोजन (Financial planning)-

कालावधी :

  • गणपतीच्या सणाचा कालावधी ठरलेला असतो. सगळ्यांकडे जरी एकाच दिवशी गणरायांच आगमन होत असलं, तरीही निर्गमन मात्र वेगवेगळ्या दिवशी असतं.

  • अगदी दीड दिवसांपासून ते ११ दिवसांपर्यंत असा हा कालावधी असतो. प्रत्येक व्यक्ती आवडीनुसार, प्रथेनुसार किंवा ऐपतीनुसार हा कालावधी ठरवत असते.

  • आर्थिक नियोजनामध्येही कालावधी खूप महत्वाचा असतो. मग ती गुंतवणूक (Investment) असो वा कर्ज (loan) दोन्हीमध्येही कालावधी आधीच ठरलेला असतो.

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

शिस्तबद्धता:

  • हा सण आपल्याला शिस्तबद्धता शिकवतो.  गणपतीच्या सणाच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध होत असते.

  • अगदी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम व प्रक्रिया आहे. आपण आपल्याही नकळत ही प्रक्रिया पूर्ण करत असतो. पूजा, नैवेद्य, आरती, प्रसाद अशा गोष्टी नेहमी क्रमानेच होत असतात.

  • आर्थिक नियोजन करतानाही जमा-खर्चाचा ताळेबंद लिहिणे खूप आवश्यक आहे. कारण याशिवाय आर्थिक नियोजन करताच येणार नाही.

  • यासाठी स्वतःला शिस्त लावून जमा-खर्चाचा हिशोब लिहिणे, अनावश्यक खर्च टाळणे अशा गोष्टी खूप आवश्यक आहेत.

टिमवर्क:

  • गणपतीचा सण हा नक्कीच एकट्याने साजरा केला जात नाही. यासाठी अगदी सजावटीपासून विसर्जनापर्यंत कुटुंबातील सगळेजणच एकत्रीत मेहनत घेत असतात.

  • आर्थिक नियोजन करताना जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रीतपणे मिळून केलं, तर प्रत्येकाच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा संपूर्ण कुटुंबाला मिळू शकतो.

संकटकाळातील आर्थिक नियोजन

मोदक:

  • आता सर्वात शेवटी आपल्या गणेशाला प्रीय असणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे ‘मोदक’!

  • गणपतीची पूजा व आरती झाल्यावर प्रसाद म्हणून मिळणारे श्रींचे आवडते गोड मोदक न आवडणारं क्वचितच कोणी असेल. परंतु हा गोड प्रसाद मिळविण्यासाठी पूजा व आरती होइपर्यंत थांबाव लागतं.

  • यातून पुरेशा संयमानंतर गोड फळ नक्की मिळतं ही शिकवण मिळते.

  • याचाच अर्थ झटपट परतावा मिळवून देणाऱ्या फसव्या गुंतवणूकीवर विश्वास न ठेवता योग्य त्या कालावधीत परंतु खात्रीशीर परतावा देणाऱ्या विश्वसनीय गुंतवणूकींचा पर्याय निवडल्यास परताव्याची गोड फळे नक्कीच मिळतील.

गणेशाची देहयष्टी व आर्थिक नियोजन:

आपल्या लाडक्या गणेशाच्या देहयष्टीचा अभ्यास केल्यावर त्यातून मोलाचा संदेश आपल्याला मिळतो. या संदेशाची आपल्या आर्थिक नियोजनाशी सांगड घातल्यावर, “आर्थिक नियोजन कशासाठी करायचं?” या प्रश्नाचं उत्तर मिळतं.

१. गजाननाचं मोठ डोकं:

  • यामध्ये या बुद्धीच्या देवतेकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे कितीही संकटे आली तरी हार मानू नका.

  • प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच. ज्याप्रमाणे गणेशाला हत्तीचं तोंड पर्यायी म्हणून बसविण्यात आले, त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करताना जर काही अडचणी आल्या तर त्यालाही पर्याय उपलब्ध असतात. त्याचा विचार जरुर करावा.

  • उदाहरणार्थ मोठ्या गुंतवणूकीसाठी बाजूला पैसे काही कारणांमुळे खर्च करावे लागले तर त्याला पर्याय म्हणून एखादी छोटी गुंतवणूक करावी. अथवा म्युच्युअल फंड्स,  शेअर्स यांचा पारंपारिक गुंतवणूकीला पर्याय म्हणून विचार करायला नक्कीच हरकत नाही.

