-
सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहचावी या उद्देशाने पीएम मोदी यांनी आयपीपीबी किंवा इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक सुरु केली आहे.
-
भारतीय पोस्टल विभागाची ही पेमेंट बँक पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कद्वारे आणि सुमारे 3 लाख पोस्टमन व ‘ग्रामीण डाक सेवकांच्या’ माध्यमातून कार्य करेल.
-
आयपीपीबीची हि सेवा 650 शाखा आणि 3,250 प्रवेश पॉइंट्सवर उपलब्ध असेल.
-
इतर बँकांप्रमाणे आयपीपीबीमार्फत कर्ज व क्रेडिट कार्ड जारी केले जात नाही.
-
आयपीपीबीमार्फत खालील इतर बँकिंग सेवा दिल्या जातात.
-
ठेवी (Deposits)
-
प्रेषण सेवा (Remittance services)
-
मोबाइल पेमेंट / हस्तांतरण (Transfers) / खरेदी आणि एटीएम / डेबिट कार्ड
-
नेट बँकिंग आणि
-
तृतीय-पक्ष निधी हस्तांतरण (Third-party fund transfers) या कर्ज आणि विमा सुविधा पंजाब नॅशनल बँक आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्समार्फत पुरविल्या जातात.
-
-
आयपीपीबीमधील ठेवींसाठीची जास्तीत जास्त मर्यादा रू.1 लाख आहे, रु. १ लाखापेखा जास्त रक्कम जमा झाल्यास ते खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यात रूपांतरीत केले जाईल.
-
बचत खात्यावरील 4 टक्के व्याजदर देते.
आयपीपीबीच्या सुविधा
बचत खाते (Saving Account):
१. नियमित बचत खाते:
- नियमित बचत खाते बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरीही उघडले जाऊ शकते.
- हे खाते इतर अनेक फायद्यांव्यतिरिक्त, निधी सुरक्षित ठेवण्यासाठी, रोख पैसे काढण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे पाठविण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- याव्यतिरिक्त, या खात्यात ठेवलेल्या पैशावर ४% प्रतिवर्ष या दराने व्याजही मिळते
- या खात्यामधून पैसे काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
सुविधा:
- बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
- जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
- ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
- शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
- विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
- एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
- क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
- IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund Transfer)
- सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज.
- पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटशी(POSA) जोडले जाऊ शकते
वैशिष्ट्ये:
- विनामूल्य खाते
- आवश्यकतेनुसार जीडीएसच्या माध्यमातून मिळणारे सहाय्य
- विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
- बिल पेमेंट सुविधा
- क्यूआर कार्डसह सोपी आणि सुरक्षित बँकिंग सुविधा –
- ग्राहकांच्या सोयीसाठी बहुभाषिक ग्राहक सेवा
- शून्य शिलकीसह (Zero balance ) खाते
- इतर सुविधांवर नाममात्र शुल्क
- किमान मर्यादा रु. १ लाख
- अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची सुविधा (Cash deposits & Withdrawals)
२. डिजिटल बचत खाते
- व्यक्ती 18 वर्षे वयापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- 12 महिन्यांच्या आत केवायसी औपचारिकता पूर्ण करने आवश्यक आहे.
- औपचारिकता कुठल्याही बँकेत किंवा जीडीएस / पोस्टमॅनच्या मदतीने केली जाऊ शकते. त्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यामध्ये अपग्रेड केले जाईल.
- केवायसी अपग्रेड होईपर्यंत खात्याची किमान वार्षिक मर्यादा रक्कम रू. २,००,०००/- पर्यंत आहे.
- १२ महिन्यांच्या आत केवायसी अपग्रेड न केल्यास खाते उघडण्याच्या 12 महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण न झाल्यास खाते बंद होते.
- केवायसी अपग्रेड झाल्यानंतर डिजिटल बचत खाते एका पोसा (पोस्ट ऑफिस बचत खाते) शी जोडले जाऊ शकते.
सुविधा:
- बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
- जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
- ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
- शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
- विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
- एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
- क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
- IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund Transfer).
- सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज.
- पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटशी(POSA) जोडले जाऊ शकते
वैशिष्ट्ये:
- आपल्या सोयीनुसार बँकिंग
- विनामूल्य खाते
- आवश्यकतेनुसार जीडीएसच्या माध्यमातून मिळणारे सहाय्य
- विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
- बिल पेमेंट सुविधा
- क्यूआर कार्डसह सोपी आणि सुरक्षित बँकिंग सुविधा –
- ग्राहकांच्या सोयीसाठी बहुभाषिक ग्राहक सेवा
- शून्य शिलकीसह (Zero balance ) खाते
- इतर सुविधांवर नाममात्र शुल्क
- किमान मर्यादा रु. १ लाख
- अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची (Cash deposits & Withdrawals)
३. चालू खाते (Current Account):
- आयपीपीबीतर्फे लहान व्यापारी / किरणा स्टोअर आणि वैयक्तिक व्यावसायिकांना चालू खात्याची(Current Account) सुविधा दिली जाते.
- हे खाते व्यवसायाची पूर्तता आणि विस्तार करण्यासाठी आवश्यक असते.
- आयपीपीबीच्या चालू खात्याद्वारे आपल्या व्यवसायाच्या गरजांसाठी आवश्यक ते व्यवहार डिजिटल ट्रान्झॅक्शन्सद्वारे करता येतात.
- आयपीपीबीतर्फे एक व्यापारी अॅप देखील जारी केले गेले आहे.
- पोस्टमॅन / जीडीएसद्वारे, पोस्ट ऑफिस काउंटरवर किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी चालू खाते उघडता येते.
सुविधा:
- बँकेमध्ये अथवा ग्राहकांच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
- जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
- ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
- शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
- नाममात्र मासिक सरासरी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
- विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
- एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
- क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
- IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund Transfer).
- सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज
वैशिष्ट्ये :
- आयपीपीबी मर्चंट ऍप वर वैयक्तिक लॉग इन करता करता येते.
- जीडीएसच्या सहाय्याने आवश्यकत्यानुसार सेवा
- विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
- बिल पेमेंट सुविधा
- आयपीपीबी क्यूआर कार्डद्वारे सुलभ आणि सुरक्षित बँकिंग
- बहुभाषिक ग्राहक सेवा
- नाममात्र शुल्क
- विनंतीनुसार चेकबुक सुविधा
- अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची सुविधा (Cash deposit & Withdrawal )
(Image credits- https://goo.gl/fJdNDU )