प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

Reading Time: 2 minutes

शेअर बाजारातील व्यापारविषयक समीकरणांमध्ये मानवाची भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. शेअर बाजारातील दलाल आणि विश्लेषक मोठ्या संख्येने असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नेतृत्वातील ऑटोमेशन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान हे भांडवली बाजाराला केवळ पाठिंबाच देत नाही, तर त्याच्या भवितव्याला आकार देण्याचे काम करते. 

भारतातील काही आघाडीचे मंच उपलब्ध तंत्रज्ञानाचा फायदा घेत एआय सक्षम रोबो सल्लागार, चॅटबोट्स इत्यादी उत्पादने विकसित करत आहेत. या उत्पादनांमुळे ही प्रक्रिया कमालीची वेगवान होत असून ही उत्पादने शेअर बाजारातील गुंतवणुकींना सुरक्षित ठेवण्यास आणि सर्वांना सहजपणे प्रवेश करता यावा, या दिशेने एकत्रितपणे योगदान देत आहेत. 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

उद्योगातील तज्ञांच्या मते, भांडवली बाजारपेठेत यशस्वीरित्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात या विविध मार्गांबद्दल.

सोपी सुरुवात: 

 • भारतातील अग्रेसर वित्तीय संस्थांनी डीमॅट खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटाइज्ड केली आहे. 
 • यामुळे ब्रोकिंगचा अखंड अनुभव मिळून यूझर्सना ही प्रक्रिया अधिक सोपी व आकर्षक वाटते. तसेच यूजर्सना मोबाइल प्लिकेशन, ऑटोमेटेड केवायसी प्रमाणीकरण प्रणाली आणि ऑनबोर्डिंग प्रक्रियेत पूर्णपणे डिजिटल क्लाएंट या नव्या युगातील सुविधाही मिळतात.

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

गुंतागुंतीचे ट्रेडिंग पॅटर्न सोपे करणे: 

 • एआय आणि बिग डेटा नलिटिक्सद्वारे ब्रोकिंग कंपन्या गुंतागुंतीचे ट्रेडिंग पॅटर्न्स अधिक सुलभ करत आहेत. 
 • मशिन लर्निंग आणि बिग डेटा वापरून हे वित्तीय मंच ग्राहकांना वैयक्तिक सेवा पुरविण्यासह अनुपालनाचे मूल्यांकन आणि रिअल टाइममधील जोखीमींचे मूल्यांकन करतात. 

सतत सोबत असणारा सहाय्यक: 

 • ज्याप्रमाणे ‘ओकेगूगल’ तुम्हाला एखादा नंबर डायल करण्यास किंवा एखादे गाणे लावण्यास मदत करते. त्याचप्रमाणे हे प्स आर्थिक डेटा, संवाद किंवा नोट्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
 • एवढेच नाही तर केवळ पवरून एखाद्या एआय बोटशी चॅट करत एखादी व्यक्ती अखंडपणे आर्थिक ध्येय आणि गुंतवणुकीचा प्रवास व्यवस्थापित करू शकते.

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

गुंतवणुक सल्ला मिळणे झाले सोपे: 

 • तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तज्ञांची सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध असते ज्यामुळे एखाद्या ब्रोकरच्या मागे वाया जाणा-या वेळेची बचत होते. 
 • गुंतागुंतीचा एआय अल्गोरिदम सुरू असतानाच भरपूर डेटावर मंथन सुरू असते. यामुळे वित्तीय मंच एकाच वेळी अनेकांना रिअलटाइम सल्ला किंवा गुंतवणुकीचे समाधान देऊ शकतात. 
 • यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, फोरकास्ट इंजिनने बाजाराच्या मानकांना बिट करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 
 • अशाप्रकारे सतत सोबत असलेल्या सहाय्यकामुळे गुंतवणुकदारांना पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणताना सुरक्षितता वाटते.  

डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ)

नूतनाविष्कारासाठी दरवाजे खुले:  

 • वित्तीय मंचावर एआय शक्तीच्या इंजिनचा डेटा तयार करण्यासाठी डेटा वैज्ञानिक, मार्केटतज्ञ, विश्लेषक, आणि तंत्रज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांची मदत झाली आहे. विविध प्रकारची पार्श्वभूमी लाभलेले लोक गुंतवणूक प्रवासात एकत्र येत असल्याने भांडवली बाजाराचे क्षेत्र आणि प्रगतीची दारे उघडली गेली आहेत.

भांडवली बाजाराच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगती आता नवीन राहिली नाही. १९८०च्या मध्यापासूनच जगभरातील संशोधक आणि वैज्ञानिक वैयक्तिक तसेच समूहासाठी संगणकीकृत स्टॉक पीकर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात काही उच्चभ्रूंच्या वर्तुळातच हे प्रयत्न आकुंचित पावले. कारण अशा तंत्रज्ञानात ज्यांना पैसे गुंतवावे लागतात, त्यांनाचही सुविधा देण्यात आली. तथापि,  देशातील काही ब्रोकरेज संस्थांनी तंत्रज्ञानातील उत्कृष्ट सुविधांचा लाभ घेत सामान्य लोकांसाठी या सेवा खुल्या केल्या आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यातील अडथळे दूर होत असून रिटेल इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स श्रेणीमध्ये प्रवेश करत आजच्या यूजर्सना सुरक्षित भविष्य आणि उच्च जीवनशैली मिळवण्याची खात्री देता येते.

मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

– रोहित अंबोस्ता

मुख्य माहिती अधिकारी,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.