  • फक्त योग्य ती काळजी घेऊन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ही गुंतवणूक करावी. याशिवाय अनेकदा मोठ्या गुंतवणूकीतून मोठा फायदा मिळतो. परंतु त्यासाठी काही प्रमाणात धोका पत्करायची तयारी हवी.

  • अर्थात धोका पत्करतानाही त्यामागे मोठा विचार, सखोल अभ्यास व नियोजन करणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

२. गणपतीचे बारीक डोळे:

  • गुंतवणूक करताना सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करुन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

  • आपली गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता तपासून ती निश्चित करुन त्यासाठी उपलब्ध असणारे सर्व पर्याय शोधणे,  ही सुयोग्य गुंतवणूकीची पहिली पायरी आहे.

  • तसे करताना सर्वप्रकारे योग्य ती काळजी घेणे, त्यासंदर्भातील शासनाचे धोरण, कायदे, फॉर्ममधील नियम व अटी याचा बारकाईने अभ्यास करावा.

  • उदाहरणार्थ विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड,  इत्यादींबद्दल बोलायच तर त्यामध्ये काही नियम व अटी या संदिग्ध असतात, तर काही वेळा काही नियम व अटी वरवर पहाता आपल्याला फारशा महत्वाच्या वाटत नाहीत.

  • प्रत्यक्षात जेव्हा या कंपन्यांमधून  क्लेम नाकारला जातो तेव्हा या नियम व अटींचा बारीक अर्थ लक्षात येतो. पण तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते व गुंतवणूक फुकट गेलेली असते. त्यामुळे गुंतवणूक करताना ती प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुनच करावी.

३. गणपतीचे मोठे कान:

  • गणपतीचे मोठ डोकं सांगतं मोठा विचार करा, बारीक डोळे सांगतात बारकाईने अभास करा, तर मोठे कान सांगतात लक्षपूर्वक ऐका.

  • याचाच अर्थ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवा.

  • अनेकदा निव्वळ आपल्या देशातच नाही तर जगात घडणाऱ्या अनेक घटनांचा परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होत असतो.

  • अशावेळी आपल्या गुंतवणूकीवर होणारा परिणाम, गुंतवणूकीच्या संधी इत्यादीसाठी जगात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवल्यास भविष्यामध्ये ते फायद्याचं ठरेल यात शंकाच नाही.

  • त्यामुळे, ‘एकदा गुंतवणूक केली की काम झालं’ असा विचार करुन चालत नाही. तर त्याबद्दल नियमित माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

४. गजाननाची सोंड:

  • गजाननाची सोंड पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी ती स्विकारता आली पाहिजे.

  • त्याचप्रमाणे कधीकधी आर्थिक नियोजनाचं गणित बिघडतं व नुकसान सोसावं लागतं. परंतु त्याही परिस्थितीत जे आहे ते स्विकारुन यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येइल याचं नियोजन करण आवश्यक असतं.

  • त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीही शांतपणे व संयमाने हाताळली तर त्यातून लवकर बाहेर पडता येतं.

अशाप्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाकडून आर्थिक नियोजन शिका . आपल्या उत्सवातून, सण -समारंभातून नकळतपणे शिकवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडते. गणेशोत्सव म्हणजे सण, परंपरा, उत्साह, आनंद हे सर्व तर आहेच याचबरोबर यावेळी या सणांपासून मिळणारी शिकवण काय आहे ते पण समजून घ्या.

सध्या कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन गडबडून गेले आहे.  ही महामारी लवकरात लवकर संपून आयुष्याची आणि समाजाची घडी सुरळीत चालू व्हावी म्हणून बाप्पाकडे मनापासून प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया!

टीम अर्थसाक्षर तर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
2 comments
  1. अतिशय सुरेख पद्धतीने आर्थिक गुंतवणुकीचे महत्व पटवून देताना आपल्या लाडक्या बाप्पाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाशी तुलना व महत्व पटवून दिलेलं आहे.
    अर्थसाक्षर टीमला मनःपूर्वक धन्यवाद.
    आभारी, थँक्स, शुक्रिया !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.