Reading Time: 3 minutes

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपल्या भाषेत स्टेट बँकेत गेल्यावर तुम्हाला अनेक सेवा मिळतात. पैसे बचत खात्यात, मुदत खात्यात भरणा करणे, पैसे आपल्या खात्यातून काढणे, कुणालातरी ट्रान्सफर करणे, कर्ज उचलणे, कर्ज भरणा करणे यांसारख्या नेहेमीच्या कामाबरोबर आजकाल बँक इतर अनेक सेवा देत असते. पारंपरिक व्याजाच्या उत्पन्नाबरोबर विविध उत्पन्नांचे स्रोत बँकांनी सुरु केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रेडिट कार्ड, विमा विक्री, म्युच्युअल फन्ड्स विक्री असे प्रमुख व्यवसाय बँक करत असतात. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

या व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण  एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया. 

  • एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस (एस.बी.आय.कार्ड्स) ची स्थापना १९९८ मध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून  स्टेट बँक ऑफ इंडियाने केली. क्रेडिट कार्ड व्यवसाय गेल्या २ दशकांत मोठ्या प्रमाणात वाढला. कालांतराने २६% भागभांडवल वॉशिंग्टन, अमेरिकास्थीत कार्लाईल ग्रुपने विकत घेतले. कार्लाइल ग्रुप प्रायव्हेट इक्विटी फ़ंड असून नवव्यवसायात सुरुवातीला गुंतवणूक करणे आणि व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर हिस्सा विक्री करून घसघशीत फायदा कमावण्याचे काम करतो.  
  • गेल्या ३० वर्षात एस.बी. आय. कार्ड्सने स्टेट बँकेच्या सर्वदूर पसरलेल्या शाखांचा पुरेपूर फायदा करत आपला व्यवसाय वाढवला. 
  • आय.पी.ओ. द्वारे भांडवल उभारणी करताना २ प्रकार आहेत :
    1. ऑफर फॉर सेल (Offer For Sale = OFS): यामध्ये कंपनीचे प्रवर्तक स्वतःकडील शेअर्स आय.पी.ओ. द्वारे इतर लोकांना विकतात. आय.पी.ओ. सबस्क्राईब करतांना गुंतवणूकदार कंपनीमध्ये प्रत्यक्ष पैसे गुंतवत नसतात. हे पैसे प्रवर्तकांना त्यांच्या शेअर्स च्या बदल्यात मिळतात. 
    2. फ्रेश इश्यू (Fresh Issue): यामध्ये गुंतवणूकदार शेअर्स विकत घेऊन कंपनीला व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उपलब्ध करून देत असतात.  

    एस.बी.आय.कार्ड्सचे शेअर होल्डिंग पुढीलप्रमाणे आहे 

तपशील आयपीओ पूर्व म्हणजे

३० सप्टेंबर २०१९ पर्यंत

आयपीओ नंतर 
स्टेट बँक ऑफ इंडिया ७६% ७२%
कार्लाईल ग्रुप २४% १४%
पब्लिक शेअर होल्डिंग  0% १४%
  • या आय.पी.ओ. द्वारे कार्लाईल ग्रुप स्वतःकडील १०% भांडवल विक्री रु. ६५०० कोटींना करणार आहे. प्रायव्हेट इक्विटी फ़ंडाच्या सर्वच गुंतवणुकी यशस्वी होतातच असे नाही पण कार्लाइल ग्रुपची सदर “पिइ एक्झिट” भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे.

इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

एस.बी.आय.कार्ड्स बाबत :

  • एस.बी.आय.कार्ड्सकडे क्रेडिट कार्ड व्यवसायातील दुसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे. 
  • भारतातील १८% बाजारहिस्सा एस.बी.आय.कार्ड्सकडे आहे. 
  • पहिला क्रमांक २७% बाजारहिस्सा असणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँकेचा आहे. 
  • एस.बी.आय.कार्ड्सच्या विक्रीवृद्धीचा आणि नफावृद्धीचा दर वाढता आहे 
  • तब्बल ९४ लाख क्रेडिट कार्डस एस.बी.आय.कार्ड्सने ग्राहकांना दिली आहेत. दरवर्षी आपला व्यवसाय २५% दराने वाढेल असा कंपनीचा अंदाज आहे. 
  • जर तुम्ही स्टेट बँक इंडियाचे शेअर होल्डर्स  असाल तर एस.बी.आय.कार्ड्सचे शेअरहोल्डर्स म्हणून व रिटेल सबस्क्रायबर म्हणूनही अर्ज करू शकतात. 
  • एस.बी.आय.कार्ड्स वैयक्तिक व कॉर्पोरेट उपयोगासाठी खरेदी, पर्यटन, लाइफस्टाइल, रिवार्ड्स, पेट्रो कार्ड्स व इतर विविध प्रकारचे कार्ड्स ग्राहकांना उपलब्ध करून देते. 
  • एस.बी.आय.कार्ड्सने विविध क्षेत्रातील ब्रॅंड्सबरोबर भागीदारी केलेली असून एअर इंडिया, अपोलो हॉस्पिटल्स, भारत पेट्रोलियम, ओला मनी , इतिहाद गेस्ट्स, यात्रा.कॉम या काही कंपन्यांचा समावेश होतो. 
  • स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असल्याने एस.बी.आय.कार्ड्सला स्टेट बँकेच्या भारतभर पसरलेल्या २२,००७ शाखांतील ४३ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना आपले कार्ड्स विकणे सोपे झाले आहे.
  • एस.बी.आय.कार्ड्समध्ये ३३००० पेक्षा जास्त प्रत्यक्ष व आउटसोर्स केलेले कर्मचारी १३३ शहरांत काम करतात.

कंपनीची आर्थिक कामगिरी (रुपये कोटींमध्ये)

तपशील  30-Sep-19 31-Mar-19 31-Mar-18 31-Mar-17
एकूण मालमत्ता

(Total Assets)

24,459.14 20,239.63 15,686.00 10,764.99
एकूण विक्री

(Total Sales)

4,677.21 7286.83 5,370.19 3,471.04
करोत्तर नफा 

(PAT : Profit After Taxes)

725.88 862.72 601.14 372.86
  • कंपनीचे “रेड हेरींग प्रोस्पेक्ट्स” वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यामध्ये प्रवर्तकांविषयी माहिती, कंपनीचे आर्थिक निकाल, भांडवल उभारणीची कारणे, भांडवलाचा अंतिम विनियोग, कंपनीमध्ये गुंतवणुक जोखिमा याबद्दल सविस्तर माहिती असते. 
  • कंपनीचा आय.पी.ओ. नक्की कधी खुला होणार आहे याच्या तारखा अजूनतरी सेबीकडून जाहीर झालेल्या नाहीत. पुढच्या काही दिवसांत आय.पी.ओ.च्या तारखा जाहीर होतील. 

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

र्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…