स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) २ मार्च ते ५ मार्च पर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.
कंपनी एकूण १३.७१ कोटी शेअर्सची विक्री करून १०,३४१ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल. प्रति शेअर ७५० – ७५५ एवढी किंमत असून किमान १९ शेअर्सची खरेदी करावी लागेल. म्हणजेच किमान १४,२५० रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील.
अँकर, पात्र संस्थागत खरेदीदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, किरकोळ, एसबीआय शेअरधारक आणि कर्मचारी अशा सहा वेगवेगळ्या प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र समभाग कोटा ठेवण्यात आला आहे.
आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस
एसबीआय आयपीओ घेण्याची ३ मुख्य कारणे :
१. अग्रगण्य कंपनी –
क्रेडिट कार्ड विचार करता भारतामध्ये एकूण ७४ कंपन्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या कंपन्यांचा एकूण मार्केट शेअर ७५% आहे. या टॉप ५ असणाऱ्या कंपन्या म्हणजे-
- एचडीएफसी बँक – २७%
- एसबीआय – १८.१%
- आयसीआयसीआय – १४%
- ऍक्सिस बँक -१३%
- सिटीबँक – ६%
२. ग्रोथ रेट –
- ग्रोथ रेटचा विचार करता एसबीआयचा ग्रोथ रेट अग्रगण्य स्थानावर असलेल्या एचडीएफसी बँकेपेक्षा जास्त आहे.
- मागील तीन वर्षांचा विचार करता कंपनीने सातत्याने आपल्या ग्रोथ रेटचा आलेख वरती ठेवण्यात यश मिळवलं आहे.
- तसेच, ही भारतातील सर्वात प्रथम लिस्टेड क्रेडिट कार्ड कंपनी आहे.
३. मूल्यांकन:
- क्रेडिट कार्ड व्यवसायात उच्च-जोखीम असल्यामुळे एसबीआय कार्ड्सची, ४८ पट पी / ई जास्त आहे मूल्यांकनाची पद्धत P/B मध्ये, एसबीआय कार्डचे मूल्य १४.४९ पट इतके जास्त आहे.
- P/B मूल्यांकनामध्ये भारतातील बँकांना अशा प्रकारची उच्च किंमत मिळत नाही.
“एसीबीआय कार्ड्स आयपीओ” खरेदी करण्यासाठी अर्ज दाखल कसा कराल?
- आयपीओ खरेदीसाठी तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटचा वापर करून अर्ज करू शकता.
- आपण कोणत्याही खात्रीशीर यूपीआय अॅपचा वापर करुन याशिवाय ही प्रक्रिया स्टॉक ब्रोकरद्वारे देखील करता येईल.
महत्वाचे मुद्दे –
- सदर आयपीओ दि. ०२/०३/२०२० ते ०५/०३/२०२० पर्यंतच विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- आयपीओद्वारे शेअर्ससाठी अर्ज केला म्हणजे शेअर्स मिळाले, असा अर्थ होत नाही. सदर आयपीओ अलॉटमेंट दि. ११/०३/२०२० रोजी करण्यात येणार असून, १३ तारखेपर्यंत संबंधित डिमॅट खात्यावर जमा होतील.
- आयपीओ मिळाला नाही याचा अर्थ, एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचे शेअर्स तुम्ही कधी घेऊच शकणार नाही, असा होत नाही. पुढे जाऊन तुम्ही ते कधीही खरेदी करू शकता.
- तुम्हाला सदर आयपीओची किंमत जास्त वाटत असल्यास, तुम्ही नंतर हा शेअर खरेदी करू शकता. शेअरची किंमत वाढेल किंवा कमी होईल, हे त्या वेळच्या बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असेल.
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस आयपीओ बद्दल सविस्तर माहिती देणारा लेख आम्ही या आधी प्रसिद्ध केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/