Rules Of Financial Planning
Reading Time: 2 minutes

Rules Of Financial Planning

आर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Rules Of Financial Planning: आर्थिक नियोजनाचे सुवर्ण नियम  

१. सध्याच्या बाजारभावानुसार गुंतवणूकीची किंमत ठरवणे-

  •  ही किंमत कशी ठरवाल? तर हे अगदी सोपे आहे.
  • तुमची पूर्ण मालमत्ता व पूर्वीच्या गुंतवणूक यातून तुमच्यावरील असलेले एकूण कर्ज वजा जाता राहणारी रक्कम, व मालमत्ता यावर गुंतवणुकीची किंमत ठरते. यानंतर चे काही टप्पे आहेत. ते असे,
    • गुंतवणूकीचे ध्येय- समजा तुम्हाला कार घ्यायची आहे, किंवा घरात लग्नकार्य किंवा एखादा समारंभ आहे. यासाठी पैसा हवाच. तर, ह्या होणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसाठी गुंतवणूक ध्येय ठरवावे. नजीकच्या काळात होणारा खर्च, त्याचा अंदाज व त्यानुसार काढलेला आराखडा तसेच, या खर्चासाठी केलेली एकूण गुंतवणूक म्हणजे गुंतवणुकीचे ध्येय. 
    • खर्चाचा अंदाज, रकमेची गरज- आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कितपत खर्च होईल, किती रक्कम लागेल याचा अंदाज बांधणे. यात जीवनशैली, आरोग्य, शिक्षण असे अनेक खर्च येतात.
    • रिस्क फॅक्टर- गुंतवणूकिच्या वेगवेगळ्या योजना सध्या उपलब्ध आहेत. ह्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची रिस्क घेऊ शकता का? ही विचार व्हावा. सगळ्याच गुंतवणूकीत रिस्क नसते. योग्य ठिकाणी रक्कम गुंतवता येते.
    • कुठे गुंतवणार- गुंतवणुकीचा हा फार महत्वाचा टप्पा किंवा निर्णय आहे. सध्या अनेक योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठे गुंतवणूक करावी हे ही फार महत्वाचे ठरते. स्थावर मालमत्ता, हप्त्यांत घेतलेल्या वस्तू व इतर गुंतवणूक हे फायदेशीर ठरते. तुमची रिस्क घेण्याची क्षमता व नजीकची ध्येय यावर बरचसं अवलंबून आहे.

महत्वाचा लेख: आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

२. गुंतवणुकीची साठवणूक-

  • तुम्हाला जर उत्तर आयुष्यासाठी पुरेशी गुंतवणूक करायची असेल, तर कोणत्या वयापासून, दरमहा साधारण किती रकमेपर्यंत गुंतवणूक करावी लागेल, याचा अंदाज घ्यायला हवा.
  • तुमचे वय जर २५ वर्षे इतके असेल तर, तर तुम्ही दरमहा रु. ५००० इतक्या रकमेची गुंतवणूक करायला हवी. 
  • याच पद्धतीने- तुमचे वय जर ३० वर्षे इतके असेल तर, तर तुम्ही दरमहा रु. ६००० इतक्या रकमेची गुंतवणूक करायला हवी. तुमचे वय जर ३५ वर्षे इतके असेल तर, तर तुम्ही दरमहा रु. ७५०० इतक्या रकमेची गुंतवणूक करायला हवी. 
  • जर ४० व्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरवात केलीत तर दरमहा रु. १०,००० इतकी रक्कम गुंतवा आणि ४५ व्या वर्षी सुरवात केलीत तर दरमहा रु. १५००० इतकी रक्कम गुंतवा.

३. कुटुंबियांची सुरक्षितता-

  • योग्य गुंतवणुकीमध्ये कुटुंबाची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या अनेक विमा विषयक योजना तपासून पहा. 
  • या योजना तपासून पाहताना, अनेक घटनांमध्ये विमा कशी मदत करू शकतो, हे जाणून घ्या. जीवन विमा, आयुर्विमा याबद्दल ही माहिती घेत, गुंतवणूक करा. उद्दीष्टे लक्षात घ्या.

महत्वाचा लेख: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

४. करदाता देवो भव:-

  • करदाता, अर्थात नियमित कर भरणारा नागरिक सन्मानपात्र असतो. 
  • कोणताही कर चुकवू नका. कर चुकवणे हे वाईटच!! परंतु, कायदेशीर मार्गाने कर वाचविण्यास काहीच हरकत नाही. 
  • गुंतवणूक ही आपल्या भविष्याची तरतूद असते. केवळ करबचतीसाठी गुंतवणूक करणे त्रासदायक ठरू शकते. 

५. ठराविक काळाने गुंतवणूक तपासून पहा. 

  • तुम्ही केलेली गुंतवणूक, त्याचे मिळत असणारे फायदे व अंतिम उद्दिष्टे ही तपासून पहा. 
  • सतत अथवा दरमहा ठराविक रक्कम ही रिअल इस्टेट(स्थावर मालमत्ता), मासिक हफ्ते पद्धतीवर घेतलेली उपकरणे, इतर संबंधित खात्रीशीर गुंतवणूक यामध्ये करा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Rules Of Financial Planning  in Marathi, Rules Of Financial Planning Marathi Mahiti, Rules Of Financial Planning Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.