Reading Time: 3 minutes

  • सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहचावी या उद्देशाने पीएम मोदी यांनी आयपीपीबी किंवा इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक सुरु केली आहे. 

  • भारतीय पोस्टल विभागाची ही पेमेंट बँक पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कद्वारे आणि सुमारे 3 लाख पोस्टमन व ‘ग्रामीण डाक सेवकांच्या’ माध्यमातून कार्य करेल. 

  • आयपीपीबीची हि सेवा 650 शाखा आणि 3,250 प्रवेश पॉइंट्सवर उपलब्ध असेल.

  • इतर बँकांप्रमाणे आयपीपीबीमार्फत कर्ज व  क्रेडिट कार्ड जारी केले जात नाही. 

  • आयपीपीबीमार्फत  खालील इतर बँकिंग सेवा  दिल्या जातात.

    1. ठेवी (Deposits)

    2. प्रेषण सेवा (Remittance services)

    3. मोबाइल पेमेंट / हस्तांतरण (Transfers) / खरेदी आणि एटीएम / डेबिट कार्ड

    4. नेट बँकिंग आणि 

    5. तृतीय-पक्ष निधी हस्तांतरण (Third-party fund transfers) या कर्ज आणि विमा सुविधा पंजाब नॅशनल बँक आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्समार्फत पुरविल्या जातात.  

  • आयपीपीबीमधील  ठेवींसाठीची  जास्तीत जास्त मर्यादा रू.1 लाख आहे, रु. १ लाखापेखा जास्त रक्कम जमा झाल्यास ते खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यात रूपांतरीत केले जाईल.

  • बचत खात्यावरील 4 टक्के व्याजदर देते.

आयपीपीबीच्या सुविधा

बचत खाते (Saving Account):

      १. नियमित बचत खाते:

  • नियमित बचत खाते बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरीही उघडले जाऊ शकते. 
  • हे खाते इतर अनेक फायद्यांव्यतिरिक्त, निधी सुरक्षित  ठेवण्यासाठी, रोख पैसे काढण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे पाठविण्यासाठी वापरले जाऊ शकते. 
  • याव्यतिरिक्त, या खात्यात ठेवलेल्या  पैशावर ४% प्रतिवर्ष या दराने व्याजही मिळते 
  • या खात्यामधून पैसे काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.          

     सुविधा:  

  • बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
  • जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
  •  ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
  •  शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
  •  विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
  •  एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
  • क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
  • IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund  Transfer)
  • सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज.
  • पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटशी(POSA) जोडले जाऊ शकते

      वैशिष्ट्ये:

  1. विनामूल्य खाते 
  2. आवश्यकतेनुसार जीडीएसच्या माध्यमातून मिळणारे सहाय्य  
  3. विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
  4.  बिल पेमेंट सुविधा
  5. क्यूआर कार्डसह सोपी आणि सुरक्षित बँकिंग सुविधा –
  6. ग्राहकांच्या सोयीसाठी बहुभाषिक ग्राहक सेवा 
  7. शून्य शिलकीसह (Zero balance ) खाते
  8. इतर सुविधांवर नाममात्र शुल्क
  9. किमान मर्यादा रु. १ लाख 
  10. अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची सुविधा (Cash deposits & Withdrawals)

   २. डिजिटल बचत खाते 

  • व्यक्ती 18 वर्षे वयापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • 12 महिन्यांच्या आत केवायसी औपचारिकता पूर्ण करने आवश्यक आहे.
  • औपचारिकता कुठल्याही बँकेत किंवा जीडीएस / पोस्टमॅनच्या मदतीने केली जाऊ  शकते. त्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यामध्ये अपग्रेड केले जाईल.
  • केवायसी अपग्रेड होईपर्यंत खात्याची  किमान वार्षिक मर्यादा  रक्कम रू. २,००,०००/- पर्यंत आहे. 
  • १२ महिन्यांच्या आत केवायसी अपग्रेड न केल्यास खाते उघडण्याच्या 12 महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण न झाल्यास खाते बंद होते.
  •  केवायसी अपग्रेड झाल्यानंतर डिजिटल बचत खाते एका पोसा (पोस्ट ऑफिस बचत खाते) शी जोडले जाऊ शकते.

     सुविधा:

  •  बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
  • जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
  • ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
  •  शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
  •  विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
  • एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
  • क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
  • IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund  Transfer).
  • सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज.
  • पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटशी(POSA) जोडले जाऊ शकते

 

    वैशिष्ट्ये:

  1. आपल्या सोयीनुसार बँकिंग
  2. विनामूल्य खाते 
  3. आवश्यकतेनुसार जीडीएसच्या माध्यमातून मिळणारे सहाय्य  
  4. विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
  5.  बिल पेमेंट सुविधा
  6. क्यूआर कार्डसह सोपी आणि सुरक्षित बँकिंग सुविधा –
  7. ग्राहकांच्या सोयीसाठी बहुभाषिक ग्राहक सेवा 
  8. शून्य शिलकीसह (Zero balance ) खाते
  9. इतर सुविधांवर नाममात्र शुल्क
  10. किमान मर्यादा रु. १ लाख 
  11. अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची (Cash deposits & Withdrawals)

 

३. चालू खाते (Current Account):

  • आयपीपीबीतर्फे  लहान व्यापारी / किरणा  स्टोअर आणि वैयक्तिक व्यावसायिकांना चालू खात्याची(Current Account) सुविधा दिली जाते.
  •  हे खाते व्यवसायाची पूर्तता आणि विस्तार करण्यासाठी आवश्यक असते.
  •  आयपीपीबीच्या चालू खात्याद्वारे आपल्या व्यवसायाच्या गरजांसाठी आवश्यक ते व्यवहार डिजिटल ट्रान्झॅक्शन्सद्वारे करता येतात.
  • आयपीपीबीतर्फे एक व्यापारी अॅप देखील जारी केले गेले आहे.
  •  पोस्टमॅन / जीडीएसद्वारे, पोस्ट ऑफिस काउंटरवर किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी चालू खाते उघडता येते.

     सुविधा:

  • बँकेमध्ये अथवा ग्राहकांच्या घरी खाते उघडण्याची सुविधा.
  • जलद व कागदपत्रांशिवाय उघडले जाणारे खाते.
  • ४% प्रतिवर्ष या दराने मिळणारे त्रैमासिक व्याज.
  • शून्य शिलकीसह(Zero balance ) खाते उघडता येते.
  • नाममात्र मासिक सरासरी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
  • विनामूल्य तिमाही स्टेटमेंट.
  • एसएमएसद्वारे मिनी स्टेटमेंट.
  • क्यूआर कार्डद्वारे बँकिंग सेवा.
  • IMPS च्या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण(Fund  Transfer).
  • सुलभ बिल भरणा आणि रीचार्ज

 

      वैशिष्ट्ये :

  1. आयपीपीबी मर्चंट ऍप वर वैयक्तिक लॉग इन करता करता येते.
  2. जीडीएसच्या सहाय्याने आवश्यकत्यानुसार सेवा
  3. विनंतीनुसार पैशाची उपलब्धता
  4. बिल पेमेंट सुविधा
  5. आयपीपीबी क्यूआर कार्डद्वारे सुलभ आणि सुरक्षित बँकिंग
  6. बहुभाषिक ग्राहक सेवा 
  7. नाममात्र शुल्क
  8. विनंतीनुसार चेकबुक सुविधा
  9. अमर्यादित रोख ठेव आणि पैसे काढण्याची सुविधा (Cash deposit & Withdrawal )

(Image credits- https://goo.gl/fJdNDU )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.